संपादने
Marathi

मुलीचे महागडे लग्न टाळून औरंगाबादच्या व्यावसायिकाने गरिबांना दान केली ९० घरे !

Team YS Marathi
16th Dec 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

मनोज मुनोत, हे महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील व्यावसायिक आहेत, त्यांनी जे काही केले त्यातून अनेकांसाठी नवा आदर्श निर्माण झाला आहे. थाटामाटात मुलीच्या लग्नाचा बार उडविणे शक्य असताना मनोज यांनी ९०घरे बेघरांना त्याच पैश्यातून दान केली आहेत.

बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिध्द असलेल्या मनोज यांनी सांगितले की, यासाठी त्यांना स्थानिक आमदारांकडून प्रेरणा मिळाली,त्यांनीच त्यांना ही मानवीय संकल्पना सांगितली. मनोज यांनी त्यापूर्वी मुलीच्या लग्नावर ७०-८०लाख रुपये इतका खर्च करण्याची तयारी केली होती.पण मग त्यांनी हाच पैसा उदात्त कामासाठी खर्च करण्याचे ठरविले. “ मी चार घरात मोलमजूरीची कामे करतो, आता मला विज आणि पाणी कसे मिळणार याची चिंता करण्याची गरज नाही. दरमहिन्याला भाडे देण्याचेही मला त्रास नाहीत,” शब अली शेख एक लाभार्थी सांगत होता. सुमारे ४० कुटूंबाना या नव्या घरातून आसरा मिळाला आहे. मनोज यांचा हा निर्णय त्या सर्वाना सुखावणारा आहे. त्यांची मुलगी श्रेया यांनी देखील त्यांच्या या निर्णयाला प्रोत्साहन दिले त्यातून हे सारे घडून आले.

image


मागील महिन्यात गली जनार्दन रेड्डी यांच्या थाटामाटाच्या लग्नाबद्दलच्या बातम्या झळकल्या होत्या, विशेषत: त्यावेळी नोटबंदीवरून सर्वत्र आक्रोशाचे वातावरण असताना ते उठून दिसत होते. कर्नाटकच्या माजी मंत्र्यांच्या घरातील बंगळुरूमध्ये झालेल्या या शाही विवाहाची सगळीकडे चर्चा होती. याच महिन्यात त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीचा विवाह पार पडला. त्यावर देखील टीका टिपणी झाली.  

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags