सारे काही उध्वस्त झाल्यावरही उभारले नवे विश्व ‘ सब रेंट करो डॉट कॉम’ च्या राज शिवराजू यांची कथा

आयटी क्षेत्रात काही दिवस काम करून जमविलेल्या पैशातून सुरू केली स्वत:ची कंपनी. . . भारतातून अमेरिकेपर्यंत केला कार्यविस्तार. . . पण. . . एक दिवस सारे नष्ट झाले. अमेरिकेतील वादळात सारे नष्ट झाले. आणि पुन्हा उभे राहण्यासाठी केले केली नोकरी. . . . पुन्हा एकदा आपल्या स्टार्टअपसह उभे आहेत राज शिवराजू.

सारे काही उध्वस्त झाल्यावरही उभारले नवे विश्व ‘ सब रेंट करो डॉट कॉम’ च्या राज शिवराजू यांची कथा

Monday June 27, 2016,

3 min Read

नव्या व्यापाराच्या प्रस्तावांसह मैदानात येणा-या व्यापा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हैद्राबाद मध्ये एक आयटी विशेषज्ञाने एक नवीन संकेतस्थळ 'सब रेंट करो डॉट कॉम' आणून नव्या उद्योगात पदार्पण केले आहे. या संकेतस्थळावर कोणाही व्यक्तीला आपले घर किंवा कार्यालय या मधील अशी कोणतीही वस्तु भाड्याने देता येते जी सध्या त्यांच्या कामात नसेल.

image


हैद्राबादचे राज शिवराजू यांनी 'मार्केट प्लेस आयटी सोल्यूशन' या नावाने आपले स्टार्टअप सुरू केले आहे. याच मंचावरून त्यांनी सब रेंट करो कॉमर्स संकेतस्थळ सुरू केले. याबाबत राजू यांनी युअर स्टोरीला सांगितले की, या क्षेत्रात खूपच संधी आहेत. ते सांगतात की, “ मी जेंव्हा वस्तुंच्या योग्य उपयोगाबद्दल विचार करतो त्यावेळी वाटले की, अनेक गोष्टी आपण खरेदी तर करतो, पण त्यांचा पुरेसा उपयोग करतच नाही. अशा लोकांना त्याच वस्तु का देता येऊ नयेत, ज्यांना त्यांची खरच गरज आहे. या वस्तु त्यांना भाड्याने देता येतील. याच विचारातून या नव्या व्यापाराचा जन्म झाला.”

डेलॉईट कंपनीत आठ वर्ष आपल्या सेवा देणारे राज शिवराजू हैद्राबादच्या लिटील फ्लावर शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या कुटूंबातील ते पहिले आयटी पदवीधारक आहेत. त्यांनी इ कॉमर्सच्या क्षेत्रात सब रेंट करो नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. ते म्हणाले की सब रेंट करो अशाप्रकारचा नवा विचार आहे. या व्यापाराने गृहिणी आणि विद्यार्थी यांना आकर्षित केले आहे. ते म्हणाले की, “ आमच्या जवळ अशा अनेक वस्तु असतात, ज्या न वापरल्याने पडून खराब होत असतात. अशावेळी त्यांचा वापरही व्हावा आणि त्यातून चार पैसेही मिळाले तर त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असेल, उलट त्या नुसत्या पडून राहुन होणा-या खर्चा पासून तरी सुटका मिळेल.”

image


राज यांनी सांगितले की, संगणक, लॅपटॉप, कॅमेरा, रेफ्रिजरेटर, कार, मोटार सायकल यांच्याशिवाय अशा अनेक वस्तु आहेत ज्या भाड्याने देता येतात. सध्या त्यांच्याकडे अशी आठ हजार उत्पादने आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की पहिल्यांदा या स्टार्टअपचा ते देशाच्या अन्य राज्यात विस्तार करत आहेत. त्यानंतर त्याचा विस्तार जगभरात केला जाईल. सध्या भारतात दहा मोठ्या शहरात याचे जाळे पसरले आहे. त्यांचा उद्देश आहे की दोन वर्षात तीन हजार लोकांना यातून रोजगार मिळू शकतो.

राज यांच्या जीवनात नवा स्टार्टअप सोपा नव्हता. त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरूवात खूप आधी केली होती. एन आय आय टी मध्ये काही दिवस काम केल्यावर त्यानी १९९४च्या नंतर जिओग्राफिक मॅप कन्वर्शन मध्ये आपल्या नव्या कंपनीची स्थापना केली. व्यापार चांगला होत होता. ते पाहून त्यांनी वडीलांनाही नोकरी सोडून त्यात काम करण्यास सांगितले, पण एक दिवस अचानक सारे काही संपले. या घटनेचा उल्लेख करताना ते म्हणाले, “ त्यावेळी कंपनीत ४००लोक होते. अमेरिका सरकारकडून उत्तर अमेरिकेत एक प्रकल्प मिळाला. त्यासाठी स्वत: जवळच्या जमा पुंजीसह मी बँकेचे कर्ज काढले. काम पूर्ण होणार होते पण पौत्रिर्कामध्ये मोठे वादळ झाले त्यात सारे काही सेकंदात समाप्त झाले. त्यावेळी साठ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यात स्थितीत मी हार मानली नाही. जीवन पुन्हा सुरू करण्यासाठी नोकरी केली”

राज यांनी डेलॉइट मध्ये आठ वर्ष काम केले. आता पुन्हा त्यांना विचार आला की, आपली कंपनी सुरू करावी. ते सांगतात की, “ आजतर माझा परिवार मित्र सारे सोबत आहेत. सा-यांनी मला प्रेरीत केले. आता भविष्यात माझ्याकडे खूप सारे प्रस्ताव आहेत.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आदिवासींचा ऑक्सिजन 'वटवृक्ष' : सॉफ्टवेअर इंजिनिअरने दाखवला 'विकास 'मार्ग

ʻअर्बन लॅडरʼचे उपाध्यक्ष रजत उपाध्याय यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

एका सामान्य विद्यार्थ्याचा असामान्य अविष्कार !

लेखक : एफ.एम.सलीम

अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील

    Share on
    close