संपादने
Marathi

द टॉईट स्टोरी

Team YS Marathi
2nd Dec 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

“ दूध हे लहान मुलांसाठी असते. जेंव्हा तुम्ही मोठे होता, तेंव्हा तुम्ही बीअरच प्यायली पाहिजे” – अर्नोल्ड श्वार्झनेगर

असे काय झाले असेल, की ज्यामुळे सिंगापूरसारख्या ठिकाणची आपली सुरक्षित नोकरी सोडून आपले बालपणीचे स्वप्न साकारण्याचा आणि बंगळुरुमध्ये अतिशय लोकप्रिय मायक्रोब्रुवरीज ( जेथे मर्यादीत प्रमाणात बीअरचे उत्पादन होते तसेच तेथे बसून ही बीअर पिण्याचा आनंदही घेता येतो) सुरु करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याद्वारे त्यांना वीकएन्डसाठी एक खास जागा तर तयार करायची होतीच पण महत्वाचे म्हणजे वीकएन्डच्या दिवशी सुमारे २००० मग्ज एवढी बीअर पुरवू शकेल, अशी व्यवस्थाही उभी करायची होती.

कोणी पाहिले होते हे स्वप्न आणि प्रत्यक्षात कसे आकाराला आले हे? जाणून घेऊ या ही कहाणी....

२००८ मध्ये सिंगापूरमधील एका मायक्रोब्रुवरीजमध्ये एकदा अरुण जॉर्ज आणि सिबि वेंकटराजू हे दोन मित्र काम संपल्यानंतर बीअर पित बसले होते. गप्पांच्या ओघात विषय निघाला तो भारतातील हरीयाणामधील गुरगाव येथे सुरु झालेल्या पहिल्या ब्रूपब हाऊझ्झाट (Howzzat) चा..... सिबि यांना नेहमीच स्वतःचे एक रेस्टॉरंट सुरु करायचे होते आणि मग अरुणने सुचविले – तू बंगलोरमध्ये हे का सुरु करत नाहीस? टॉईट (Toit) सुरु करण्याची सुरुवात ही एवढ्या साध्या संवादातून झाली.

सिबि, अरुण आणि मुकेश तोलानी हे बंगळुरुमधील फ्रॅंक ऍंथोनी पब्लिक स्कूलपासूनचे मित्र... आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सिबि हे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस) येथे गेले तर अरुण आणि मुकेश यांनी बंगळुरुच्याच ख्राईस्ट युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्याचा निर्णय घेतला. पुढे अरुण यांनी नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (एनटीयु) येथून एमबीए करण्याचा निर्णय घेतला आणि तेदेखील सिबि रहात असलेल्या सिंगापूरमध्येच येऊन पोहचले.

या मित्रांनी यासाठीची योजना आखण्यास आणि भागीदार मिळविण्यास सुरुवात करण्याच्या आधीपासूनच मुकेश हे ग्लेन विल्यम्स यांच्यासह बोका ग्रॅंड (Boca Grande) हे आपले यशस्वी रेस्टॉरंट चालवत होते. हे विल्यम्स म्हणजे स्विट चॅरीयट या पेस्ट्री दुकांनांच्या चेनचे मालक....जेंव्हा या मित्रांनी आपली ब्रूपबची कल्पना मांडली, त्यावेळी मुकेश आणि ग्लेनही त्यांना सामिल झाले आणि टॉईट या ब्रॅंड निर्मितीसाठी हे सारे सज्ज झाले.

image


आरंभ

या चौकडीने सुरुवातीचे भांडवल मिळविले ते आपल्या कुटुंबिय आणि मित्रांकडूनच आणि अनेक अडथळ्यांचा – ज्यामध्ये प्रमुख अडथळे होते आवश्यक मंजुरी आणि परवाने मिळविण्याचे – सामना केल्यानंतर २०१० मध्ये अधिकृतपणे टॉईटला सुरुवात झाली.

विशेष म्हणजे, टॉईटबाबत कोणताही महत्वाचा निर्णय हा मतदानानेच घेतला जातो. तसेच या चारही सह-संस्थापकांच्या जबाबदाऱ्या या सुस्पष्ट आहेत आणि त्यामुळे ते ही जागा एका चांगल्या तेलपाणी केलेल्या यंत्राप्रमाणेच चालवतात. सिबि हे ऑपरेशन्स बघतात, मुकेश हे आर्थिक बाजू सांभाळतात, अरुण विपणन, ब्रॅंडींग आणि इव्हेंट मॅनेजमेंट पहातात तर स्वयंपाकघराची जबाबदारी आहे ती ग्लेन यांच्यावर... मात्र, हे सगळेच सगळ्याप्रकारची कामे करतात, जेणेकरुन एखादवेळी एखाद्याला सुट्टीवर जाता येते. विशेष म्हणजे, जरी त्यांच्याकडे तज्ज्ञ ब्रु मास्टर अर्थात बीअर गाळणारे असले, तरी ते हे कामदेखील शिकले आहेत.

image


मित्रांबरोबरच व्यवसाय सुरु करण्याबद्दल काय वाटते, हे विचारता, सिबि सांगतात, “ ते तुम्हाला कशा प्रकारच्या मित्रांबरोबर काम सुरु करायचे आहे, त्यावर अवलंबून आहे. तसेच तुमचा स्वभाव आणि तुमच्यामधील नात्यांचे बंधही महत्वाचे असतात. आमच्याबाबत म्हणाल, तर आमची विनोदबुद्धी सारखीच असल्याने, इतरवेळा तापदायक वाटू शकणारे प्रसंगही त्यामुळे हलकेफुलके होतात.”

लोकप्रिय पर्याय

संस्थापकांच्या मते द ‘टॉईट वाईस’ (Toit Weiss), बवेरियन हेफवायझेन (Bavarian Hefeweizen), हे येथील सर्वात लोकप्रिय पेय आहे. ही बीअर योग्यरीत्या बनविणं काही सोपे नाही, खासकरुन जशा प्रकारे बवेरियन लोक बनवितात... सिबि सांगतात, “ आम्ही ही बीअर योग्यरित्या बनवण्यामागचे कारण हे आहे की, आमच्याकडे जर्मन पद्धतीचे ब्रू हाऊस आहे आणि त्याचबरोबर ओपन फर्मेंटरही आहे, ज्याचा वापर केवळ ही बीअर बनविण्यासाठीच केला जातो. पारंपारिकरित्या ओपन फर्मेंटर्सचा वापर केला जातो, कारण त्यामुळे ही बीअर अंबविण्यासाठी हवेतील बॅक्टेरीया (जीवाणू) मदत करु शकतात आणि जर्मनीमध्ये आजही ही पंरपरा कायम आहे.” पण जर्मनीतील अधिक औद्योगिक वातावरणात आणि त्याचप्रमाणे टॉईटमध्येही ओपन फर्मेंटर्स वापरले जातात – म्हणजे हे काही टीपिकल फर्मेंटर्सप्रमाणे प्रेशराईस्ड टॅंकस् (टाकी) नसतात तर झाकण असलेले टॅंकस् असतात, तरीही आम्ही त्यामध्ये यिस्टही घालतो. (बंगळुरुच्या हवेतील जीवाणूंवर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही!)

image


स्पर्धक आणि बंगलोरमधील नाईट लाईफ

बंगळुरुमध्ये १२ मायक्रोब्रुवरीज असून द बियर क्लब (The Biere Club) आणि टॉईट या सुरुवातीच्या मायक्रोब्रुवरीजपैकी आहेत. टॉईटच्या टीमच्या मते ही बाजारपेठ वाढत आहे आणि अशा वेळी स्पर्धा असणे ही चांगली गोष्ट आहे, कारण ते सर्व मिळून ही एकूण मागणी पूर्ण करत आहेत. खरे तर, इतर काही ब्रुपबच्या संस्थापकांशी त्यांची चांगली मैत्रीही आहे आणि सहयोगाने काम करण्यासाठीही ते प्रयत्न करत आहेत.

टॉईटच्या संस्थापकांच्या मते वीकएन्डस् ना नाईटलाईफमध्ये वाढ होणे हे धंद्यासाठी चांगले आहे, पण आठवड्याच्या इतर दिवशी मात्र असे नसते. बऱ्याच लोकांना कामावर लवकर पोहचण्याच्या दृष्टीने लवकर निघावे लागत असल्याने, आठवड्याच्या इतर दिवशी पहाटेपर्यंत सेवा सुरु ठेवणे हे कठीण जाते.

भविष्यातील योजना

त्यांचा असा ठाम विश्वास आहे, की त्यांच्या या यशामागे आहेत, ते त्यांचे अतिशय उपयुक्त कर्मचारी आणि नियमित येणारे ग्राहक... अशा ग्राहकांसाठी त्यांनी कुडीक्स क्लब नावाचा एक लॉयल्टी क्लबही सुरु केला आङे. स्थापनेपासून चार वर्षांतच टॉईट हे झोमॅटो आणि बर्प यांसारख्या विविध व्यासपीठांवरील एक आघाडीचे रेस्टॉरंट आणि बार ठरले आहे.

हा उद्योग चालविताना कंटाळवाणा दिवस असा नसतोच – यानिमित्ताने सिबि हे काही गमतीदार किस्से आवर्जून सांगतात, जसे की, काही वेळा ग्राहक असेही विचारतात, की ही बिअर काही मिनिटांपूर्वीच तयार केलेली आणि ताजीच आहे ना?

भविष्यात अधिक विस्तार करण्याची आणि पुणे आणि मुंबईतही आपल्या शाखा सुरु करण्याची टीमची इच्छा आहे.

लेखक – मनु श्रीवास्तव

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags