संपादने
Marathi

बेगम परवीन सुलताना यांना भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार

Team YS Marathi
17th Mar 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा ‘भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार- २०१६’ ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १७ मार्च रोजी जळगाव येथे एका शानदार समारंभात परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात येणार आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी गान सरस्वती किशोरी आमोणकर, संगीत मार्तंड पंडित जसराज, गान तपस्विनी प्रभा अत्रे, ज्येष्ठ सतारवादक पंडित रामनारायण आदी ज्येष्ठ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.


image


या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पं.भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. या शास्त्रीय संगीत महोत्सवात १७ मार्च रोजी गायिका प्रीती पंढरपूरकर, गायिका सानिया पाटणकर,सतारवादक समीप कुलकर्णी आपली कला सादर करतील. तर १८ मार्च रोजी गायक देबबर्णा कर्माकर, गायक धनंजय हेगडे व अभिषेक लाहिरी यांचे सरोद वादन होणार आहे. याच दिवशी बेगम परवीन सुलताना यांच्या सुरेल गायकीचा आनंदही रसिकांना घेता येईल. १९ मार्च रोजी गायिका उन्मेषा आठवले, गायिका रुचिरा पंडा, बासरी वादक विवेक सोनार आपली कला सादर करतील. या महोत्सवाचे आयोजन स्व. वसंत चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगांव या शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेचा सहकार्याने संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे. (सौजन्य - महान्युज)

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags