संपादने
Marathi

व्हॅलेंटाईन डे, तरुणाई आणि नशाबंदी..

13th Feb 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

व्हॅलेटाईन डे आलाय. बाजारात सर्वत्र लाल गुलाबं आणि फुलांची रेलचेल वाढलेय. गिफ्टची दुकानं भरुन निघालीय. कॉलेजच्या तरुणांनी तर व्हॅलेंटाईन कसा साजरा करायचा याचे आराखडे आखायला सुरुवातही केलीय. सेल्फी स्टीक घेऊन अनेक तरुण आपआपल्या व्हॅलेंटाईनबरोबर फोटो काढण्यासाठी सज्ज झालेत. आता तो ती आणि त्यांचा व्हॅलेंटाईन असंच जगातलं वातावरण झालंय. या दिवसातली मज्जा वेगळी असते. बेधुंद तरुणपणात अनेक गोष्टी घडतात. त्यातली नकोशी असणारी गोष्ट म्हणजे नशा. चुकीची संगत आणि अनवधानाने तरुण नशेकडे ओढले जातात. यातूनच मग पुढचं सर्व आयुष्य नशेत जातं. ऐन तारुण्यात नशेमुळं जीव गमावलेले अनेक तरुण पहायला मिळतात. यासाठीच व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी राज्यभर मोहीम हाती घेतलीय. विविध महाविद्यालयातल्या तरुणांना या मोहिमेत सहभागी केलं जातंय. शहर,जिल्हा आणि तालुका पातळीवर आयोजित करुन जास्तीत जास्त तरुणांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी नशाबंदी मंडळ काम करत आहे.

image


प्रेम करा मात्र जोडीदार निर्व्यसनीच निवडा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या मोहिमेची टॅगलाईन आहे. जोडीदार मला निर्व्यसनीचच हवा असा संदेश देणारे रंगीबेरंगी मुखवटे घातलेले तरुण तरुणी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस बाहेर पहायला मिळाले. साथीला होतं पोवाडा आणि पथनाट्य करणारी सिडनहॅम आणि सिध्दार्थ कॉलेजची तरुण तरुणी. मंडळाचे मुंबई संघटक रविंद्र गुरचर यांनी सांगितलं की, “ व्यसन म्हणजे प्रेमाचा शत्रू. कारण प्रेम हे अनंत काळाची साथ तर व्यसन निव्वळ थोड्यावेळाची करमवणूक असते. व्यसने आधारापोटी कवटाळली जातात. पण व्यसनं आधार नाहीत हे समजावून घेतले पाहिजे. जी व्यक्ती व्यसनांना आधार मानते, त्याच्या आयुष्यातील प्रेमाचा भक्कम आधार ढासळताना दिसत असतो. आज व्यसनाधिनतेमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. यामुळेच मंडळाने जास्तीत जास्त तरुणांना या मोहिमेत जोडण्याचं आणि त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

image


या मोहिमेअंतर्गत विविध महाविद्यालयांनी पथनाट्य तयार केले आहेत. जिथं जिथं मंडळ अशाप्रकारची मोहिम राबवते, तिथं स्थानिक महाविद्यालयातली विद्यार्थी नशाबंदी संदर्भातले पथनाट्य, भारुड सादर करतात. म्हणजे तरुणांच्या नशेची गोष्ट तरुणांच्या भाषेत. पारंपारिक लोककला आणि तत्सम माध्यमांचा वापर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न नशाबंदी मंडळाकडून करण्यात येत आहे. अनेक तरुण-तरुणीही य़ा संदर्भात सकारात्मक पावलं उलचलताना दिसतातय. या कार्यक्रमादरम्यान भेटलेला संदेश जाधव म्हणतो,” हे आवश्यक आहे. 


image


यशस्वी प्रेम आणि भावी विवाह जीवनासाठी निर्व्यसनी जोडीदार खरच गरजेचं आहे. आज स्टाईल आणि स्टेटस सिम्बल म्हणून दारु आणि इतर व्यसनाकडे वळणारे अनेक तरुण आहेत. त्यानंतर ते त्याच्या आहारी कधी जातात ते त्यांनाच समजत नाही. अशावेळी जोडीदारानं आधीपासूनच ही खबरदारी घ्यायला हवी. आज अनेकांचं कॉलेजमध्येच प्रेम जमतं. नंतर पुढे जाऊन ते दोघं लग्न करतात. पण नशा त्या दोघांमध्ये आल्यावर अगदी घटस्फोटापर्यंत पोचलेली अनेक प्रकरणं मी पाहिलेली आहेत. यामुळंच जीवनाचा साथीदार निवडताना तो नशेच्या आहारी गेलेला नाही ना याची खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि असेल तर त्याच्यातून त्याला कसं बाहेर काढता येईल याची काळजी ही घेतली पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्याच हातात आहेत.”

image


मुंबई बरोबरच नवी मुंबई आणि ग्रामीण पातळीवर राज्यभरात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. याद्वारे व्यसनं सोडा- माणसं जोडा – प्रेम वाढवा असा संदेश देण्यात येतोय. राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त तरुणांना मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि त्यात यशही मिळतं आहे असं या मंडळाचं म्हणणं आहे.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags