संपादने
Marathi

थाटात वावरता येणाऱ्या पारंपारिक साड्या बाजारभावापेक्षा स्वस्तात उपलब्ध झाल्या तर ? जाणून घ्या ‘खूबसारी’ विषयी

Nandini Wankhade Patil
24th Jun 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

एखादी सुंदर, मात्र सर्वांपेक्षा जरा हटके... आकर्षक... चारचौघांचे लक्ष वेधून घेणारी.... थांबा..थांबा.. काहीतरी गैरसमज करू नका .... आपण एखाद्या सुंदर स्त्री बद्दल नाही बोलत आहोत... ही चर्चा आहे... आकर्षक दिसणाऱ्या साडीबद्दलची... तुम्हाला कल्पना असेलच प्रत्येक स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते... तिचे व्यक्तिमत्व खुलून दिसते... आणि प्रत्येक स्त्रीला एखाद्या कार्यक्रमात किवा सणावाराच्या दिवशी पारंपारिक साडी नेसायला मनापासून आवडते. सध्या बाजारात आकर्षक दिसणारे पारंपारिक पोषाख आणि साड्यांचे नानाविध प्रकार उपलब्ध आहे. डिझायनर साड्यांची रेलचेल आहे. पण, या साड्यांच्या किमती जास्त असल्याकारणाने सर्वांनाच सर्वकाळ या साड्या खरेदी करणे शक्य होत नाही. अशा महिलांना उत्तम दर्जा राखलेल्या, बाजारातील दराच्या तुलनेत स्वस्त मात्र थाटात वावरता येणाऱ्या साड्या जर उपलब्ध झाल्या तर ? कोणाला नको आहे.. हो ना.. पण एक छोटीशी अडचण आहे.. या साड्या कोणीतरी एक-दोनदा वापरलेल्या आहेत.. म्हणजेच सेकण्डहॅन्ड ? होय... पण अगदी नव्या कोऱ्या-करकरीत वाटतात... एकदा जाणून तर घेऊ या... या पारंपारिक अर्थात एथेनिक वेअरचे प्रकार आहेत तर कसे ?

खुबसारी (khoobsaree).... म्हणजेच....भरपूर... अर्थात हा एक ब्रांड आहे जो काही महिन्यांपूर्वीच बाजारात दाखल झाला आहे. पारंपारिक सेकण्डहॅन्ड साड्यांचा व्यवसाय करणारा भारतातील हा एकमेव ब्रांड आहे. या ब्रान्डच्या संस्थापिका आहेत तृप्ती अग्रवाल... ज्यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेबद्दल युवरस्टोरीने चर्चा केली.

image


खुबसारीची संकल्पना कशी सुचली 

स्टीव जॉब्ज यांनी २००५मध्ये स्टैनफोर्ड येथील अभिभाषणात ‘कनेक्टींग द डॉटस्’ यावर संबोधन केले होते. अर्थात ‘जीवनात काहीतरी उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण करा. जीवनाच्या शेवटी तुम्ही तुमच्या भूतकाळातील घटनांचे सिंहावलोकन करा, प्रत्येक घटना परस्परसंबंधी असल्याचे तुमच्या लक्षात येईल. एखाद्या अपयशामागे मोठे यश दडलेले असते. दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून वाटचाल करा आणि आत्मविश्वास बाळगा की तुमचा भूतकाळ कुठेतरी भविष्याशी जोडला गेला आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवून आपण खुबसारीचा व्यवसाय विस्तार करण्यास प्रयत्नशील आहे.

माझ्या लक्षात आले की अनेक महिलांना फॅशनेबल, उत्तम दर्जाचे कपडे घालायला आवडतात. चांगल्या कपड्यांचे वेगवेगळे प्रकार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे असावे असेही अनेक महिलांना वाटते, यासाठी त्या लालची किवा हावरट असतात असे म्हटले तर वावगे वाटू नये. एकच ड्रेस किवा प्रकार वारंवार घालणे मला आवडत नाही, पण नेहमी नेहमी बाजारातून वेगवेगळे डिझाईन खरेदी करणे आणि कपाट भरवणे हेही परवडण्यासारखे नाही. हीच अडचण जवळपास माझ्या सभोवतालच्या महिलांची असल्याचे मला आढळले.

image


लग्न झाल्यानंतर जेव्हा मी मुंबईला आले तेव्हाचा एक अनुभव म्हणजे लग्नानंतर नववधूचे जे कपडे असतात ते सगळेच काहीतरी वेगळे करावे म्हणून प्रत्येक नववधू काहीतरी वेगळी डिझाईन घेऊन पेहराव करत असतात. तसेच माझेही होते. लग्नानंतर माझ्याकडे असणारे कपडे घालण्यासाठी काही निम्मित मिळत नव्हते, त्या कपड्यांचा मला फारसा उपयोग नव्हता, त्या वस्तूंची मला अडगळ वाटू लागली होती. त्यातले बरेचशे कपडे अगदीच नवे कोरे, एकदाच घातलेले होते. या कपड्याचा उपयोग दुसऱ्या कोणाला तरी व्हावा असे मला वाटत होते, मात्र ते द्यायचे तरी कसे ? समोरच्या व्यक्तीला ते घेताना संकोच वाटू नये, असा काहीतरी मी विचार करत होते. जे हे कपडे घेण्यासाठी इच्छुक असेल अशा कोणाला तरी मी कपडे विकायचे ठरवले. कारण माझे कपडे मी कुठल्या आश्रमाला सुद्धा देऊ शकत नव्हती कारण ते फारच स्टायलीश होते आणि तिथल्या कोणाला ते घालता आले नसते.

image


हैदराबाद येथील एकत्रित मारवाडी कुटुंबात मी लहानाची मोठी झाले. आमच्या कुटुंबात एका पिढीचे कपडे दुसऱ्या पिढीने वापरणे अगदी सहज होते. तशी परंपरादेखील होती. आमच्या चुलत भावंडाचे कपडे किवा इतर वस्तू आम्ही वापरायचो. विशेषतः महिलांचे कपडे अदलून बदलून वापरले जातात. आणि ते वापरताना कुठलाही संकोच बाळगला जात नाही. नुसते कपडेच नाही तर बूट, पर्सेस, आणि दागिनेही वापरले जातात. अशा पद्धतीची देवाणघेवाण केल्यास फायदाच होता त्यामुळे मला असे काहीतरी सुरु करायचे होते ज्यामुळे इतर गरजूंचा फायदा होईल आणि चांगल्या अवस्थेतील उपलब्ध वस्तू वाया जाणार नाही. नेमकी हीच संकल्पना लक्षात ठेवून ‘खूबसारी’चा जन्म झाला.image


खुबसारी ही भारतातील पहिली कंपनी आहे जी महिलाना आवडणाऱ्या पारंपारिक कपड्यांची देवाण-घेवाण करते. आम्ही फक्त उच्च दर्जाच्या पारंपारीक पोशाखावर एका विश्वासार्ह पर्यायवर लक्ष केंद्रित करत आहोत. इतर नेहमी वापरायच्या कपड्यांच्या तुलनेत जे आपल्याला महागडे वाटतात. एखाद्या खास पार्टी समारंभात वापरण्यात येणारे एथनिक वेअर फक्त ठराविक वेळीच वापरले जातात. ज्याचा पुनःपुन्हा वापर करणे शक्य नसते. काही महिलांना अशा खास पार्टी वेअर वर खर्च करणे म्हणजे निरर्थक खर्च करण्यासारखे वाटत असते. दुसरीकडे काहीजणी अशाही असतात ज्यांच्याकडे चांगल्या दर्ज्याच्या साड्या उपलब्ध असतात, जे त्या बऱ्याच कालावधी पासून वापरत नसतात. मात्र त्याच साड्या इतरांना वापरणे शक्य असते. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आम्ही खुबसारीचे उद्दिष्ट निश्चित केले की ज्यांना कोणाला उत्तम प्रतीच्या साड्या हव्या आहेत, मात्र बाजारातील किमती जास्त असल्याकारणाने घेऊ शकत नाही त्यांना आम्ही खूबसारीच्या माध्यमातून कमी किमतीत पर्याय उपलब्ध करून देतो. ज्यांना कोणाला साड्या नको आहेत आणि ज्यांना कोणाला त्याची गरज आहे अशा दोन्हीमध्ये समन्वय साधून आम्ही गरज पूर्ण करतो. ज्यामध्ये कपड्याच्या दर्ज्याची पूर्णपणे खात्री दिली जाते आणि व्यवहारात पूर्णतः गुप्तता बाळगली जाते. यामुळे तुमच्या कपाटातील अनावश्यक गर्दीही कमी होते आणि तुम्हाला ठराविक किमतही त्यातून मिळते. आम्ही अशाच कपड्यांचा व्यवहार करतो जे एकदा किवा दुसऱ्या वेळेला घातलेले असतात.

खुबसारी ही संकल्पना राबवण्यापूर्वी तुम्ही बाजारात काही संशोधन केले आहे का 

खुबसारी सुरु करण्यापूर्वी मी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय दोन्हीं व्यापार उद्योगांचा अभ्यास केला. वापरलेल्या कपड्यांची देवाण-घेवाण ही संकल्पना भारतात आम्ही प्रथमच सुरु केली आहे. मात्र ही संकल्पना अमेरिका आणि युरोपीय बाजारात यशस्वीपणे राबवली जात आहे. माझ्या संशोधनानुसार भारतीय ईकॉमेर्स उद्योग मोठ्या प्रमाणात विस्कळीत आहे. अशा पद्धतीचा व्यवसाय करणारे बाजारात कोणीही नव्हते. पुढे माझ्या लक्षात आले की, जे कोणी हा व्यवसाय करत आहेत त्यांना मालाची विक्री, ट्रान्सपोर्टेशन, मालाचे जतन, मार्केटप्लेस यासारख्या समस्या येत होत्या. चैनीच्या वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या काही जणांच्या मी संपर्कात आले, त्यावर अभ्यास केला, त्यानंतर मी भारतातल्या विविध भागातल्या, विविध क्षेत्रातल्या ५०० महिलांची मतं जाणून घेतली आणि माझ्या या खुबसारी व्यवसायाची संकल्पना सांगितली, त्यातील काहीजणी म्हणाल्या की, त्या विक्री करण्यासाठी तयार आहेत मात्र खरेदी करण्याबाबत त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली नाही.

image


सध्या खुबसारीकडे कोणत्या प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत.

सणावारांसाठी किवा कार्यक्रमांसाठी वापरलेले मात्र उत्तम स्थितीत असलेले पारंपारिक पेहराव महिलांना उपलब्ध करून देणारे खुबसारी ही भारतातले पहिले वेबस्टोअर असल्याचे तृप्ती सांगतात. सध्या आमच्याकडे साड्यांचे खूप मोठे कलेक्शन आहे. प्रत्येक साडी ग्राहकाला देण्यापूर्वी त्याची पडताळणी केली जाते, त्याची गुणवत्ता राखली जाते. आमच्याकडे डिझायनरची एक टीम आहे जी काही बारीकसारीक गोष्टीची कमतरता भासल्यास त्याकडे लक्ष देऊन गुणवत्ता राखली जाते. आणि साड्या पूर्णपणे नवीनच वाटतील ह्याची काळजी घेतली जाते. आमच्याकडे एथेनिक सूट्स, अनारकली, लेहेंगा यासारखे पारंपारिक पोशाख विक्रीसाठी उपलब्ध आहे.

तुम्ही साडी याच उत्पादनाशी कशा काय जोडल्या गेल्या

भारतात साडी मार्केट खूप मोठे आहे. बाराशे कोटी अमेरिकन डॉलरची या क्षेत्रात उलाढाल आहे. आम्ही केलेल्या सर्वेक्षणानुसार बहुतांश भारतीय स्त्रियांचे कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी साडी नेसण्यास प्राधान्य असते. अनेकजणींना साडी वापरणे सोयीचे वाटते. साडीबरोबरच विविध प्रकारचे डिझाईन केलेले रेडीमेड ब्लाउज घालण्याकडे अनेकींचा कल असतो. मात्र साडीच्या किमती जास्त असल्याकारणाने कमी प्रमाणात साड्या खरेदी केल्या जातात. आणि एक-दोनदा घातलेल्या किमती साड्या पुनःपुन्हा वापरणे कोणालाही फारसे आवडत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे साडी एकमेव असा पेहराव आहे जो सगळ्यांसाठी एकाच मापाचा असतो, त्यासाठी तडजोड करावी लागत नाही.image


साड्यांचे कलेक्शन कशा पद्धतीने केले जाते 

आम्ही अनेक चांगल्या कुटुंबियांशी जोडले गेलो आहोत, हे सर्व कुटुंबीय त्यांचे कलेक्शन आमच्याबरोबर शेअर करतात. आम्ही तीन पद्धतींचा अवलंब करतो १) विक्री करणारा त्यांच्याकडे असलेल्या साड्यांचे फोटोज काढून आम्हाला पाठवतो. आम्ही फोटो पाहून त्या साडीची चाचपणी करून मगच ती मागवून घेतो. २) साडी मागवल्यानंतर त्या साडीची पूर्णपणे पडताळणी केली जाते. साडी तशी नवीच असते, मात्र किरकोळ त्रुटी किवा फाल्ट आढळल्यास त्यावर काम करून पूर्णतः चांगल्या अवस्थेत आणून त्या साडीला स्टाॅक मध्ये ठेवले जाते. ३) त्यानंतर त्या साडीची किमत विक्री करणाऱ्याला सांगितली जाते, जर त्याला ती मान्य असेल तरच ती साडी वेबवर प्रदर्शित केली जाते. आणि त्या साडीची विक्री झाल्यावरच आधीच्या विक्रेत्याला पैसे दिले जातात.

साडीच्या किमती कशा पद्धतीने ठरवल्या जातात

साडीच्या कपड्याप्रमाणे आणि डिझाईनप्रमाणे तसेच आधी खरेदी केलेल्या किमतीप्रमाणे त्या त्या साडीची विक्रीची आणि खरेदीची किमत ठरवली जाते. साडीची विशेषता लक्षात घेतली जाते. या सर्व गोष्टीचे मुल्यांकन करण्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञांची टीम आहे. या साडीच्या किमती ५०० पासून १०,००० पर्यंत आहे. मात्र या साड्यांची बाजारातील प्रत्यक्षातील किमत ३००० पासून ३०,००० पर्यंत आहे.

image


खूबसारी विक्री व्यवस्थापन कसे करते

खुबसारीची नुकतीच स्थापना झाल्याने आम्ही फक्त माउथ पब्लिसिटी आणि विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्री करतो. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही आमच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कंपनीच्या वाढीसाठी सध्यातरी कुठूनही निधी उपलब्ध करावा अशी आमची योजना नाही.

आमचा मुंबईमध्ये स्टुडीओ आहे. जिथे आमचे प्रॉडक्ट ठेवले जातात, त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. फोटो शूट करणारी आमची इन हाउस टीम आहे. ज्यामध्ये फॅशन फोटोग्राफरचा समावेश आहे. जिथे मॉडेल्सचे शूटिंगही केले जाते. या स्टुडिओमध्ये ग्राहक आणि विक्रेते ये-जा करतात. खुबसारीकडे तीन महिला पूर्ण वेळ काम करतात.

भविष्यातील योजना आणि विस्तार

या वर्षाच्या अखेरपर्यंत जवळपास एक हजार साड्या उपलब्ध करून देण्याची आमची योजना आहे. म्हणजे ग्राहकांना अनेक प्रकार उपलब्ध होतील. या व्यवसायात नफा कसा होईल आणि व्यवसायाचा विस्तार कसा करता येईल यासाठी आम्ही विविध योजना आखत आहोत. साड्यांचा दर्जा तपासण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी केद्र उपलब्ध करणार आहोत. ज्यामुळे चांगल्या साड्यांची निवड करणे सोपे जाईल आणि नानाविध प्रकारही ग्राहकांसाठी उपलब्ध करता येतील. असेच एक मॉडेल आम्ही हैदराबाद येथे राबवले आहे. जे आम्ही इतरही शहरात राबवणार आहोत. व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही नवनवीन विक्री कौशल्य राबवत आहोत. एकूणच काय तर वापरलेल्या, पण दर्जेदार आणि सर्वसामन्यांना परवडणाऱ्या पारंपारिक साड्या खरेदी आणि विक्रीसाठी आम्ही खुबसारीच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. खुबसारी या भारतातील एकमेव ब्रांडची प्रसिद्ध आणि विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

वेबसाईट : https://www.khoobsaree.com/

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

सिलिकॉन व्हॅलीतून प्री-ओन्ड फॅशनच्या दुनियेत! Spoyl!!

लहानपणीचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं, ‘कनाबीज’ फूटवेअर निर्मितीची रंजक कहाणी

भारतीय ग्राहकांना पहिल्यांदाच थ्री-डी प्रिंटींगची ओळख देणा-या मेघा भैया!

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags