संपादने
Marathi

दीर्घायुष्य जगण्यासाठी प्रात:समयी लवकर उठा !

Team YS Marathi
21st Jun 2016
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

सकाळ होते ती आपल्यावरील जबाबदा-यांच्या नियंत्रणासाठी: जर आपण प्रात:काळचा विनियोग शहाणपणाने केला तर आपण एक आनंददायी आणि अधिक उत्पादनक्षम जीवनाचा अनुभव घ्याल.

जेंव्हा आपल्यापैकी अनेकजण अंथरुणातच असतात तेव्हा काही दिग्गज दैनंदिन आरोग्यात सुधारणा करण्यात दंग असतात, त्यांचे जीवनमान, कारकिर्द आणि व्यक्तिगत जीवन कोणत्याही नुकसानाशिवाय व्यतीत करत असतात. प्रत्येक यशस्वी माणसाला वेळेच महत्व समजलेले असते. हेच प्रात:काळी लवकर उठण्याचे एक कारण आहे. जेंव्हा ते असे करतात तेंव्हा त्यांच्याजवळ अधिकचा वेळ असतो ज्यातून ते दिवसभराच्या कामांना सुरुवात करण्यापूर्वी वेळ देऊ शकतात.

image


प्रत्यक्षातही वास्तव जीवनात आणि शास्त्रीय संशोधनात हे दिसून आले आहे की, सकाळचा वेळ किती महत्वाचा असू शकतो. लॉरा वंडेरकम यांनी हेच उलगडून दाखवले आहे की यशस्वी माणसे प्रात:काळी लवकर उठल्याने त्यागोष्टी ज्या त्यांना दिवसभरात करता येणार नाहीत त्या कशा पूर्ण करु शकतात. 

सर्वात यशस्वी माणसे सकाळच्या न्याहारीपूर्वी काय करतात? हे जाणून घेणे म्हणूनच रोचक आणि व्यावहारिक मार्गदर्शक ठरेल. त्यातून तुम्हालाही प्रेरणा घेता येईल आणि जीवनाला नवी दिशा देता येऊ शकेल. लॉरा यांनी २० खास लोकांचा अभ्यास केला त्यापैकी ९०%म्हणाले की, “सकाळी सहापूर्वी उठणे नेहमीच चांगले असते” त्यांनी उठल्यानंतरच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमांबाबतही सांगितले.

चला पाहूया जगातील यशस्वी माणसे सकाळी उठल्याबरोबर काय करतात?

जँक मा – संस्थापक आलिबाबा समूह

imageमी स्वत:ला नेहमीच बजावत असतो की आपण इथे फक्त काम करण्यासाठी जन्माला आलो नाहीतर मौज घेण्यासाठी देखील जन्मलो आहोत. आपण इतरांपेक्षा काही वेगळे करण्यासाठी जन्मलो आहोत. जर तुम्ही सारे आयुष्य फक्त कामात घालवत असाल तर तुम्हाला त्याचे वैषम्य वाटायला हवे.

ही भावना जँक मा यांच्या मनात आणि जीवनात झळकते. याचे कारण ते सकाळी सहा किंवा सातपूर्वी जागे होतात आणि जीवनाचे अत्याधिक क्षण मजेत घालवतात. ते अर्धातास कामात घालवतात आणि नंतरचा वेळ कुटूंबाला देतात.

जेफ बेझोज मुख्याधिकारी ऍमेझॉन.

ग्राहकसेवांवरील त्यांचे कार्य अतुलनिय आहे, पण तुम्हाला वाटेल की ते खुपच कामसू आहेत तर पुन्हा विचार करा. हे सीईओ आपले प्राधान्य रात्रीच्या झोपेला देतात. अगदी डेडलाईनच्या टांगत्या तलवारी असताना आणि तणावाची स्थिती असतानाही. त्यामुळे त्यांच्या वेळा निश्चित नसतात तरी ते रात्री लवकर झोपी जातात आणि सकाळी लवकर उठतात.

टिम कूक, मुख्याधिकारी ऍपल

टिम कूक हे कंपनीचे ईमेल पहाटे ४.३० वाजता पाठवण्यासाठी प्रसिध्द आहेत. गॉकेर रेयान टाटे यांच्या मते सकाळी पाच वाजता ते व्यायाम करताना दिसतात. आणि रात्री ते उशीरापर्यंत काम करतात. कार्यालयात सकाळी सर्वात आधी येणारा आणि शेवटी जाणारा असल्याचा त्यांना अभिमान आहे.

image


बिल गेटस् सह – संस्थापक मायक्रोसॉफ्ट.

बिल गेटस किमान तासभर व्यायाम करतात. त्यावेळी ते ट्रेडमिल आणि कार्डिओवर असतात. त्यासाठी ते प्रशिक्षण संस्थेच्या चित्रफितीची मदत घेतात.


imageमार्क झुकेरबर्ग, सहसंस्थापक आणि मुख्याधिकारी फेसबुक

सकाळी सहा वाजता मार्क झुकेरबर्ग आपल्या पहिल्या कामाची सुरूवात करतात. तयार होतात आणि तडक कार्यालय गाठतात. स्लिपी पिपल डॉट कॉम या संकेतस्थळाच्या मते अलिकडे मार्क यांची ओळख खूप कमी झोपून सकाळी लवकर काम सुरू करणा-यांमध्ये होत आहे. प्रोग्राम्सवर चँटिंग करणे कधी कधी सकाळी सहापर्यंत सुरू राहाते.

image


जँक डॉरसे सहसंस्थापक ट्वीटर

पहाटे पाचलाच जँक डॉरसे यांचे खांदे व्हिलला लागतात आणि ते साधना करून पाच मैल जॉगिंगला निघतात.

रिचर्ड ब्रेनसन संस्थापक विरजीन समूह

सकाळीच सकाळी रिचर्ड जॉन्सन त्यांच्या बेटावर पोहायला निघतात. त्यानंतर ते टेनिस खेळतात त्यानंतर पोटभर न्याहारी करतात.

image


वारेन बफेट मुख्याधिकारी बर्कशायर हाथवे

वारेन बफेट सकाळी पावणेसातला उठून सहा वृत्तपत्रे वाचतात. पण त्याशिवाय त्याचे निश्चित असे काही कार्यक्रम नसतात. आपला ८०टक्के वेळ ते वाचनात व्यतित करतात.

image


रतन टाटा अध्यक्ष एमिरेटस, टाटा सन्स

नियमितपणे रतन टाटा त्यांच्या विविध संस्थाच्या बैठकांना सकाळी सहा वाजता हजर असतात. आणि सुटीच्या दिवशी ते त्यांच्या कार चालवितात किंवा त्यांचे स्वत:चे खाजगी फाल्कन जेट चालवितात.

image


मुकेश अंबानी, अध्यक्ष रिलायन्स इंडस्ट्रीज लिमीटेड.

मुकेश अंबानी सकाळी ५ ते ५.३० दरम्यान उठतात. ऐंटालियाच्या दुस-या मजल्यावर जिम मध्ये जातात. त्यात पोहण्याचा आणी बरीच सारी वर्तमानपत्रे वाचण्याचाही समावेश असतो.

image


ऑपराह विनफ्रे अभिनेत्री, लेखिका आणि संयोजिका

ऑपराह यांचा दिवस वीस मिनिटांच्या मेडिटेशनने सुरू होतो त्यातून त्यांच्या मनाला शांती मिळते. त्यानंतर त्या त्यांच्या जिममध्ये व्यायाम करतात.

image


इंद्रा नुयी मुख्याधिकारी पेप्सीको

सूर्योदयापूर्वी किंवा त्यावेळी चालणे, जनरल मोटर मेरी बर्रा आणि पेप्सी च्या अधिका-यांशी चर्चा करणे इंद्रा नुयी यांच्या दिवसांची सुरुवात असते. सारे जग जेंव्हा झोपेत असते त्या कामाला लागलेल्या असतात.

image


पदमश्री वॉरिअर मुख्याधिकारी नेक्स्टइव्ही यु एस

पहाटे साडेचार वाजता उठून त्या जरी सरळ कार्यालय गाठत नसल्या तरी त्या ईमेल तपासतात, बातम्या वाचतात, आणि काम सुरू करतात. आणि याहू फायनान्सच्या मते तरी त्या ८.३०पर्यंत कार्यालयात पोहचतात.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत

नरेंद्रमोदी डॉट इन या संकेतस्थळाच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळ पहाटे पाच वाजता होते. ते प्राणायाम करतात, सूर्य नमस्कार घालतात आणि योगा करतात.

बराक ओबामा अध्यक्ष, अमेरिका

सकाळी साडे सहाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उठतात आणि जिम मध्ये वेट ट्रेनिंग तसेच कार्डिओ करतात. त्यानंतर कूटुंबासोबत न्याहारी घेतात.

डेविड कँमरून ब्रिटिश पंतप्रधान

सकाळी सहा वाजता पंतप्रधान डेविड कँमरून यांच्या दिवसाची सुरुवात होते. ते सरकारी कामे हातावेगळी करतात आणि त्याचवेळी कुटुंबासोबतच न्याहारी करतात. यावेऴी कुणालाच दूरचित्रवाणीसंच सुरू करण्याची परवानगी नाही.

विराट कोहली, क्रिकेटर

सकाळी सहाला तो उठतो. त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात वजन उचलणे आणि कार्डिओचा समावेश असतो. या प्रकारच्या व्यायामाचा त्याला त्याच्या फलंदाजीच्या फटकेबाजीसाठी फायदा होतो.

image


शेलटज, मुख्याधिकारी स्टारबक्स

पत्नीसोबत बाईक राईडने त्यांच्या दिवसांची सुरुवात होते. तरीही सकाळी सहाला ते कार्यालयात पोहोचतात असे पोर्टफोलिओ डॉटकॉमने म्हटले आहे.

जेफ इमेल्ट मुख्यधिकारी जीई

कार्डिओ व्यायामासाठी इमेल्ट पहाटे साडेपाचला उठतात. त्यादरम्यान ते वृत्तपत्रे वाचतात आणि सिएनबीसी पाहतात. असे त्यांनी फॉर्च्यून नियतकालिकाला सांगितले आहे. सलग २४ वर्षात त्यांनी सप्ताहाला शंभर तास काम केले आहे असा त्यांचा दावा आहे.

डँन अकेरसन, मुख्याधिकारी जनरल मोटर्स

डँन अकेरसन यांनी एपीला सांगितले की, ते क्वचितच पहाटे साडेचार किंवा पाचनंतर झोपतात. लवकर उठतात कारण जनरल मोटर्स आशिया यांच्याशी ते उशीर होण्यापूर्वी बोलू शकतात. याला ते त्यांचा सर्वोत्तम कामाचा प्रकार मानतात.

“हे व्य़यच्छेदक रोचक आणि उत्साहित करणारे आहे.”

बॉब इगर मुख्याधिकारी, डिस्ने

image


न्यूयॉर्क टाईम्सला बॉब इगर यांनी सांगितले की, दररोज पहाटे साडेचारला ते उठतात. त्यानंतरचा वेळ ते ब-याच गोष्टी करतात. वृत्तपत्रे वाचतात, व्यायाम करतात, संगीत ऐकतात, ईमेल पाहतात, दूरचित्रवाणी देखील एकदा पाहतात. 

लेखिका : वेदिका जैन

अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags