संपादने
Marathi

नोकरी सोडली, कार विकली आणि सामील झाले स्वच्छ भारत अभियानात...

4th May 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

स्वच्छ भारत अभियानामार्फत लोक आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत, मात्र एक व्यक्ती आहे, जी लोकांना सांगत आहे की चालत्या गाडीमधून थुंकू नये, केळ्याचे साल किंवा चहाचे रिकामे ग्लास बाहेर फेकू नये. या व्यक्तीचे नाव अभिषेक मारवाह आहे. अभिषेक यांनी  कारमधून चालणा-या लोकांना महत्वाची शिकवण देण्यासाठी एक विशेष प्रकारच्या कच-याच्या डब्याचे नक्षीकामदेखील केले आहे, ज्याला कुणीही आपल्या कारमध्ये सहजपणे ठेवू शकतो आणि कच-याला कारमधून बाहेर फेकण्यापेक्षा या डब्यात ते कचरा टाकू शकतात. अनेकदा वापरल्या जाणा-या या डब्याला ते आता देशातील कोप-या कोप-यात पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. 

image


अभियंता असलेल्या अभिषेक मारवाह यांनी दोन वर्षापर्यंत अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले. जवळपास चार वर्षापूर्वी त्यांनी एका पुस्तकात वाचले होते की, जी व्यक्ती कचरा इकडे तिकडे फेकते ती वास्तवात मानवतेवर हा कचरा फेकते. ही बाब अभिषेक मारवाह यांच्या मनात खोलवर रुतली होती. त्यामुळे जेव्हा ते बाहेर असताना चॉकलेटचे कागद, चहाचा कप आणि टिशू पेपर यांसारख्या वस्तूंना रस्त्यांवर फेकण्याचे सोडून गाडीत स्वतःकडे ठेवायचे, त्यानंतर योग्य ठिकाणावर त्याला फेकून द्यायचे. त्याव्यतिरिक्त त्यांना जाणवले होते की, जेव्हा पण ते परदेशात जायचे तेव्हा प्रत्येक वस्तूचा उपयोग विचार करून करायचे आणि टाकाऊ वस्तूंना इकडे तिकडे फेकत नव्हते, मात्र देशात परततानाच त्यांच्या आतील विचार हरवून जात होते. तेव्हा अभिषेक यांना वाटले की, एकटयाने का न होईना त्यांना आजूबाजूच्या वातावरणात स्वच्छतेचे काम करावे लागेल. 

image


अभिषेक यांनी पाहिले की, अनेकदा कामात लोक प्रवास करताना खूप काही खातात, पितात आणि त्याच दरम्यान सर्व कचरा रस्त्यावर फेकून देतात. अशातच मी विचार केला की, असे काहीतरी करावे जेणेकरून लोकांना केवळ सुविधा उपलब्ध होईल आणि ते आपला कचरा रस्त्यावर देखील फेकणार नाहीत. त्यासाठी त्यांनी लंच बॉक्सच्या डब्यात थोडा बदल करून, एका कच-याचा असा डब्बा तयार केला, ज्याला गियर सोबत लटकविले जाऊ शकेल. लोकांमध्ये स्वच्छते प्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी अभिषेक यांनी स्वतः एक संकेतस्थळ बनविले आणि सोशल मिडीयाचा वापर केला. अभिषेक यांनी सांगितले की, त्यांनी नक्षीकाम केलेला कच-याचा डब्बा गाडीत ठेवून त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. त्या दरम्यान लोकांकडून मिळणा-या प्रतिक्रिया खूप आश्चर्यचकित करणाऱ्या होती. त्या दरम्यान त्यांना माहित पडले की, लोकांना हे माहित नव्हते की कार मध्ये कच-याचा डब्बा ठेवणे किती गरजेचे आहे. त्यांनतर अभिषेक यांनी आपली नोकरी सोडली आणि लोकांना हे समजवू लागले की, आपल्या जवळ साफसफाई किती गरजेची आहे. अभिषेक यांचे म्हणणे आहे की, “जर आपण आपल्या कारमधून बाहेर कचरा फेकला नाही तर, रस्त्यावरील जवळपास ४०टक्के कचरा आपण कमी करू शकतो.” 

image


लोकांमध्ये स्वच्छतेप्रती जागरूकता आणण्यासाठी अभिषेक शाळा, महाविद्यालय आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आतापर्यंत अनेक सेमिनार केले आहेत. त्याव्यतिरिक्त दिल्लीत होणा-या ‘राहगिरी’सारखे कार्यक्रम आणि विभिन्न शहरातील नगर निगमला स्वतःसोबत जोडण्याचे काम करत आहेत. अभिषेक यांच्या मते, “जेव्हा कच-याचा डब्बा आपण आपल्या टॉयलेट मध्ये ठेवणे गरजेचे समजतो, तर कारमध्ये का ठेवू शकत नाही.” त्यामुळे आता त्यांचा प्रयत्न कार व्यतिरिक्त ऑटोरिक्षामध्ये देखील कच-याचा डबा ठेवण्याची आहे. सध्या ते त्याच्या नक्षीकामावर काम करत आहेत. 

अभिषेक यांनी कारसाठी ज्या कच-याच्या डब्याचे नक्षीकाम केले आहे, त्यातून केळ्याच्या सालाचा दुर्गंध कारमध्ये पसरत नाही, त्यात चहाचा कप ठेवू शकतो. तो विशेष प्रकारच्या प्लास्टिकपासून बनलेला असतो, ज्याला धुवून पुन्हा वापरले जाऊ शकते. आज त्यांचे नक्षीकाम केलेले कच-याच्या डब्यांची मागणी देशातील विभिन्न भागातून येते. अभिषेक यांचे म्हणणे आहे की, स्वच्छ भारत अभियानात सामील होण्यासाठी लोकांचे हे मत आहे की, एका हातात झाडू असला पाहिजे आणि त्यासाठी एखादी खास जागा असली पाहिजे, जेथे हे काम केले जाऊ शकेल, मात्र निश्चय करा की, आपण कारमधून बाहेर कचरा टाकणार नाही आणि प्रवासादरम्यान कच-याला तोपर्यंत कारमध्ये ठेवतील जोपर्यंत त्यासाठी योग्य जागा मिळत नाही, त्यांचे म्हणणे आहे की, “लोक जर याप्रकारच्या आपल्या सवयींमध्ये थोडा थोडा बदल आणतील, तर आपला देश देखील स्वच्छ आणि सुंदर होऊ शकेल.” 

image


अभिषेक यांच्या मते, देशातच नव्हे तर विदेशात देखील लोक हे समजत नाही की, कारमध्ये काच-याचा डबा असणे किती गरजेचे आहे. ते सांगतात की, दुबईसारख्या शहरात कारमधून बाहेर कचरा फेकण्यावर दंड आहे, असे असूनही तेथील लोकांना माहित नाही की, कार मध्ये कच-याचा डबा असला पाहिजे. त्यांचे मत आहे की, लोकांमध्ये जागरूकतेची खूप कमी आहे. अभिषेक यांच्या मते, त्यांनी नक्षीकाम केलेला कच-याचा डबा कुठलेही संकेतस्थळ, व्हॉट्सऍपमार्फत केवळ २३५ रुपयात ऑर्डर करू शकतात. या किमतीत डिलिवरी खर्चदेखील सामील असते. 

image


अभिषेक यांच्या मते, “या कामाला सुरु करण्यासाठी त्यांना केवळ आपल्या बचतीचे पैसेच लावावे लागले नाहीत तर, गाडी देखील विकावी लागली. मी एकीकडे लोकांमध्ये अस्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच आपल्या संकेतस्थळामार्फत लोकांकडून स्वच्छतेबाबत कल्पना मागत आहे. जर एखादी कल्पना मला आवडली आणि त्याचे उत्पादन बनविले गेले, तर त्याच्या बदल्यात नक्षीकाम बनविणा-या लोकांना त्याचे हक्क देण्यासाठी तयार आहे.”

संकेतस्थळ : www.ujosho.com

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

कचरा टाका आणि पाणी मिळवा... ट्रेस्टरचा अनोखा उपक्रम

पुनर्वापर करता येणाऱ्या कचऱ्याचे नियोजन करणारे ʻपॉम पॉमʼ

‘स्वच्छ भारत’ साठी शालेय विद्यार्थ्यांचे घाणीच्या साम्राज्याविरुद्ध एक आव्हान ‘द बॅग इट चॅलेंज’

लेखक : गिता बिश्त

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags