संकटसमयीच्या हाकेला मिळणार ‘प्रतिसाद’

25th Apr 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

एक दोन वर्षांपूर्वीची घटना, ऑटोमोबाईलचा व्यवसाय करणारे शशांक देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. बागेत येऊन काही वेळ होतोय इतक्यात पन्नाशीत असलेला शेजारचा गृहस्थ अचानक घेरी येऊन पडला. तो हृदयरोगाचा धक्का होता. नेहमीप्रमाणे लोकांनी गर्दी केली, पण मदतीला कोण पुढे येईना. शंशांक यांनी लोकांना आवाहन केलं की त्या व्यक्तीला आपण नजिकच्या हॉस्पीटलमध्ये घेऊन जाऊ पण कोणी रिक्षावाला हॉस्पीटलमध्ये यायला तयार होईना. आपत्कालीन एम्बुलन्सचा १०८ क्रमांकावरही कोणी फोन उचलत नव्हतं. पोलीसांची मदत यायला एक तासाहून अधिक वेळ लागला. त्या व्यक्तीला हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं. पण अर्धा तासातच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. ही घटना शशांक देशपांडे यांच्या मनावर परिणाम करुन गेली. सर्व मदत वेळेवर मिळाली असती तर कदाचित त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते. मग अशा आपत्कालीन स्थितीसाठी काहीही करता येणार नाही का या विचारातून 'प्रतिसाद' या अॅपची संकल्पना पुढे आली. संकटसमयी मदतीची हाक देण्यासाठी प्रतिसाद अॅपची निर्मिती करण्यात आली. मुख्य म्हणजे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना या अॅपची संकल्पना इतकी आवडली की त्यांनी प्रतिसादला महाराष्ट्र पोलीसांचं अधिकृत अॅप म्हणून आपलं केलं आणि आता राज्यात आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्यांसाठी सात मिनिटात पोलीस मदत मिळण्याचा प्रतिसाद मार्फत प्रयत्न करण्यात येणार आहे. 

शशांक देशपांडे(लाल शर्ट परिधान केलेले) आणि त्यांची 'प्रतिसाद' टीम

शशांक देशपांडे(लाल शर्ट परिधान केलेले) आणि त्यांची 'प्रतिसाद' टीमशशांक देशपांडे यांच्या संकल्पनेतून सुमारे वर्षभरापूर्वी हे अॅप विकसित करण्यात आलं. त्या घटनेनंतर अगतिक झालेल्या शशांक यांना संकटसमयी उपयोगी पडणारं अॅप तयार करायचं होतं. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर अनेकदा योग्यवेळी मदत न मिळाल्याने अनेकांचे प्राण जातात. शिवाय दिल्लीतल्या निर्भयाप्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे झाले असले तरी बलात्कार किंवा महिलांच्या छेडछाडीचे प्रकार कायमस्वरुपी थांबले आहेत असे म्हणता येणार नाही. यावर उपाय म्हणून प्रतिसादकडे पाहता येईल. शशांक सांगतात “ पुण्यातल्या बागेतल्या घटनेनं मी स्वत:ला असहाय समजत होतो. त्या भावनेतून अशा संकटकाळी मदतीसाठी नेमकं काय करता येईल याचा मी विचार करत होतो. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत काम करत असल्यानं अनेकदा हायवेवर अपघात झाल्यानंतर अऩेकांचे प्राण गेल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. यामुळे तातडीनं मदत मिळण्यासाठी कशाप्रकारे यंत्रणा तयार करण्यात येईल याचा मी विचार करत होतो. एखाद्या आपतकालिन घटनेची सुचना पोलिसांना मिळाल्यास योग्यवेळी कारवाई होऊ शकते आणि त्यातून पुढची जीवितहानी किंवा गुन्हा टाळता येऊ शकतो असं मला वाटत होतं. यातूनच मग माझ्या मित्रांच्या मदतीनं आम्ही हे अॅप विकसित करायला घेतलं. आता बहुदा सर्वांकडेच स्मार्टफोन असतात. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून संकटकाळी लवकरात लवकर पोलीस मदत मिळण्यासाठी हे अॅप विकसित करण्यात आलं. 

कसं काम करतं 'प्रतिसाद'

हे अॅप गुगल स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यावर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती, आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करायच्या दोन नातेवाईकांची माहिती फिड करायची आहे.

तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत असल्यास तुम्हाला फक्त या अॅपवर क्लिक किंवा टॅप करायचं आहे.

तीन किलोमीटरमध्ये असलेल्या १० पोलिस अधिकाऱ्यांना तुम्हाला मदत हवी आहे असा मेसेज जाईल,

शिवाय एक मेसेज पोलिस कंट्रोलरुमला ही जाईल.

फोनमधल्या जीपीएसच्या माध्यमातून मदत हवी असलेली व्यक्ती नक्की कुठे आहे हे शोधता येणं शक्य होणार आहे.

दहा पोलीसांपैकी जो पोलीस अधिकारी त्या स्थळाच्या जवळ असेल तो घटनास्थळाकडे निघेल. त्यानं कॉल रिसीव केल्याचा मेसेज कंट्रोल रुम आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनाही जाईल. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरचा भार कमी होईल.

घटनास्थळी पोलीस मदत जास्तीत जास्त सात मिनिटात पोहचू शकेल अशी तरतूद या अॅपमुळे होणार आहे.

पोलीसांसोबत एम्बुलंन्स आणि इतर आपत्कालीन सेवेला अलर्ट करण्याची तरतूदही अॅपमुळे लवकरच होणार आहे.

सध्या पुणे, नाशिक आणि मुंबईमध्ये हे अॅप कार्यरत करण्यात आलंय. लवकरच ते राज्यभरात सुरु करण्यात येईल असं पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी स्पष्ट केलं आहे. 

image


प्रतिसादची सफर

शशांक आणि त्यांच्या मित्रांनी प्रतिसादची निर्मिती केल्यानंतर त्याची चाचणीही केली,जी यशस्वी झाली. पण पोलीस खात्यातल्या लालफितीत ती अडकली. अगोदर पुणे शहर पोलीसांना या अॅपसंदर्भात मनधरणी करणं खूप कठिण गेलं. मग शशांक पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे गेले. त्यांना अॅपची उपयुक्तता स्पष्ट केली. दीक्षित यांना हे अॅप आव़डले. त्यानंतर पुणे आणि मुंबईत तातडीनं या अॅपसाठीची पोलीस यंत्रणा तयार करण्यात आली. “ दिल्लीतल्या घटनेनंतर पोलीसांची जबाबदारी वाढली होती. इन केस ऑफ इमर्जन्सी हे अॅप जानेवारी २०१३ पासून सुरु झालं होतं, पण काही कारणामुळे ते सफल होऊ शकलं नाही. 'प्रतिसाद' आपत्कालीन स्थळाची परिपूर्ण माहिती देतं. त्याचवेळी जवळच्य़ा पोलीस अधिकाऱ्यांना त्याची तातडीनं माहिती मिळते. त्यामुळे गुन्हा किंवा आपत्कालीन परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढता येतो” पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित सांगत होते.


image


सध्या पुणे, मुंबईसारख्या शहरापुर्ती मर्यादीत असलेली प्रतिसादची व्याप्ती लवकरात लवकर राज्यभर वाढवण्यात य़ेणार आहे. हे अॅप तयार करणारे शशांक देशपांडे यांचा 'प्रतिसाद'ला आता अन्य राज्यात नेण्याचा मनसुबा आहे. जेणेकरुन संपूर्ण देशातल्या लोकांना त्याचा फायदा मिळेल.  

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

एका क्लिकवर मिळवा अनोळखी शहरातही कार किंवा टू व्हीलर - झिपहॉप

कुणालाही रक्ताची कमतरता होऊ नये म्हणून, ‘द सेवियर’ नावाने एक अभियान चालवत आहे, एक तरुण...!

स्पर्धापरीक्षांसाठी प्रभावशाली टेक्नॉलॉजीकल सोल्युशन 'ऑनलाईन तैयारी’


Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding and Startup Course. Learn from India's top investors and entrepreneurs. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

Our Partner Events

Hustle across India