संपादने
Marathi

हैद्राबादच्या टमीकार्टची सहा महिन्यात भरारी, खाद्यपुरवठा क्षेत्रातला नवा खेळाडू

Team YS Marathi
14th Feb 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

वेणू माधव रोऊतू आणि विश्वजीत गायकवाड यांना सन २०१४ च्या उत्तरार्धात टमीकार्टची (Tummykart) कल्पना सुचली. आयआयएम-कोलकत्ताचे हे दोघे माजी विद्यार्थी गुडगावमध्ये कामाला होते. कॉर्पोरेट जीवनातल्या चांगल्या-वाईट सगळ्या बाबींना सामोरे जात होते. कामाच्या विचित्र वेळा आणि देशभर प्रवास ही नेहमीचीच गोष्ट झाली होती. जेवणाचे बेसुमार पर्याय उपलब्ध होते, पण परवडणारं चांगलं अन्न हा प्रश्न दोघांनाही सतावत होता. मग त्यांनी बाजाराचा अभ्यास करायला सुरूवात केली. दरम्यान, वेणूचे मित्र श्रीकांत हैद्राबादमधल्या कॉर्पोरेट पार्कमध्ये स्नॅक्स आणि बेवेरेजचा स्टॉल चालवत होते.

वेणू आणि श्रीकांत हे दोघेही मूळचे हैद्राबादचे तर विश्वजीत तिथे दोन वर्षाला कामाला होते. त्यामुळे त्या तिघांनी हैद्राबादमध्येच ऑगस्ट २०१५ मध्ये टमीकार्टची सुरूवात केली. टमीकार्ट त्यांच्या मध्यवर्ती स्वयंपाकघरातून सकाळी अकरा ते दुपारी दोन दरम्यान जेवण पुरवतं. अवघ्या ५० रुपयांत पौष्टीक आणि रुचकर आहार पुरवण्यात येतो. पाककृतीपासून ते पदार्थ पोहोचवण्याच्या प्रत्येक पातळीपर्यंत हे स्टार्टअप ग्राहकांच्या अनुभवाची दखल घेतं.

टमीकार्ट टीम

टमीकार्ट टीम


हायटेक सिटीच्या जवळील मादापूर इथं टमीकार्टचं स्वयंपाकघर आहे. जवळपासच्या आठ किलोमीटर परिसरात ते सेवा पुरवतात. यात सायबराबाद, मदापू, गचीबावली, कोंडापूर, जेएनटीयू, कोठागुडा, जुबीली हिल्स आणि बंजारा हिल्स या भागांचा समावेश होतो. दररोज सरासरी ३०० रुपयांच्या साधारण ४५० ऑर्डर्स (२०० वैयक्तिक जेवण,२५० कॉर्पोरेट जेवण) त्यांना मिळतात.

२७ वर्षीय वेणू, आयआयएम कोलकत्ता आणि खरगपूर आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना कैरन इंडिया आणि एल अँड टीमध्ये स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशन्स विभागात कामाचा अनुभव आहे. २८ वर्षीय विश्वजीत आयआयएम कोलकत्ता आणि बिट्स पिलानीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी द टाईम्स ऑफ इंडिया आणि ग्लोबल डाटामध्ये सेल्स अँड मार्केटिंग विभागात काम केल आहे. २६ वर्षीय श्रीकांत मणीपालचे माजी विद्यार्थी असून त्यांनी एसेन्चुअरमध्ये बिजनेस टू बिजनेस सेल्स अँड मार्केटिंगच काम त्यांनी केलं. शिवा मुप्पारापू, न्यरुत डोडला आणि श्रीहर्षा वेमुलापल्ली हे टीमचे आणखी सदस्य आहेत. हे सर्व हैद्राबादमधल्या जवाहरलाल नेहरु तांत्रिक विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. शिवा टमीकार्टच्या ऑपरेशन विभागाचे प्रमुख आहेत. न्यरुत खरेदी आणि तांत्रिक बाजू पाहतात. ते मणिपालचेही माजी विद्यार्थी आहेत. श्रीहर्षा व्यवसाय विकास आणि धोरण बांधणीची जबाबदारी सांभाळतात. ते जयपी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.

गुंतवणूक

संस्थापकांनी वैयक्तिक निधीतून ३० लाख रुपयांचं प्राथमिक भांडवल उभारलं. स्वयंपाकघराची उभारणी, अनुभवी शेफची नियुक्ती, डिलिव्हरी मुलं आणि तंत्रज्ञान याकरता ही रक्कम खर्ची पडली. सध्या हे स्टार्टअप दोन मॉडेलवर काम करतं, मागणीनुसार पुरवठा आणि कॉर्पोरेटची आगाऊ मागणी. कॉर्पोरेटस् सोबत हातमिळवणी करून ठराविक मागणी आधीच नोंदवली जाते.

सध्या टमीकार्टकडे आठ शेफसोबत ४५ कामगार आहेत.

विश्वजीत म्हणतात,

“आमच्याकडे स्वयंपाकघराला किती सामग्री हवी आहे, तिचा पुरवठा याकरता प्रत्येक पातळीवर शोध व्यवस्थापक आहे. कोणत्या पदार्थाचा खप जास्त आहे हे जाणून घेण्याकरता आम्ही माहितीचं संकलन करतो. त्याप्रमाणे तो पदार्थ बनवतो. मेन्यूवरच्या प्रत्येक पदार्थाला किती प्रमाणात सामग्री हवी आहे. या सगळ्याची माहिती असल्याने आम्हाला कोणती गोष्ट किती प्रमाणात खरेदी करायची हे अचूक कळतं. आम्ही प्रत्येक सामानाकरता एकाहून अधिक सामान विक्रेत्यांशी व्यवहार करतो. यामुळे आम्हाला कमी किंमतीत वस्तू मिळतेच शिवाय पुरवठाही सुरळीत राहतो”.

स्व-आराखडे

आतापर्यंत टमीकार्टच्या महसूलात महिन्यागणिक ५० टक्क्यांची वाढ होत आहे. त्यांच्या संपूर्ण कामकाजातून त्यांना ३० टक्के उत्पन्न मिळतयं. ९० टक्के ऑर्डर्स त्यांनी नियुक्त केलेले डिलिव्हरी बॉईज इच्छित स्थळी पोहोचवतात. तर उरलेल्या १० टक्के ऑर्डर्स पोहचवण्याकरता त्यांनी ओपीनीओ आणि रोडरनरशी संधान बांधलय.

फुडपांडा, स्विगी आणि झुमाटो या साईटस् वर मागणीनुसार खाद्य पुरवठा करण्याकरता टमीकार्टची नोंद झालीय. हैद्राबादच्या प्रमुख भागांमध्ये ओला कॅफे आणि फाओससोबत टमीकार्टची औपचारिक हातमिळवणी झालीय.

विश्वजीत म्हणतात,

वेगवेगळ्या व्यापारी आराखड्यांमुळे आमच्या व्यवसायातल्या कार्यप्रणालीतली गुंतागुंत पाहता, आम्ही सध्या आमची एक स्वतंत्र यंत्रणा उभारत आहोत. ज्यात शोध, ऑर्डर स्वीकारणं, ऑर्डरचं प्राधान्य, ऑर्डरची पूर्तता आणि ती ग्राहकापर्यंत पोहोचवणं या सर्व बाबी एकत्र करून मजबूत यंत्रणा आम्ही उभारत आहोत. यातला काही प्रक्रिया कामगारांकडून करण्यात येतात. पण लवकरच त्या यांत्रिक करण्यात येतील. ज्यामुळे त्यातल्या त्रुटी नाहीशा होऊन कामाचा दर्जा आणि प्रमाणबद्धता वाढेल.

२०१६ च्या अखेरिस प्रतिदिन दोन हजार कॉर्पोरेट भोजन आणि दीड हजार वैयक्तिक भोजन पुरवून आठ कोटींच उत्पन्न गाठण्याचा टमीकार्टचा उद्देश आहे. स्टार्टअप आपलं अस्तित्व दाखवण्याकरता लवकरच महत्वाच्या भागांमध्ये पिक-अप आऊटलेट आणि केंद्र सुरू करणार आहे.

बाजार आणि स्पर्धा

घरी बनवलेलं अन्न आणि शेफने बनवलेलं अन्न एखाद्यापर्यंत पोहचवण्यापर्यंत खाद्य तंत्र उद्योगाने पावलं पुढे टाकली आहेत. सध्या भारतीय बाजारात हा खाद्यपुरवठ्याचा हा मंत्र भलताच यशस्वी होताना दिसत आहे. घरी बनवलेल्या अन्नाच्या चवीची लालसा पुरवण्याकरता अनेक स्टार्टअप्स पुढे येत आहेत. या खेळात होलाशेफ, इनरशेफ, रॉकेटशेफ, झुपरमील, किचनस् फुड, सायबरशेफ हे काही स्टार्टअप खेळाडू आहेत.

मुंबईतल्या खाद्य तंत्रज्ञान स्टार्टअप होलाशेफमध्ये कलारी कॅपिटल आणि इंडिया कोशंट यांनी २० कोटी रुपयांची प्राथमिक गुंतवणूक (सीरिज ए राऊंड) केली. गुडगावच्या इनरशेफने प्राथमिक फेरीच्या आधी ११ कोटी रुपयांचा निधी जमवला. मुंबईच्याच झुपरमीलने शेफ संजीव कपूर आणि इतरांकडून १३ कोटी ६२ लाख ५९ हजार ९०० रुपये निधी मिळवला.

व्यवसाय यशस्वी होण्याकरता निधी मिळवणं ही एकच गोष्ट कामी येत नाही. गुंतवणुकदारांची साथ असतानाही डॅझो आणि स्पूनजॉय यांना ऑक्टोबर २०१५ मध्ये आपला गाशा गुंडाळावा लागला. टायनीआऊलने खर्चात कपात करण्याकरता गेल्या ऑक्टोबरमध्येच चार शहरांमध्ये त्यांची कार्यालय बंद केली आणि ३०० कामगारांना कामावरून कमी केलं.

२०१५ मध्ये खाद्योगाने खूप चढउतार पाहिले. मोठ्या रक्कमेची गुंतवणूक, कर्मचाऱ्यांची कपात, काहींनी सरळ माघार घेत व्यवसायच बंद केला, अशा अनेक गोष्टी घडल्या. या क्षेत्रात केवळ एप्रिल२०१५ मध्येच ५०४ कोटी १६ लक्ष १६ हजार ३०० रुपयांची गुंतवणूक झाली. ऑगस्ट २०१५ मध्ये ही गुंतवणूक १२९ कोटी ४४ लाख ६९ हजार ०५० रुपयांवर घसरली.

युअरस्टोरीचं मत

हैद्राबादच्या टमीकार्टने आपले सुरूवातीचे दर ५० रुपये इतके कमी ठेवलेत. हे स्टार्टअप कंपन्या आणि वैयक्तिक ग्राहक अशा दोन्ही पातळ्यांवर आपली उत्पादन विकत आहे. फक्त वैयक्तिक ग्राहकांनाच सेवा पुरवणाऱ्या स्टार्टअपच्या तुलनेत टमीकार्टची खेळी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

हैद्राबादच्या बाहेर व्यवसाय वाढवायला निधी मिळवण्याकरता स्टार्टअपने आता गुंतवणुकदारांशी बोलणी सुरू केली आहेत. पुणे, चेन्नई आणि बेंगळुरूत व्यवसायाचा विस्तार करायचा आहे. व्यवसाय वाढवण्याच्या आक्रमक प्रयत्नात खाद्यतंत्रातले स्टार्टअप प्रति युनिट थेट महसूल व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत आहेत. व्यवसायवाढीकरता निधी मिळाल्यावर टमीकार्ट शाश्वत व्यवसाय आराखड्यांवर किती जास्त काळ टिकून राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि एका विशिष्ट व्यवसाय मॉडेल संबंधित खर्च निधीव्यतिरिक्त टमीकार्ट ग्राहकांना खाद्यपुरवण्याकरता वेबसाईट तसंच अँड्रॉइड आणि आयओएस एप आणण्याच्या कामात गुंतली आहे.

आणखी काही स्टार्टअप संबंधित कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

गरमागरम खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणारे ʻरॉकेटशेफʼ

दोघी गृहिणींच्या घरच्या् जेवणाने कॉर्पोरेटस् जगात मिळवली मान्यता!

खरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश!

लेखिका – अपराजिता चौधरी

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags