संपादने
Marathi

वंचित मुला-मुलींच्या जीवनातील बहर म्हणजे ‘आयपर’

18th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

डॉ. बिजली मलिक या इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल अँड एज्युकेशनल रिसर्च (IPER) (आयपर) या स्वयंसेवी संघटनेच्या संचालिका आहेत. आयपर ही शिक्षणाला वाहिलेली संघटना आहे. सध्या ‘आयपर’ कोलकत्यातील दक्षिण भागातील झोपडपट्टी परिसरातून एक प्राथमिक आणि एक माध्यमिक शाळा चालवते. एकूण १४४५ विद्यार्थी आहेत. त्यात ६७२ मुले तर ७६३ मुली आहेत.

image


बिजली मलिक सांगतात, ‘‘आमच्या ३० केंद्रांत मिळून ३९ शिक्षक आहेत. मुलांच्या विकासासाठी ‘आयपर’च्या कितीतरी योजना आहेत. निराधार मुलांसाठी एकीकृत कार्यक्रम हा त्यापैकी एक. मुलांमधल्या उणिवा दूर करणे तसेच त्यांना स्वावलंबी बनवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून ही मुलेही समाजाच्या मुख्य प्रवाहात यावीत. मुलांचे शिक्षण, आहार, स्वच्छता, आरोग्य, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, मनोरंजनाच्या सुविधा यादेखिल या कार्यक्रमाचा एक भाग आहेत. शिवाय मुलांसोबत दुर्व्यवहार तसेच अन्य कुठल्याही प्रकारच्या शोषणापासून मुलांची रक्षण करणे, ही बाबही यात अंतर्भूत आहेच. गतवर्षी वर्षभरातच कोलकत्यात ठिकठिकाणी असलेल्या आपल्या १६ केंद्रांच्या माध्यमातून ‘आयपर’ ५०० मुलांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले आहे. वंचित मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा आणि पोषण आहार पुरवणे हा आमचा दुसरा एक उपक्रम आहे. बाल हक्क आयोग आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या उद्दिष्टांनुरूप बालकामगार विरोधी अभियानही आम्ही राबवतो. एकूण ३५० मुलांना आतापर्यंत या उपक्रमाचा लाभ झालेला आहे.’’

image


बिजली मलिक यांची एकूणच कारकीर्द समाजाला वाहिलेली आहे. Soroptimist International of South Kolkata च्या त्या संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था वंचित महिला आणि मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी झटते. १९९१ पासून बिजली या International Society of Prevention of Child Abuse and Neglect –ISPCAN च्या सदस्य आहेत. पश्चिम बंगाल सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयांतर्गत सिगरेट आणि अन्य तंबाखूउत्पादने कायदा २००९ तसेच सार्वजनिक स्थळांवर धुम्रपान अधिनियम २००८ च्या योग्य अंमलबजावणीसाठी स्थापन राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या सदस्याही त्या आहेत. जून २०११ मध्ये बिजली मलिक या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी (२०१२-२०१७) मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या शिक्षक शिक्षण कार्यकारी समूहाच्या सदस्य म्हणूनही त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पश्चिम बंगाल शासनाकडून ८ नोव्हेंबर २०११ रोजी २४ परगणा जिल्ह्यासाठी स्थापन बालकल्याण समितीच्या त्या अध्यक्षाही आहेत.

आयपरचे सामाजिक योगदान

• मुले आणि महिलांच्या हक्कांसबंधी समाजात जागरूकता आणणे.

• स्वत:ला स्वत:चे संरक्षण करता यावे म्हणून मुलांचा चमू तयार करणे आणि मुलांच्या हक्कांचे उल्लंघन होऊ नये म्हणून संबंधितांमध्ये त्यासाठी जागरूकता आणणे.

• असुरक्षित तसेच संभाव्य असुरक्षित मुलांसाठी अनौपचारिक शिक्षण.

• प्रौढ महिलांसाठी रोजगारोन्भिमुख शिक्षण, प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.

• अनौपचारिक केंद्रांतून हजर राहणाऱ्या मुलांना पूरक खाद्य उपलब्ध करून देणे.

• रुग्णालयांच्या (फिरत्या रुग्णालयासह) माध्यमातून रोगप्रतिबंधक तसेच आरोग्याच्या अन्य सेवा उपलब्ध करून देणे.

• सामाजिक आणि सांस्कृतिक विकास तसेच विविध कार्यक्रमांचे व प्रदर्शनांचे आयोजन करणे.

• औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून वंचित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. सातत्याने त्यांची मदत करणे, जेणेकरून त्यांनी मध्येच शाळा सोडू नये.

• विद्यार्थ्यांची गळती शून्य टक्क्यांवर आणणे. त्यासाठी शिक्षकांकरिता प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.

• वैयक्तिक तसे सामूहिक समुपदेशन करणे. आवश्यकता भासल्यास थेट वैद्यकीय इलाजासंबंधी उपाययोजना करणे.

• मुलांचे शिक्षण, जेवण आणि आरोग्य या सुविधांसाठी प्रायोजकांची व्यवस्था करणे.

• पर्यायी रोजगारासाठी महिलांना सुयोग्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.

• पर्यावरण संवर्धन तसेच प्रदूषण निवारणासंदर्भात जागरूकता आणणे. कुणी पर्यावरणाला हानी पोहोचवत असेल तर त्यात सक्रिय भूमिका घेणे.

• पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्डांतर्गत प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणे.

• कल्याणी विद्यापीठाशी संलग्न ‘समाजकार्य’ तसेच ‘व्यवस्थापन’ या विषयात पदविका प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.

आयपर दारूचे व्यसन आणि मादक पदार्थांच्या सेवनावर प्रतिबंधाच्या दिशेने समुपदेशन आणि स्वजागरूकता अभियानही चालवते.

लाभार्थी म्हणतात…

• मोलकरणीचे काम करणाऱ्या दक्षिण कोलकत्यातील मिठू मंडल म्हणतात, ‘‘नवरा नाही. दोन मुलींचा सांभाळ एकटीने करणे माझ्यासाठी कठीण होते. धाकट्या मुलीची जबाबदारी आयपरने सांभाळली आणि माझा भार हलका झाला. जेवण, शिक्षण आणि आधार असं सगळं तिला आयपरकडून मिळतंय. मी आभारी आहे.’’

• सुभद्राही घरकामगार आहेत, त्यांची गोष्ट जरा वेगळी. त्या सांगतात, ‘‘माझा नवरा दारूडा आहे. कुटुंबाकडे त्याचे लक्ष नाही. मी लोकांची धुणीभांडी करते, पण तेवढ्यात दोन मुलींचे सगळे पाहणे कसे जमायचे. शेजाऱ्यांनी मला आयपरबद्दल सांगितले. मी मुलीला तिथे दाखल केले. आता मी एका मुलीचा सांभाळ करते. माझा भार हलका झालाय.’’

‘निरंतर शिक्षणाला पर्याय नाही’

मलिक म्हणतात, ‘‘मला वाटते. निरंतर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. निरंतर शिक्षणाच्या विकासासाठी समाजातून सर्व स्तरातनं योगदान मिळायला हवं. भावी पिढीला केवळ विपरित परिस्थितीमुळे शिकता न येणं यासारखं दुसरं दुर्दैव नाही. शिक्षणाच्या हक्कापासून कुणीही वंचित रहायला नको. आम्ही सामूहिक स्तरावर मुलांसह मुलांसाठी काम करण्यावर भर देतो. मनापासून काम करतो. २ ते ६ वयादरम्यानच्या मुलांशी निगडित शिक्षक आणि पालकांसाठी ‘बालपण आणि बालविकास’ नावाचा एक सहा महिन्यांचा कोर्सही आम्ही सुरू केलेला आहे. हे प्रशिक्षण मुलांशी निगडित या सगळ्यांनाच मुलांची मानसिकता, मुलांचे मनोव्यापार याविषयी मार्गदर्शन करण्यात यशस्वी ठरेल. जेणेकरून त्यांच्या माध्यमातून ही मुले सुनियोजित पद्धतीने शिक्षण प्राप्त करू शकतील. एक चांगले वातावरण मुलांच्या दृष्टीने तयार होईल. मुलांचा शारीरिक, मानसिक विकास होईल.’’

युवकांसाठी बहुविध प्रशिक्षण केंद्र

आयपरने दक्षिण कोलकत्यातील वंचित युवकांसाठी बहुविध प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहे. झोपडपट्टीतील तसेच बेघर मिळून २८ मुलींसाठी आयपरने आधार केंद्र प्रायोजित केलेले आहे. ‘कॉम्प्युटर ऑन व्हिल’ हा एक आगळा कार्यक्रम आयपरने राबवलेला आहे. कार्यक्रमांतर्गत एक मोबाईल व्हॅन कॉम्प्युटर आणि प्रशिक्षकांसह झोपडपट्टीत येते आणि येथील युवक-युवतींना ॲनिमेशन सॉफ्टवेअर आदींचे प्रशिक्षण देते. जेणेकरून या युवकांना या क्षेत्रात काम सुरू करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता यावे. सध्या हा कार्यक्रम कर आदी वादांमुळे तुर्तास थांबवण्यात आलेला आहे. तो लवकरात लवकर सुरू व्हावा म्हणून आयपरचे प्रयत्न जोमात सुरू आहेत. आयपरचे असेच एक स्कूल ऑन व्हिलही आहे, जे थेट वाड्यावस्तीत जाऊन मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देते.

‘‘आयपरमध्ये आम्ही मुलींना आत्मरक्षणाचे धडेही देतो. तायक्वांदोचे नियमित प्रशिक्षण सुरू असते. आम्ही प्रशिक्षित केलेल्या वंचित घटकांतील ६ मुलींनी यंदा बंगळुरू आणि नेपाळमध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पुरस्कारही पटकावले.’’ हे नमूद करताना बिजली मलिक यांचा अभिमान दाटून आलेला असतो.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags