छत्तीसगढ च्या आदिवासी कलांचे 'छत्तीस रंग'!
छत्तीसगढ मधील बिलासपुर सारख्या एका छोट्या शहरात राहणारी एक मुलगी, जिने वाॅल्टर थाॅम्पसन नावाच्या एका अॅडवरटाइजिंग एजन्सी ची आरामदायक नोकरी सोडली आणि त्यांच्या भागात जी आदिवासी कला कुठेतरी हरवून गेलेली त्या कलेला नव्याने आकार द्यायला सुसज्ज झाली. नीति टाह यांनी त्यांच्या क्षेत्रातील संस्कृती आणि कलाकारांचा वारसा यांचा बाहेरच्या जगाशी परिचय करून दिला. त्यांची संस्था "३६रंग" च्या मार्फत त्यांनी केलेल्या कामाला जगभरात ओळखलं जावं यासाठी त्या आता प्रयत्न करीत आहेत.
नीति टाह यांचा जन्म बिलासपुर मध्ये झाला. त्यांना लहानपणा पासूनच कलाक्षेत्रात रुची होती आणि त्या क्षेत्रातच त्यांना पुढे शिकायचं होत. ह्या त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिल्ली च्या नॅशनल इंस्टीट्यूट आॅफ एडवरटाइजिंग अँड डिजाइनिंग ह्या प्रशिक्षण संस्थेत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर एका प्रसिद्ध कंपनीत काम करू लागल्या. काहीतरी वेगळे, रचनात्मक करण्याच्या इच्छेने त्यांनी काही काळानंतर नोकरी सोडली आणि परत स्वतःच्या मूळ गावी परतून आल्या.
सुरवातीच्या दिवसां बद्दल नीती सांगतात "नोकरी सोडल्यानंतर मला असा विचार आला की, छत्तीसगढ़ मधील बस्तर मध्ये बऱ्याच जुन्या कला आहेत ज्याविषयी लोकांना काहीच माहित नाही आणि काही ओळख, माहिती नसल्यामुळे ह्या सगळ्या कला लुप्त होत चालल्या आहेत. मी सतत ६ महिने गावो-गावी फिरून तिथल्या पुरातन कला आणि कलाकारांविषयी माहिती गोळा केली."
हे संशोधन करत असतांना नीती यांना तिथली ‘भित्ती चित्र ' नावाची पुरातन कलाकृती आढळली ज्याचे बरेच कमी कारागीर उरले होते. ‘भित्ती चित्र' मध्ये मातीच्या साहाय्याने जाळीदार मुर्ती तयार केल्या जातात. मातीपासून तयार झालेल्या मुर्ती खूप जड असल्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे कठीण होते. त्यामुळे त्यांनी एक प्रयोग केला, मातीच्या ऐवजी ' कुट्टी' नावाच्या पदार्थाचा उपयोग करून पहिला, पण हा प्रयोग फसला.
मात्र स्वताच्या कामाची धुंद चढलेल्या नीति यांनी हार मानली नाही आणि कुट्टीच्या एका कारागिराला शोधून त्यांच्याकडून ह्याविषयी योग्य मिश्रण बनवण्याची पध्दत शिकून घेतली. आदिवासींचं जीवन दर्शवणारे ‘भित्ती चित्र' यावर कोरलेले दागिने, लहान मुर्ती इ. ह्या कारागीरांपासून बनवायला सुरुवात केली. ह्या दरम्यान त्यांची ओळख तिथे काम करणाऱ्या काही आदिवासी स्त्रियांशी झाली, ज्या कपड्यांवर भिन्न तऱ्हेचे जुने डिजाइन काढायच्या, ज्याला ‘गोदना’ म्हंटले जाते. ह्याशिवाय त्यांना अजून एका 'मारवाही' आदिवासी कलेविषयी माहिती मिळाली, ज्याच्यात कपड्यांवर पारंपारिक पद्धतीने भरतकाम केले जाते.
नीती यांनी नोकरीच्या दरम्यान जी काही बचत केली होती त्यातून त्यांनी ह्या बेनाम कलाकारांच्या मदतीने काही साड्या, दुपट्टे, टी-शर्ट इत्यादींवर आदिवासी भरतकामाचे काही नमुने तयार करवून घेतले. अशा काही दिवसांच्या मेहनतीनंतर, तयार केलेल्या वस्तू दिल्लीला आणल्या आणि काही जुन्या मित्रांच्या मदतीने गुडगाव च्या एपिकसेंटर मध्ये त्यांना ठेऊन आपले पहिले प्रदर्शन आयोजित केले.
नीती यांचे पहिलेच प्रदर्शन हिट ठरले आणि छत्तीसगढ़ आदिवासी लोकांनी वेगवेगळ्या वस्तूंवर केलेले भरतकाम लोकांनी खूप पसंद केले. "आमच्या कडून तयार केलेल्या साड्यांना विशेष पसंती मिळाली आणि ८ हजार प्रती नग ह्या हिशोबाने सगळ्या साड्या विकल्या गेल्या . ह्याशिवाय बाकी सगळ्या वस्तूंना पण चांगली पसंदी मिळाली आणि जवळ - जवळ सगळ्या वस्तू विकल्या गेल्या. ह्या प्रदर्शनानंतर ३६रंग आणि आदिवासी कलेचा प्रचार ह्या आमच्या मिशन ला खूप यश मिळालं."
ह्या प्रदर्शना नंतर मुंबई आणि बैंगलोरची काही मोठी दुकाने ३६रंग सोबत आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या वस्तू त्यांच्या दुकानात विकायला तयार झाली. ह्याच दरम्यान नीती यांना अस समजल की, छत्तीसगढ़ हे वेगळ राज्य झाल्यापासून तुरुंगात असलेल्या कैद्यांना पुनर्वसन कार्यक्रमा अंतर्गत भरतकामाच प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यांना हे माहित झाल्यानंतर बिलासपूर सेंट्रल जेलच्या आधिकाऱ्यांना त्या भेटल्या आणि १० कैद्यांकडून ५०० टीशर्ट वर आदिवासी भरतकाम करून घेतलं. काही काळानंतर आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या वस्तूंसोबत कैद्यांनी तयार केलेले टीशर्ट सुध्दा प्रदर्शनात ठेवण्यात आले. हे पाहून लोक फार आश्चर्यचकित झाले की कैदी सुध्दा इतकं उत्कृष्ट आणि भव्य काम करू शकतात.
'३६रंग' सुरु केल्यानंतर नीती यांनी पहिल्या वर्षी ५०० टीशर्ट तर दुसऱ्या वर्षी ७०० टीशर्ट विकले. इतक्या सगळ्या वस्तू कारागिरांकडून तयार करून घेतल्या जात असल्यामुळे डिजाइनची तंतोतंत दुसती प्रत मिळणे जवळ जवळ अशक्य आहे आणि हीच गोष्ट आहे जी यांच्या कामांना इतर दुसऱ्या कामापासून वेगळ करते.
ऑक्टोबर २०११ मध्ये नीती प्रदर्शना च्या संदर्भात यूएई ला गेल्या जिथे ह्या वस्तूंना खूप ग्राहक पसंती मिळाली. काही काळानंतर नीती यांनी दुबईला ग्लोबल विलेज नावाचे दुकान सुरु केले, जिथे छत्तीसगढ़ मधील ह्या प्राचीन कलेच्या चाहत्यां साठी कसलीही कमतरता नाही. नीती सांगतात की, त्यांच्या कडून तयार केलेल्या कपड्यांमध्ये साडी ही सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे आणि सगळ्यात जास्त विक्री सुध्दा साड्यांचीच होते.
"साड्या व्यतिरिक्त आमच्या मार्फत तयार केलेले जाळीदार कुर्ते आणि टीशर्टवर हाताने केलेले भरतकाम यांना पण बाहेरच्या बाजारात फारच मागणी आहे. माझी मानसिकता सामाजिक कार्यकर्त्यांसारखी नाही आहे परंतु ह्या कारागिरांना मदत करून मला समाधान मिळते आणि ह्या लोकांना आर्थिक मदत ही केली जाते. दिल्लीत असताना माझ्याकडे पैसा आणि ग्लॅमर ह्या दोन्हीही गोष्टी होत्या पण मला आव्हानात्मक आणि मनोरंजक अस काही करण्याची इच्छा होती आणि मला वाटत '३६रंग' मार्फत मला माझ ध्येय गाठता आलं."
वर्तमान काळात नीती रायपुर आणि दुबई इथे रिटेल दुकान चालवण्या व्यतिरिक्त मारवाही हस्तकलेचा विस्तार करण्यासाठी एक ग्रामीण सेंटर संचालित करत आहेत आणि छत्तीसगढ़ मधील आदिवासी कलांचा प्रचार - प्रसार व्हावा ह्यासाठी प्रयत्नरत आहेत.