संपादने
Marathi

ट्रेक एंड टेल : एक असे स्टार्टअप जे अपघातावेळी वाचवू शकते तुमचे प्राण

Team YS Marathi
22nd Apr 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

१९९५ साली जेव्हा अमेरिकेत जनरल मोटर्स कंपनीनं 'ऑनस्टार' परिपूर्ण कार संचार सेवा सुरु केली तेव्हा ही सुरुवात म्हणजे एखाद्या साधनाप्रमाणे कारमध्ये क्रांतिकारक बदल करण्यात आले. यातील संपूर्ण टेलिमेटिक्स विभाग (माहिती तंत्रज्ञानाची अशी शाखा ज्यामध्ये दूरवर असलेल्या संगणकीय माहितीचं प्रसारण आणि वहन करता येतं) म्हणजेच संवाद यंत्र हे माहिती गोळा करण्याचं आणि वहन करण्याचं प्रभावी साधन बनलं. आज याच साॅफ्टवेअरचा वापर करीत कारमालक आपल्या वाहनाच्या जडणघडणीची इत्यंभूत माहिती ठेवू शकतो. त्याचबरोबर वाहन कुठे आहे याची नोंद त्यात असते. तसंच कारच्या पडद्यावर मोबाइल फोनच्या सहाय्याने या माहितीचं प्रसारण सुद्धा केले जाऊ शकते. ऑनस्टार ही प्रणाली स्थानिक सर्विस सेंटर, पोलिस स्थानक, रुग्णालयं आदी सर्वांशी दुर्घटनेवेळी संपर्क साधू शकते. मात्र भारतात या सेवेची गरज आहे का ? गेल्या सहा वर्षात तब्बल ८० दशलक्ष स्मार्टफोन्स आणि १२ दशलक्षाहून अधिक कार्स विकल्या गेल्या आहेत. तरीही आपल्याकडे ऑनस्टारसारखी सुविधा नाही. २०१४ साली रस्ते अपघातात तब्बल सुमारे १ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडले, ज्यातील ७५ % अपघात हे कार आणि ट्रकच्या धडकेने झालेले अपघात आहेत.

ऐकायला थोडसं विचित्र वाटलं तरी, ही सुद्धा एक व्यवसायासाठी संधी आहे, असं म्हटल तर अतिशयोक्ती ठरू नये. पण काही जणांना या अशा प्रणालीद्वारे वाहनांना सुरक्षित करण्याची गरज वाटते, मात्र शासनाचा किंवा मोठमोठ्या व्यावसायिकांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. अशा सुविधा पुरवण्यासाठी या काहींनी व्यासपीठाची निर्मिती सुद्धा केली आहे. ऑनस्टार सारख्या व्यवहार्य व्यवसायाची सुरुवात दिल्लीतल्या एका कंपनीनं केली आहे ज्याचं नाव आहे ट्रेक एंड टेल. तांत्रिक अभियंता असणाऱ्या प्रांषु गुप्ता यांनी सहा वर्षांपूर्वी ही कंपनी सुरु केली. प्रांषु यांनी त्यापूर्वी अमेरिकेत एक्सोन आणि याहू सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीत काम केलं आहे. प्रांषु यांच्या कंपनीचं उद्दिष्ट्य आहे, ते म्हणजे भारतात वाहन चालवणे हा अनुभव अधिक समृद्ध बनवणे. प्रांषु यांना स्वानुभवावरून त्यांना या व्यवसायाची कल्पना सुचली. भारतात असताना प्रांषु एकदा कामानिमित्त बाहेर गेले असता, त्यांनी त्यांच्या वडिलांची कार भलत्याच ठिकाणी पाहिली. वडिलांच्या वाहनचालकाला फोन केला असता त्याने खोट कारण दिलं. प्रांषु यांना तेव्हाच समजलं की तो वाहनचालक आपल्या स्वत:च्या कामासाठी कार वापरात असे आणि उशीर होण्याचं खोट कारण वडिलांना देत असे.

" त्यावेळी मला जाणवलं की भारतात आपल्या गाड्या नेमक्या कोण कशासाठी वापरतय किंवा कुठे असतील हे शोधण्याचा काहीच मार्ग उपलब्ध नव्हता." प्रांषु ट्रेक एंड टेलचे संस्थापक आणि सीईओ आठवणी सांगत होते. वाहनांची प्रचंड आवड असणाऱ्या प्रांषु यांना जाणवले की हीच खरी वेळ आहे व्यवसाय सुरु करण्याची. त्यांनी अमेरिकेतील आपली भरमसाठ पगाराची नोकरी सोडली आणि टेलिमेटिक्सचं व्यासपीठ भारतात सुरु करण्यास सुरुवात केली.

image


व्यवसाय

अभियंते असल्याने त्यांनी भारतात मिळणाऱ्या साधनसामुग्रीचा वापर करीत एक छोटंसं मशिन तयार केलं आणि आपल्या गाड्यांमध्ये त्याचा वापर केला. जी पी एस असणाऱ्या या यंत्रामधून कारचं संरचनात्मक चलनशास्त्र (थोडक्यात गाडीची अंतर्गत रचना आणि गाडी चालवण्याचे निर्देश) यांची माहिती सुद्धा दिलेली होती. ज्यामध्ये अपघात झाल्यास या यंत्रामधून जवळच्या नातेवाईकाला दूरध्वनी जाऊ शकत असे आणि अपघाताची महिती आणि अपघाताचं स्थान याची माहिती फोन घेणाऱ्या व्यक्तीला कळू शकत असे. यामध्ये वाहनचालकाला सुद्धा त्यांच्या नातेवाईकांशी बोलता येऊ शकत होतं. तीन वर्षांच्या चाचणीनंतर आणि प्रमाणपत्र मिळवल्यावर, प्रांषु यांनी विविध वाहन उत्पादकांकडे आपलं हे उत्पादन नेलं. त्यांचे पहिले ग्राहक होते ते म्हणजे, ट्रॅक्टर आणि बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या गाड्यांचे उत्पादन करणारे एक उत्पादक ! २०१३ साली या गाड्यांनी ट्रेक एंड टेलची यंत्रणा वापरली. या व्यवहारातून प्रांषु यांनी सुरुवातीला गुंतवलेले पैसे परत मिळाले. ज्या उत्पादकांच्या भारतीय समूहाबरोबर त्यांनी काम केलं त्यांचे आजपर्यंत बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या साधनाचे १२०० हून अधिक नग विकले गेले आणि त्यातून २०१४-२०१५ सालात आलेली मिळकत आहे सुमारे ४,१३३ कोटी.

प्रांषु यांना लवकरच समजलं की कोर्पोरेट व्यवसायात त्यांचा जम बसला खरा पण व्यवसायाचा आलेख उंचावणारा नव्हता. " समस्या अशी आहे की भारतात अनेक वाहन उत्पादन कंपन्यांकडे स्वत:ची टेलिमेटिक्स प्रणाली आहे आणि ते मोठ्मोठ्या विक्रेत्यांसमवेत काम करतात. मात्र ते आमच्यासारखी व्यापक सेवा आणि सुरक्षा पुरवू शकत नाहीत," असं प्रांषु ठामपणे सांगतात.

या अदभूत तंत्राचा वापर अन्य अनेक कंपन्या थोड्याफार फरकाने करीत आहेत. होंडा कार्स इंडिया ही कंपनी पहिली कंपनी आहे ज्यांनी २०१६ मध्ये अशा पद्धतीची ग्राहक सेवा आपल्या विक्रीनंतरच्या गाड्यांसाठी सुरु केली. टाटा मोटर्स ही कंपनी हरमन इलेक्ट्रोनिक्स तर मारुती सुझुकी ही कंपनी बॉश इंडियासह या सेवेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे. तरीसुद्धा ज्या वाहनांची किंमत ९ लाखांपेक्षा अधिक आहे त्यां वाहनांमध्ये ही प्रणाली वापरण्यात येईल. एसआयएएमच्या सर्वेक्षणानुसार भारतात विकल्या जाणाऱ्या ७०% गाड्या या ९ लाखापेक्षा कमी किंमतीच्या असतात. त्यामुळे ट्रेक एंड टेल सारख्या यंत्रणांची या वाहनांना अत्याधिक गरज आहे, कारच्या संरचनात्मक माहितीसाठी आणि आपत्कालीन व्यवस्था सेवेसाठी!

" त्यामुळे आता मी थेट ग्राहकांकडे लक्ष वळवण्याचं ठरवलं आहे. " प्रांषु आपल्या व्यवसायाची पुढील दिशा सांगत होते. सुनियोजित विपणन आणि वितरणाच्या सहाय्याने या प्रकारच्या व्यवसायात त्यांना वर्षाकाठी सुमारे एक लाख ग्राहक मिळू शकतात. सध्या त्यांचं हे उत्पादन वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रांषु सध्या बेंगळूरू आणि दिल्ली इथं वितरण व्यवस्था मजबूत करण्यात व्यस्त आहेत. त्यांचा १८ अभियंत्यांचा चमू सध्या अॅप सशक्त करण्यावर काम करीत आहेत, त्याचबरोबर कारमधून मिळणारा माहितीचा संच म्हणजेच डेटासेट प्रभावीपणे हाताळता यावा यासाठी मजबूत असा संगणकीय फलाट निर्मिती करण्यावर सुद्धा व्यस्त आहेत. ट्रेक एंड टेलचं हे व्यासपीठ हे वितरकांशी किंवा ऑटोमोबाईल कंपन्याशी करार करून त्याचं रुपांतर मिळकतीत करता येऊ शकेल. आजवर प्रांषु यांनी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी सुमारे २ करोड रुपये गुंतवले आहेत आणि ग्राहकाभिमुख व्यवसायाकडून त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. " मी माझं सर्वस्व यात पणाला लावलं आहे ." प्रांषु म्हणाले.

स्पर्धा :

ट्रेक एंड टेलची मुख्य स्पर्धा आहे ती मोठमोठ्या ऑटोमोबाइल कंपन्या आणि त्यांचे संशोधन आणि विकास प्रयोगशाळा ! रेनॉ निसानचा तांत्रिक विभाग चेन्नईमध्ये सध्या मोबाइलवर निदान उपकरण निर्मित करण्यावर काम करीत आहे. त्याचप्रमाणे महिंद्र एंड महिंद्राकडे सुद्धा त्यांचे स्वत:चे व्यासपीठ आहे. त्यांची इलेक्ट्रिक कार 'रेवा' अशी पहिली कार होती ज्यात ३/४जी असलेल्या मोबाईल जोडणीमुळे वाहनातील काही वैशिष्ट्यांवर ताबा ठेवणं सोपं जात होतं. कार्लआयक़्यु आणि रक्षा सेफ ड्राईव या कंपन्या ट्रेक एंड टेलच्या स्पर्धक आहेत. "आज असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येकाचा व्यवसाय करण्याचा दृष्टीकोन आगळा -वेगळा आहे. ही यंत्रणा प्रभावी ठरण्यासाठी इन्श्युरन्स कंपनी, वितरक आणि आपत्कालीन सेवा या सर्व परिसंस्थांचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे ." रेवाचे संस्थापक चेतन मायनी सांगत होते.

रक्षा सेफड्राईवचे सह-संस्थापक जयंत जगदीश सांगतात की, त्यांचं उत्पादन हे वाहनचालकांना व्यावसायिक नेटवर्कशी जोडते, ज्यामुळे कारची सद्यस्थिती आणि आपत्कालीन संपर्क सांभाळणे अत्यंत सोपं जातं. तेही दिवसाचे २४ तास. " भारतीय बाजारपेठेला आज आमच्यासारख्या विना अडथळा सेवेची नितांत गरज आहे ज्यामध्ये वाहनाना सर्व परिसंस्थांना एकत्रित जोडता येऊ शकेल. आम्हाला ही सेवा बाजारात आणण्यापूर्वीच १०० ग्राहकांकडून मागण्या आलेल्या आहेत. रक्षा सेफ ड्राईवचे सह संस्थापक जयंत जगदीश सांगत होते.

प्रांषु यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळो ही सदिच्छा ! पण मोठं आव्हान आहे ते म्हणजे लोकांना ही यंत्रणा त्यांच्या फायद्यासाठी वापरण्यास उद्युक्त करणे. हा व्यवसाय असा आहे जिथे ही यंत्रणा वापरण्यासाठी लोकांमध्ये जागृती करणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. 

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा :

युरोपिअन बाजारात भारतीय त्रिमूर्ती उतरवणार ‘मेकींग इन इंडिया’

एका क्लिकवर मिळवा अनोळखी शहरातही कार किंवा टू व्हीलर - झिपहॉप

मुंबईतल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठीसुद्धा ऑनलाइन तिकीट ! 'ट्रॅफलाइन'च्या संस्थापकांनी सोडवली परिवहन व्यवस्थेची एक समस्या !

लेखक: विशाल कृष्णा

अनुवाद : प्रेरणा भराडे

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags