संपादने
Marathi

कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन सन्मान करणारं व्यासपीठ ‘अल्दोशिक’

sachin joshi
7th Nov 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात अनेक संदर्भ बदलत आहेत. ऑनलाईन हा शब्द आता परवलीचा झाला आहे. या नवीन माध्यमांचा थेट परिणाम आता आपल्या जीवनावरही होऊ लागला आहे. आपल्या ऑनलाईन असलेल्या प्रतिमेचा परिणाम प्रत्यक्ष जीवनातही होतोय. तुम्हाला नोकरी देण्याआधी कंपन्या आता तुमच्या सोशल मीडियाबद्दल माहिती घेतात. तर महाविद्यालयात असतानाही तुमच्या ऑनलाईन पोस्टवरुन तुमचा स्वभाव समजू शकतो. त्यामुळे जर लोकांना त्यांच्या कामाबद्दल ऑनलाईन सन्मानित केलं गेलं तर? आश्चर्य वाटलं ना...हो पण हे खरं आहे. अल्दोशिक टेक्नॉलॉजिचे संस्थापक अंकुरकुमार यांनी कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी 'सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस' (SaaS) या व्यासपीठाची स्थापना केली.


image


“आम्ही रेकग्नाइज,रिवार्ड, रिडीम आणि ऍनालाईज या संकल्पना एकत्रित करुन एक प्रक्रिया बनवली,” असं अंकुर सांगतात. या संकल्पनांचा विस्तार खालीलप्रमाणे करता येईल

रेकग्नाईज- यूजर आणि त्यांच्या टीमसाठी एक ध्येय किंवा सर्कलचं काम ठरविलं जातं. ध्येय पूर्ण केल्यास प्रत्येक यूजरला बक्षीस दिलं जातं. याशिवाय टीमनं त्यांची उद्दीष्टं पूर्ण केल्यास प्रत्येक टीमलाही बक्षीस दिलं जातं.

रिवॉर्ड- पीअर-टू- पीअर (व्यवस्थापक, गटप्रमुख, शिक्षक या सर्वांना एकत्र करून) प्रकारात जेम्स आणि प्रमाणपत्र दिले जातात. जेम्स हे एक आभासी चलन आहे. तुम्ही जेम्स विकू शकता आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करून ते इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करू शकता.

रिडीम- बक्षीस म्हणून मिळालेले जेम्स तुम्ही ऑनलाईन बाजारपेठेत विकू शकता. ही बाजारपेठ ८० ब्रँड्सची आहे. याशिवाय हे जेम्स स्कूबा डायव्हिंग किंवा जहाज प्रवास करण्यासाठीही वापरता येतात.

एनालिटीक्स- कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाबद्दल ऑनलाईन सन्मानित केल्यानंतर काय फरक पडला आहे हे समजून घेण्यासाठी या तंत्राचा वापर करतात.


image


“पारंपारिक बक्षीस प्रक्रियेत खूप अडचणी असल्य़ाचं आमच्या लक्षात आलं. बक्षीस मिळालं नाही म्हणून कर्मचारी नाराज असायचे. तर निधी नसल्यानं व्यवस्थापनही चिंतीत असायचे. अधिक माहिती घेतल्यानंतर ज्या कंपन्या बक्षीसं देतात त्यांनाही खूप फायदा होत नसल्याचं समजलं,. वार्षिक मूल्यांकनाची पद्धत खूप जुनी झाली आहे आणि आता या बक्षीस देण्याच्या प्रक्रियेत सोशल मिडीया मोठी भूमिका निभावू शकतो. “असं अंकुर म्हणतात.

अल्दोशिकचं काम मुंबई आणि दिल्लीतून चालतं. त्यांच्या टीममध्ये ११ जण आहेत. त्यातले बरेचजण शिकाऊ आहेत.ही टीम कंपन्यांना त्यांची उत्पादनांची उपयुक्तता आणि स्वत:चं व्यासपीठ निर्माण करण्यासाठी तयार करते. चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला पाहिजे ही कंपन्यांची मानसिकता असते. त्यामुळे आमचं तंत्र त्यांना समजावणं कठीण जातं, असं अंकुर म्हणतात.

अल्दोशिकची रिवार्ड आणि रेकग्निशन प्रणाली बांधकाम क्षेत्रात वापरली गेली आहे. कंपन्यांनी दलालांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक आणि इतर बक्षीसं दिली. स्टार्टअपच्या बाबतीत ते बिगर आर्थिक रेकग्निशन प्रणालीचा उपयोग करतात. कंपन्यांना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची इच्छा असते पण ते कर्मचाऱ्यांना चांगला पगारही देऊ शकत नाहीत, अशावेळी इ रिवॉर्ड्स आणि इ सर्टिफिकेट्स उपयुक्त ठरत असल्याचं अंकुर सांगतात.


image


अल्दोशिकचं ऑनलाईन मार्केटिंग हेगुगल ऍड्सवर होत तसंच त्यांची जाहिरात तोंडीही होत असते. आम्हाला अजूनही आर्थिक मर्यादा आहेत, आमचं नेटवर्क वाढवण्यासाठी अनेक एचआर इव्हेंट्स आणि सेमीनारमध्ये आम्ही भाग घेतला. कंपनीने नुकताच सहा ग्राहकांसोबत करार केला आहे आणि त्यांचा प्रतिसाद सकारात्मक असल्याचं अंकुर सांगतात. “भांडवल उभारणीसाठी आम्ही खूप लोकांना भेटलो आणि एक गोष्ट शिकलो की तुम्ही छोट्या लढाया जिंकून मोठे सम्राट बनू शकत नाहीत,” अशा भावना व्यक्त करुन अंकुर व्यवसायातील एक सत्य सांगून जातात.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags