संपादने
Marathi

२०१७पासून ‘गुगल’ चालणार केवळ पवन आणि सौरऊर्जेवर!

Team YS Marathi
17th Dec 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

गुगलचा वीजवापर सँन फ्रान्सिस्को शहरा इतका आहे. असे असले तरी, गुगलने त्यासाठी असे काही केले आहे की कुठल्याही शहराला त्याची कल्पना नाही. एक ऐतिहासीक पाऊल टाकत, इंटरनेटच्या जगातील या कंपनीने जाहीर केले आहे की, पुढील वर्षीपासून त्यांचा उर्जा वापर केवळ पवन ऊर्जा आणि सौरऊर्जा यांच्याव्दारे केला जाणार आहे.

त्यांची सर्व डेटा केंद्र आणि जगभरातील अधिकारी,एकत्रितपणे ६०हजार लोकाचा कर्मचारीवर्ग, सारेजण स्वच्छ आणि हरितउर्जाच वापरणार आहेत असे कंपनीने म्हटले आहे.

image


आपल्या गरजेच्या ४४% वीज या अपारंपारीक स्त्रोतातून घेतली जाते, गुगलने जगातील सर्वाधिक अपारंपारीक ऊर्जा खरेदीदार म्हणून उद्योगांच्या क्षेत्रात यापूर्वीच आपली ओळख निर्माण केली आहे. मागील काही दशकांपासून गुगल सातत्याने या क्षेत्रातील ऊर्जा क्षेत्रात गुंतली होती, त्यातून त्यांना व्यावसायिक हमी देखील मिळत होती. या धोरणातून त्यांना स्वच्छ आणि हरित ऊर्जांना प्रोत्साहन दिल्याची प्रशस्ती मिळत होती.

“ हे व्यवसायासाठी चांगले आहे हे आम्हाला पटले आहे. हे केवळ हरित ऊर्जेसाठी नाही तर यातून भविष्यात आम्ही आमच्या किमती कमी करण्याबाबतचे धोरण तयार करत आहोत. सामान्यत:अपारंपारीक ऊर्जा हा स्वस्तातील पर्याय आहे. आमच्या संस्थापकांनाही हे पटले आहे की, हवामान बदल हा मोठा धोका आहे. म्हणून आम्ही आमच्या परीने जे करायला हवे ते केले आहे.” मार्क ओमन, इयू एनर्जी जे गुगलसाठी ऊर्जासंबधी व्यवहार पाहतात त्यांनी सांगितले. 

 यू ट्यूब, जी मेल किंवा इतर कोणतेही सर्च इंजीन असेल गुगलच्या प्रत्येक व्यवसायात एक दशलक्षपेक्षा जास्त ग्राहक आहेत. यासर्वाचे कामकाज १३ मोठ्या डेटा केंद्रातून चालते. यापैकी प्रत्येक केद्र म्हणजे अनेक इमारती आहेत जेथे लाखो संगणकांवरून हे काम चालते. 

सौजन्य : थिंक चेंज इंडिया

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags