संपादने
Marathi

"विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याकरता आयआयएम ग्रज्युएटची मोठ्या पगाराकडे पाठ "

Team YS Marathi
5th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

भारतात 'शिक्षण' ही मोठी बाजारपेठ आहे. या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. सर्वसाधारणपणे आपल्या शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थेतून लोकांना फारसं समाधान मिळत नाहीये. आयआयएम -अहमदाबादमधून पोस्टग्रॅज्युएट झाल्यावर रविकुमार यादावाल्ली यांनी शिकवायला सुरुवात केल्यावर हीच गोष्ट प्रामुख्याने त्यांना आढळली.

त्यांनी 'मेवरिक एडयुटीच' (Maverick Edutech) ची सुरुवात केली . आंध्र विद्यापीठातून २००८ मध्ये रवि यांनी इलेक्ट्रोनिक्स अॅन्ड कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केल्यावर २ वर्ष टीसीएस मध्ये काम केले. २०१० मध्ये ते आयआयएम-अहमदाबादमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायला दाखल झाले. महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच मुलांमधल्या सर्जनशीलतेला वाव कसा देत येईल ? याबद्दल त्यांच्यात रस निर्माण झाला. शाळांमध्ये विविध गोष्टींसाठी आवश्यक असणारी साॅफ्टवेअर बनवायला त्यांनी याकाळात सुरुवात केली. या क्षेत्राची जास्तीत जास्त माहिती मिळवण्याकरता ते शिक्षकांशी संवाद साधू लागले. पण त्यांच्या हाती काही ठोस लागलं नाही. रवी म्हणतात, "शिक्षकांनी मला त्यांची मतं सांगितली पण वस्तुस्थिती नाही."

आयआयएम-अहमदाबादमध्ये शिक्षण सुरु असताना, गुजरात सरकारच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकरता असलेल्या प्रकल्पात त्यांनी 'पाॅलीसी इवॅल्युएटर ' म्हणून काम पाहिलं. 'विद्यातरंग' या प्रकल्पाद्वारे त्यांनी मोबाईल फोनच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साहाय्य पोहोचवले. तसेच त्यांनी जामनगरमधील केडीएसवी (KDSV) शाळांचा दर्जा सुधारण्याच्या कामातही भाग घेतला.


image


प्रश्नाचं मूळ समजण्याकरता रवी यांनी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना असं लक्षात आलं की, तंत्रज्ञान हा खरा प्रश्न नसून वर्ग आणि विषय शिकवण्याच्या पद्धतीत बदल व्हायला हवा. ते तिथे आले तेव्हा ६० पैकी ३० जण नापास अशी परिस्थिती होती. त्यांनी काम सुरु केल्यावर या परिस्थितीत सकारात्मक बदल होत नापासांचे प्रमाण ३० वरून ३ वर आलं.

रवी सांगतात, "माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरु असताना अहमदाबादच्या पोदार शाळेत इयत्ता सातवीचा पूर्णवेळ विज्ञान शिक्षक म्हणून काम करताना मर्यादा लक्षात आल्या. शिक्षकांकरिता टेक्नाॅलाॅजिकल सोल्युशनस् बनवण्यात मी नेहमीच उत्सुक असायचो. म्हणून मी मार्केट रिसर्च करता शाळेत गेलो. पण मला जाणवलं की , शिक्षकाचं अंतर्मन मी मार्केट रिसर्चने जाणू शकत नाही. मग मी त्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. मी माझे स्वतःचे काही 'पाठ' बनवले. मुलांना समजून घ्यायला लागलो, शिक्षकांच्या गरजा, पालकांच्या अपेक्षा आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना समजायला, शिकायला सोप कसं जाईल हे समजणाऱ्या असंख्य गोष्टी आणि पाठ."

वर्गात शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि बाहेरच्या जगातली दरी त्यांना जाणवली. रवी म्हणतात, "मुलं १/२+१/२ हे अगदी सहज सोडवू शकत होते. पण त्यांना प्रत्यक्ष आयुष्यातली समीकरण कळत नव्हती."

शिक्षणातल्या सर्जनशीलतेचा ध्यास जपण्यासाठी रवी 'आय डिस्कवर एजुकेशन' मध्ये रुजू झाले. तिथे त्यांनीबिज़नेस डेवलपमेंट आणि करिकुलम डेवलपमेंटची जवाबदारी सांभाळली. ईशान्य भागात कंपनीने कामाला सुरुवात केली. तिथला प्रमुख म्हणून काम करताना १ कोटीचं उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी झाले. या काळात देशभरात फिरून त्यांनी शंभरच्या वर शाळांना भेटी दिल्या आणि प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पण तरीही हे पुरेसं नव्हत. रवी अजूनही 'क्रिएटिविटी' चा प्रश्न सोडवू शकले नव्हते.

त्यानंतर ते फ्रॉएबेल गिफ्ट्सच्या संपर्कात आले. १९व्या शतकातले शिक्षणतज्ज्ञ आणि किंडरगार्टनचे जनक फेड्रिक फ्रोबल यांनी बुद्धीला चालना देणाऱ्या शैक्षणिक खेळण्यांची संकल्पना आणली. रवी यांनी फ्रॉएबेल गिफ्ट्सचा सखोल अभ्यास करून १५ ऑगस्ट २०१३ ला शिक्षणाच्या या नवीन संकल्पनेत उडी घेऊन आपला व्यवसाय सुरु केला.

नुकतेच हैद्राबादचे गुंतवणुकदार रवी मंथ यांनी या कंपनीत ६५ लाख रुपये गुंतवलेत. रवी सांगतात,"शाळांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय."

ते म्हणतात, "हैद्राबादमधील १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांच्या उत्तम प्रतिसादानंतर आम्ही आता शाळांसोबत काम करायचं ठरवतोय. जेणेकरून मुलांना मुख्य अभ्यासक्रम सहज सोप्यारितीने पटकन शिकता येईल. आम्ही आमचा 'अमेजिंग क्लासरूम्स'(Amazing Classrooms) हा अभ्यासक्रम बनवलाय. ज्यात आम्ही फ्रॉएबेल गिफ्ट्सचा वापर करून पाचव्या इयत्तेपर्यंत गणित आणि इंग्रजी विषय शिकवतो."

सध्या पाच राज्यांतील १३ शाळांसोबत ही कंपनी काम करत आहे. रवी यांची १० जणांची टीम कंटेंट डेवलपमेंट आणि सेल्सचे काम पाहते. येत्या काळात आणखी शाळांना या प्रकल्पात सामील करून घ्यायचं त्यांचं ध्येय आहे.

वेबसाईट : http://www.amazingclassrooms.in

लेखक : आदित्य भूषण द्विवेदी

अनुवाद : साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags