संपादने
Marathi

ऑल लॉक्ड अप

जेव्हा तुम्ही काही मुलभूत गोष्टींकडे लक्ष देता तेव्हा तुमच्या घराची सुरक्षा हमखास सोपी होऊन जाते.

Team YS Marathi
13th Aug 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

तुम्ही असा कोणता दिवस आठवू शकता का जेव्हा तुम्ही सकाळचे वर्तमानपत्र उघडले आणि त्यात घरफोडीची बातमी वाचली नाही? तुम्हाला सुरक्षित वाटत असलेल्या तुमच्या विभागामध्ये घडलेल्या गुन्ह्याबद्दल काय म्हणाल? सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्हाला तुमच्या स्वत:च्याच घरात सुरक्षित वाटते का? तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकता का तुमच्या बिल्डींगची सुरक्षा प्रणाली सर्वात सुरक्षित आहे?

सध्याच्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. ते अधिक कपटी आणि वास्तववादी आहे. जेष्ठ नागरिकांविरोधात घडलेल्या गुन्ह्याच्या ३,९८१ प्रकरणांची नोंद २०१४ या वर्षी करण्यात आली होती आणि हे प्रमाण अधिकच वाढतच चालले आहे. आणि हे गुन्हे त्या व्यक्तींकडून केले जातात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. आणि ते सुद्धा तुम्हाला सुरक्षित वाटत असलेल्या जागांवर. तर अश्या परिस्थितीमध्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय कराल? तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित आहे याची खातरजमा तुम्ही कशी करून घ्याल? सर्वच आशा संपुष्टात आल्या आहेत असेही नाही. अश्या अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांवेळी, असे काही मार्ग आणि साधने आहेत ज्यांच्या सहाय्याने आपल्या प्रियजनांसाठी आणि आपल्याला ज्यांची काळजी वाटते त्यांच्यासाठी आपण सुरक्षेच्या भक्कम योजना तयार केल्या आहेत याबाबतीत आपण खात्रीशीर राहू शकतो.


image


तुमचे घर सुरक्षित आहे याची खात्री करून घेण्याचे अनेक मार्ग आणि साधने आहेत. पहिला आणि सर्वात मुलभूत मार्ग म्हणजे तुमच्या सभोवताली घडणाऱ्या गोष्टींबद्दल सतर्क असणे. तुमच्या घराबाहेर सहसा काय घडते याची स्वतःला ओळख करून देणे- त्यामुळे नेहमीपेक्षा कोणतीही वेगळी संशयास्पद गोष्ट तुम्ही लगेच हेरु शकाल. तुम्ही अनोळखी कारवर किंवा कोणत्याही स्पष्ट हेतुशिवाय तुमच्या परिसरात घुटमळणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर लक्ष ठेऊ शकता. तुमच्या शेजाऱ्यांशी मैत्री वाढवा- त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही तुमचे घर एकटे सोडून जाता, तेव्हा ते त्यावर लक्ष ठेवू शकतात.

तुमच्या घराची दारे आणि खिडक्या सुरक्षित आहेत का यांवर नेहमीच संशयितांचे लक्ष असते. उत्तम दर्जाच्या लॉकिंग यंत्रणा बसवून घ्या आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा त्या आपल्या जागेवर आहेत याची खात्री करून घ्या. तंत्रज्ञान आता आपल्याला अश्या निष्णात सुरक्षा प्रणालीचा वाव मिळवून देते जी केंद्रीय सुरक्षा संस्थांशी जोडली जाऊ शकते. एक लहानसा ट्रिगर सिस्टमला इशारा देतो जो पोलीस किंवा अग्निशामक विभागासारख्या कुशल व्यवस्थांना संदेश पोचवून अवघ्या काही मिनिटांमध्ये घटनेच्या ठिकाणी त्यांना पाचारण करू शकतो.

सुरक्षिततेचा सर्वात महत्वाचा भाग हा शेवटी माणसाच्याच हातात आहे. तुमच्या कुटुंबाच्या हितासह आणि सुरक्षेसह अगदी विश्वासाने तुम्ही लोकांना कामावर ठेवाल. पण याची खात्री कशी करून घ्यायची की ती चांगली माणसे आहेत? त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही हे तुम्हाला कसे कळेल? याचे उत्तर अगदी सोपे आहे- त्यांची पार्श्वभूमी तपासा. तुमच्या सिक्युरिटी गार्डस पासून ते घरच्या कामात तुम्हाला मदत करणाऱ्या व्यक्तीपर्यंत- त्यांना कामावर ठेवण्याचा विचार करताना तुमचे पहिले पाउल हे असले पाहिजे की तुम्ही तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देता आणि त्यांचे पोलीस व्हेरीफिकेशन करता.

एक जेष्ठ नागरिक म्हणून एकटे राहणे तुम्हाला स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवते. अनेक वृद्ध जे एकटे राहतात त्यांनी आपल्या तरुण मुलासोबत राहणे श्रेयस्कर आहे.

अगदी वृद्ध होण्याच्या प्रक्रियेपासूनच जेष्ठ नागरिकांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही प्रकारच्या दुर्बलतेचा अनुभव येऊ लागतो. जसजसे लोक म्हातारे होत जातात, तसतशी एखाद्या गुन्ह्याला बळी पडण्याची त्यांची शक्यता वाढत जाते. ते त्या गुन्हेगारांचे ही बळी ठरू शकतात जे वृद्ध लोकांना लक्ष्य करतात.

तुम्हाला मदत करण्यासाठी, या प्रक्रियेतून जाण्यासाठी, इथे तुमच्यासाठी एक तयार तपासणी प्रक्रिया (रेकनर) दिली आहे. तुमच्या घरकामासाठी किंवा जेष्ठ नागरिकासाठी काळजी घेणाऱ्या (केअरटेकर) एखाद्या व्यक्तीला कामावर ठेवताना, खालील प्रक्रिया लक्षात ठेवा.

• सर्विस कंपनीची मदत घ्या: कोणत्याही सर्विस कंपनीची मदत घेण्यापूर्वी, त्यांच्या सेवेच्या विश्वसनीयतेची खातरजमा करून घेण्यासाठी त्यांचे संदर्भ तपासून घ्या. कंपनीला हे विचारण्यास विसरू नका की ते कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमीची तपासणी कोणत्या प्रकारे करतात.

• तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तपासणी करा: तपासा की त्यांच्या नावावर एखादा गुन्हा तर नोंद नाही ना. जर तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये घरगुती नोकरदार तपासणी सेवा (डोमेस्टिक हेल्प व्हेरिफिकेशन सर्विस) उपलब्ध आहे, तर तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अर्ज करा. (अॅप्पलीकेशन फॉर्म सबमिट करा).

• कागदपत्रांची तपासणी (डॉक्यूमेन्ट व्हेरिफिकेशन): त्यांचा पत्ता, संपर्क क्रमांक, ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान पत्र इत्यादी आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो घ्या.

• संदर्भ: तुमच्या पार्श्वभूमी तपासणीचा एक भाग म्हणून संदर्भ तपासा. कामावर ठेवण्यापूर्वी संदर्भ म्हणून त्यांनी सांगितलेल्या व्यक्तींशी, संस्थांशी बोलून घ्या.

एकटे राहत असताना जेष्ठ नागरिक काही टिप्स लक्षात ठेऊ शकतात

• अनोळख्या व्यक्तींपासून दूर राहा: अनोळख्या व्यक्तीला कधीही तुमच्या घरात येऊ देऊ नका. जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमच्या दरवाज्यावर कोणतीही सुचना (नोट) सोडून जाऊ नका, आणि तुमच्या किल्ल्या चटईखाली किंवा इतर चटकन लक्षात येणाऱ्या ठिकाणांवर लपवू नका.

• दरवाज्याची सुरक्षा: तुमचा दरवाजा कधीही थेट उघडू नका. पीपहोल बसवून घ्या आणि त्याचा वापर करा. दारे आणि खिडक्यांवर उत्तम दर्जाची कुलुपे बसावा. जेव्हा तुम्ही घराबाहेर जाता किंवा झोपण्यास जाता, त्यापूर्वी बाहेरील सर्व दारे आणि खिडक्या बंद करून घ्या. अगदी काहीच वेळासाठी का होईना पण तुमचे दरवाजे बंद करणे विसरू नका. खिडक्यांवर पडदे लावा.

• सिक्युरिटी सिस्टम बसवून घ्या: भेटायला येणाऱ्या माणसांसाठी क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरासह असलेली नवीन इंटर्नल सिक्युरिटी सिस्टम बसवून घेणे हे प्रत्येक जेष्ठ नागरिकाच्या घरासाठी अनिवार्य आहे.

• क्विक रिस्पोन्स टीम (त्वरित प्रतिसाद गट): इमर्जन्सी रिस्पोन्स टीम (ईआरटी) हा अश्या लोकांचा गट आहे जे कोणत्याही इमर्जन्सी घटनेसाठी तयार असतात आणि त्यांना लगेच प्रतिसाद देतात, जसे की मेडिकल इमर्जन्सी, घुसखोरी इत्यादी

जर मुलाला सांभाळायला एखादी व्यक्ति किंवा आया आहे, तर या प्रक्रियेमध्ये पुढे, तुमचे अंतर्ज्ञान वापरा आणि संकोच न बाळगता चौकशी करा- मुलासोबतच्या तुझ्या कामाबद्दल आम्हाला सांग. एक आया म्हणून काम करण्याचे तू का ठरवले? अर्भकासोबत/बालकासोबत असताना तुला कोणत्या गोष्टी करायला सर्वात जास्त आवडते? जर मूल रागीष्ट असेल तर तु काय करशील? शिस्त लावण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर तू करते? कृपया मला एक उदहरण दे की जर तुझ्या देखरेखीखाली मुलावर एखादे संकट आले/त्याला अपघात/दुखापत झाली तर तो प्रसंग तू कसा हाताळशील?

जर तुम्ही एखाद्या सिक्युरिटी गार्डला कामावर ठेवण्याचा विचार करत आहात, तर वरील सांगितलेल्या गोष्टींच्या तपासणीसह, खालील गोष्टींकडेही लक्ष द्या.

• पात्रता तपासणी: त्याच्याजवळ असलेल्या पात्रतेची सत्यता जाणून घेण्यासाठी त्याची पार्श्वभूमी तपासा.

• वैद्यकीय तपासणी: नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या माणसाला काही विशिष्ट वैद्यकीय चाचण्यांना (मेडिकल टेस्ट) सामोरे जाण्याची विनंती करावी जसे की ड्रग्ज आणि अल्कोहोल स्क्रीनिंग, युरीन अॅनलायजेस, ब्लड अॅनलायजेस इत्यादी. हि प्रक्रिया गरजेची आहे, कारण यामुळे हे उघड होते की नोकरीसाठी अर्ज करणारी व्यक्ति निरोगी आहे किंवा नाही आणि सिक्युरिटी गार्डची जबाबदारी घेण्यास पात्र आहे किंवा नाही कारण हे असे काम आहे जे काही वेळेस अतिशय आव्हानात्मक आणि थकवणारेही असू शकते.

• पूर्वीच्या कामाचा अनुभव: मागील नियोक्त्याचा तपशील विचारा, त्याची खात्री करून घ्या आणि गार्डच्या वर्तवणूकीबद्दल आणि विश्वसनीयतेबद्दल मागील नियोक्त्याकडून फेर पडताळणी (क्रॉस चेक) करून घ्या तसेच तेथील नोकरी सोडण्याच्या त्याच्या कारणाचीही पडताळणी करा.

काही वेळेस हि प्रक्रिया कंटाळवाणी वाटू शकते. हे असे क्षण आहेत जेव्हा तुम्ही तुमचे काम साधण्यासाठी बाहेरील संसाधनांवर विश्वास ठेवू शकता. फेरपडताळणी करून घेण्यासाठी खाजगी सुरक्षा संस्थांकडे अतिशय गुंतागुंतीची प्रणाली असते. “टॉप्सग्रुपमधून एखाद्याला कामावर घेणे म्हणजे ती स्वतः आमची जबाबदारी असते.” असे टॉप्सग्रुप इंडियाचे उपाध्यक्ष आणि सीईओ, रमेश अय्यर म्हणतात. “आम्ही ज्या पद्धतीने भरती प्रक्रिया करतो त्यानुसार लोकांना अतिशय काटेकोर पार्श्वभूमी तपासणीमधून जावे लागते, ज्यामध्ये गुन्ह्याची नोंद शोधणे, पूर्वीच्या कामामध्ये घेतलेली योग्य ती काळजी आणि शैक्षणिक पात्रतेसह विविध चाचण्यांचा समावेश आहे जसे की ड्रग्ज टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्ट इत्यादी. आम्हाला वाटते की यासाठी एक कायदा संमत होण्याची निर्णायक गरज आहे ज्यामध्ये सर्व घरकामगार नोकरांसाठी आणि सिक्युरिटी कर्मचाऱ्यांसाठी पार्श्वभूमी तपासणी करणे हि अनिवार्य प्रक्रिया म्हणून जाहीर केली जाईल, ज्यामुळे चुकीच्या लोकांना कामावर ठेवणे टाळता येईल आणि त्यासोबतच हा कायदा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांसाठी एक प्रभावी निवारण म्हणूनही काम करेल. मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमधील रहिवाशी सोसायटींमध्ये वाहने जाळपोळीच्या नुकत्याच घडलेल्या घटनांकडे पाहता, सोसायट्यांमध्ये कॅमेरा आणि सेन्सर्ससह अलार्म मोनिटरिंग सोल्युशन्स बसवण्याची गरज आहे ज्यांच्यावर टॉप्स सारख्या व्यावसायिक संस्थेकडून आठवड्याच्या २४ तास (24x7) लक्ष ठेवले जाईल.”

टॉप्सग्रुप सारखी कंपनी, या सर्व गोष्टींचे योग्यरीतीने पालन होते आहे ना या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी नियमित तपासणी करते. शिक्षणापासून ते संदर्भ तपासणी-पार्श्वभूमी तपासणी पर्यंत, बोटांचे ठसे घेणे आणि पोलीस व्हेरिफिकेशन सारख्या तपशीलवार प्रक्रिया, सर्वोत्तम सुरक्षेची खात्री करून देण्यासाठी पुरेशा आहेत. याव्यतिरिक्त, कर्मचारी हा उच्च प्रशिक्षित असतो ज्याला देशभरातील १६ प्रशिक्षण केंद्रांपैकी एकामधून प्रशिक्षण दिले जाते. पीएसएआरए कायद्यांतर्गत हि संस्था प्रशिक्षण कार्यक्रम राबवते आणि विविध क्षेत्रांचे शिक्षण देते ज्यामध्ये मॅन सिक्युरिटी सर्विस, इलेक्ट्रोनिक सिस्टम, इन्वेस्टीगेशन अॅक्टीव्हीटी, एक्जीक्यूटीव्ह प्रोटेक्शन, ईव्हेन्ट सिक्युरिटी मॅनेजमेन्ट यांचा समावेश होतो.

तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता त्याला डोळे बंद करून आंधळेपणाने नोकरीला ठेवणे हे त्याच्यासाठी एखाद्या दुर्मिळ संधीपेक्षा कमी नाही, आणि हि तुमच्या आजूबाजूला असणारी वास्तविक स्थिती आहे. त्यामुळेच हिच वेळ तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची आहे.

याव्यतिरिक्त सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली जाऊ शकतात जसे की व्हिडियो कॅमेरा-सीसीटीव्ही बसवणे. जेव्हा सुरक्षेचा उल्लेख होतो तेव्हा हि एक अशी गोष्ट आहे जी प्रथम त्यांच्या मनात येते आणि हा नक्कीच तंत्रज्ञानाच्या प्रमुख वापरांपैकी एक वापर आहे, आणि बिल्डींग/सोसायटी कितीही लहान असली तरी गुन्ह्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी किमान या प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो. किंवा मोठ्या सोसायटीसाठी एकापेक्षा जास्त गार्डस कामावर ठेवले जाऊ शकतात. गार्डसच्या संख्येपेक्षा, कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी गार्डसला पुरेशे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. चांगली सुरक्षा असण्यापेक्षा अलार्म मोनिटरिंग सिस्टममध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. तुमच्या आवारातील घुसखोराची उपस्थिती उघडकीस आणण्यासाठी याची रचना केली गेली आहे- त्याला अटकाव करण्याची सुचना देण्यासाठी लोकल सायरनची कळ दाबल्यानंतर वाजत असलेला अलार्म थेट सिक्युरिटी मोनिटरिंग सेंटरशी संपर्क साधतो त्यामुळे योग्य प्रतिसाद देऊन मदत मिळवली जाऊ शकते. 

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags