Marathi

वडिलांच्या कंपनीत वयाच्या सोळाव्या वर्षी दाखल होऊन देविताने निर्माण केला २७५कोटींचा टीव्ही ब्रँण्ड

देविता सराफ यांच्या असामान्य संघर्षांची कहाणी!

Team YS Marathi
5th Jan 2017
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

‘मला नाही वाटत की तुमची शक्ति किती आहे ते दाखवण्यासाठी तुम्ही पुरुषच असायला पाहिजे. मी महिला असूनही गांभीर्याने कोणताही अपराधी भाव न बाळगता पुरुषप्रधान इंडस्ट्रीत उद्योजकता आणि नेतृत्व करते आहे.’ हे शब्द वाचल्यावर तुम्हाला असे वाटत नाही का की महिला उद्यमी या सक्षम नसतात हा आपला भ्रम आहे. देविता सराफ. संस्थापिका व्हियू टेक्नॉलॉजी या स्रीवादी व्यक्तिमत्वाचे हे वरील उदगार आहेत, ज्या नेहमी टीपटाॅप फँशनेबल कपडे परिधान केलेल्या असतात, ज्यांचा एक केसही अस्ताव्यस्त दिसणार नाही. आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या ब्रँण्डचा त्या चेहरा आहेत, प्रत्येक जाहिरातीच्या मोहिमेत. परंतू त्यांच्य़ाशी बोलल्यानंतर किंवा त्यांच्या उद्यमीतेबाबत कोणतीही शंका तुमच्या मनात राहात नाही.

देविता ३५, यांनी व्हीयु हा दूरचित्रवाणी ब्रँण्ड २००६मध्ये आणलाआणि आज दशकानंतर २०१५-१६मध्ये कंपनीने दोन लाख संच विकले आहेत आणि २७५.८कोटींची उलाढाल केली आहे. या वर्षीचे महत्वाकांक्षी लक्ष्य आहे पाचशे कोटी रुपये.

image


व्यवसाय त्यांच्या रक्तात

ब-याच जणांना वाटते की देविता यांच्या व्यवसायातील मार्ग सरळसोट आहे. त्यांचे वडील राज सराफ, झेनिथ कंप्यूटर्सचे संस्थापक. वयाच्या १६व्या वर्षापासून त्या त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विभागात काम करत आहेत आणि व्यवसायातील सारे बारकावे शिकल्या आहेत. असे असले तरी रुढीवादी मारवाडी समाजातील असल्याने देविता यांना अनेक जुन्या प्रथा मोडीत काढाव्या लागल्या, जेणे करून त्यांना वडीलांसोबत फँक्टरीत काम करता यावे.

दक्षिण कँलिफोर्नियामधील विद्यापीठातून व्यवसायातील पदवी मिळवण्याची देविता तयारी करत होत्या, त्याचवेळी त्यांच्या मित्रपरिवारात सारेजण जॉब साठी शोध घेत होते, त्याचवेळी देविता यांनी त्यांची स्वत:ची कंपनी चालविण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी त्यामुळे विचार केला की परत येवून वडीलांच्या उद्योगात सहभागी व्हावे हाच चांगला पर्याय होता त्यातून प्रत्यक्ष अनुभव मिळणार होता.

‘तुम्ही उद्यमी तोपर्यंत कधीच होवू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला कुणाच्या पांठिब्याची गरज लागते. ‘करनेका है तो कुछ बडा करेंगे’ “मला कुणाच्या तरी सोबत काम करुन माझा वेळ वाया घालवायचा नव्हता.” देविता सांगतात. ज्या वयाच्या २१व्या वर्षी झेनिथ मध्ये मार्केटींग संचालक म्हणून दाखल झाल्या.

मोठ्या पडद्याची जादू.

सन २०००च्या पूर्वीचा तो काळ होता. त्यावेळी इंटेल आणि तत्सम व्यक्तिगत संगणक अद्याप विकसीत होत होते. देविता यांनी उत्पादन विकासात लक्ष घातले. झेनिथची त्यावेळी असलेली वितरण व्यवस्था फारशी सक्षम नाही हे ओळखून त्यांनी नवा ब्रँण्ड बाजारात आणला आणि वेगळा सेट अप करून तो नरिमन पॉइंट येथे प्रदर्शित केला. हेतू हा होता की केवळ तांत्रिकदृष्ट्या ब्रँण्ड न आणता तो जास्त सुखद ब्रँण्ड असायला हवा होता.अशाप्रकारे हाय- एण्ड संगणक आणून देविता यांनी भन्नाट शोध लावला होता. “ ब-याच लोकांना पूर्ण तंत्रज्ञान माहित नसते. पण ते बाह्यांगाच्या सौंदर्याला महत्व देतात, काही जण केवळ मॉनिटर विकत घेतात. म्हणून मी विचार केला की दूरचित्रवाणी संचाचा व्यवसाय करुया” देविता म्हणाल्या.

image


आणि त्यातूनच व्हीयू टिव्हीचा जन्म २००६मध्ये झाला. देविता यांनी ठरविले होते की व्हीयू हा सवंग भारतीय पर्याय नसेल तर तो उच्च किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जा असेल.जो ग्राहकांना पाहताच चांगल्या दर्जाचा आहे हे समजेल. “मला वाटते की भारतीय उद्योजकतेमध्ये ब्रँण्डींग नसते, याला अपवाद म्हणजे लक्झरी हॉटेल ब्रँण्डस्. मला व्हीयू ही मोठी कंपनी म्हणून हवी होती. जी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करु शकेल. देविता सागतात ज्या प्रशिक्षित शास्त्रिय नृत्यांगना आहेत.

बाजारात आघाडीवर असलेल्या सोनी किंवा सँमसंगपेक्षा व्हीयूच्या किमती तीस टक्के स्वस्त आहेत, मात्र भारतीय प्रतिस्पर्धी व्हिडिओकॉनपेक्षा वीस टक्के जास्त आहेत. २२एसकेयू च्या श्रेणीत व्हीयू दूरचित्रवाणीसंचाची किंमत ९५०० आणि १.५लाख यांच्या दरम्यान आहे.

इ-कॉमर्सची चुंबकीय ओढ

देविता यांनी त्यांच्या स्वत:च्या दुकानातून आणि अनेक ब्रँण्ड असलेल्या क्रोमा सारख्या दुकनातून दूरचित्रवाणीसंच विकण्यास सुरुवात केली होती. ज्यावेळी विक्री वाढू लागली, देविता यांच्या लक्षात आले की क्रोमा सारख्या ठिकाणी अन्य खाजगी ब्रँण्डसोबत त्यांचे ऊत्पादन चांगली स्पर्धा करु शकते. त्यामुळे व्हीयू ने आणखी काही वर्षांसाठी क्रोमा सोबत करार करण्याचे ठरविले. किरकोळ विक्रेतेदेखील १८ते३० टक्क्याइतकी जास्त मार्जिन मागत होते. त्यामुऴे २०१४मध्ये ज्यावेळी कंपनी ३०कोटीच्या घरात उलाढाल करत होती देविता यांनी इ- कॉमर्सच्या माध्यमातून स्नँपडील किंवा फ्लिपकार्ट यांच्यासोबत विक्रीसाठी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

इ-कॉमर्स मधील सध्याच्या काळातील चलती पाहता व्हियूचा महसूल ९०कोटीच्या घरात वर्षभरात पोहोचला.

२०१५मध्ये फ्लिपकार्टने ग्राहकांशी प्रदीर्घ सेवा करार करण्याच्या निर्णयाच्या माध्यमातून व्ही यू सोबत भागिदारी केली. “ मला फ्लिपकार्टशी करार करण्यासाठी विचार करायला चार महिने लागले. त्यानी जी किंमत सांगितली ती चांगली होती.” देविता सांगतात. ज्यातून भागीदारीच्या चढ-उताराबाबत पारदर्शीपणे तपशील देण्यात आला होता.

फ्लिपकार्ट आणि व्हियूसाठी या भागीदारीचे परिणाम चांगले आले. दोन्ही कंपन्यांची वृध्दी झाली. फ्लिपकार्टच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे विभागाचे प्रमुख संदिप कारवा म्हणाले की, व्हीयूने शंभर टक्के वृध्दी नोंदवली. आणि त्यांचा बाजारातील वाटा ४.५ टक्के झाला आहे. फ्लिपकार्टच्या दूरचित्रवाणी विक्रीत त्यांचा हिस्सा ३० ते३५ टक्के आहे.

‘मला विश्वास आहे की, व्हियू हा भारतातील चवथ्या क्रमांकाचा ब्रँण्ड म्हणून उदयास आला आहे. दूरचित्रवाणी बाजाराच्या वीस टक्के बाजार व्यापण्याचे फ्लिपकार्टचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे व्हीयू मध्ये ती क्षमता नक्कीच आहे.” संदीप सांगतात.

जाहीरातीतून ब्रँण्ड प्रस्थापित करणे.

देविता यांनी त्यांच्या ब्रँण्डच्या जाहीरातीमधील चेहरा होण्याचा निर्णय घेतला. ‘सेलिब्रेटी ब्रँण्डऍम्बँसडर म्हणून त्या झळकू लागल्या. जाहीरातीमध्ये झळकणा-या सेलिब्रीटीमध्ये फारच थोडे ग्राहकांच्या लक्षात राहत असतात. देविता सांगतात. नव्याने उद्याला येणा-या ग्राहकोपयगी वस्तूंच्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपन्याच्या प्रमाणे जाहीरतीचे वेगळे अर्थकारण नसते, जसे की एलजी, सोनी किंवा सँमसंग यांना आहे. देविता यांना हे माहिती होते. त्यांना हे मात्र माहिती होते की त्यांचे उत्पादन त्याचे पँकिंग आणि ग्राहकसेवा उत्तम दर्जाची असेल. ज्यातून ग्राहकांचे समाधान होईल आणि ते कौतुकाचे दोन शब्द काढतील.

ऑन लाईन विक्रीमध्ये सर्वात मोठा फायदा असा की, तातडीने प्रतिक्रिया मिळतात आणि खरी माहिती समजते. त्यामुळे कंपनीला आवश्यक बदल तातडीने करता येतात. उदा म्हणून व्हीयूचा स्मार्ट टेलिव्हीजन, ज्याची तीस टक्के विक्री होते तो नेटफ्लिक्सच्या बटनसोबत येत असे आणि यूट्यूबचे बटन रिमोटवर असायचे. हे त्यावेळी घडले ज्यावेळी कंपनी फ्लिपकार्टसोबत आली आणि भारतात पहिल्यांदा ही सेवा मिळाली.

दरम्यान फ्लिपकार्टबाबत उत्पादनाच्या अनेक सकारात्मक बाबी दिसून आल्या. देविता सांगतात की, ब्रँण्डने ग्राहकांचे मत गांभिर्याने आजमावले, त्यासाठी व्हीयू कार्यालयात त्यांच्या ग्राहक सेवा चमूला त्य़ांच्या दालनाच्या उजव्या बाजुला जागा देण्यात आली आहे. देविता सांगतात बहुतांश मुद्दे हे उशीर आणि खोळंबा याबाबत असतात. मात्र ज्यावेळी उत्पादनाशी संबधित काही तक्रार असते त्या ती लगेच दूर करण्याचा प्रयत्न करतात. “ आम्हाला माहिती मिळाली की आमच्या उत्पादनात आवाजाबाबत काही तक्रारी आहेत, आम्ही त्यात गुंतवणूक केली आणि अंतर्गत युएसबी जोडणी ३०वँट स्पिकरची केली जी एकण्यास सुस्पष्ट आहे. त्यामुळे तक्रारी या आमच्या उत्पादनाला सुधारण्याच्या प्रक्रियेचा भाग आहेत” देविता सांगातात. ज्या काही गुंतवणूकदारांच्या शोधात आहेत ज्याच्या माध्यामातून व्हीयूला आणखी मजल गाठता येऊ शकते.

तर मग व्हियू दूरचित्रवाणीच्या पलिकडे जाणार का? देविता आश्चर्यकारक उत्तर देतात. जर मी काही केले तर नक्कीच. मला यापेक्षा मोठे काही करता येवू शकते. मोबाईल आणि गँडेटसपेक्षा पुढचे. मला यापुढे जे करायचे आहे ते आहे ‘कार्स’ देविता सांगतात.

त्या जे निवडतील ते चांगलेच असेल,देविता स्वत:शी प्रामाणिक आहेत. त्या सांगतात “ ज्यावेळी मी आमच्या जाहीरातीच्या फोटोशूट मॉडेलिंगसाठी जाते किंवा गँडेट तयार करण्यात मग्न असते, सर्वकाही मीच असते आणि त्यातूनच माझी प्रतिभा दिसते. आणि ते गोड गोड यश असेल कारण मी काहीतरी मिळवले आहे स्वत:ला न बदलता जशी मी आहे.”

लेखिका : राधिका नायर

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags