संपादने
Marathi

चेन्नई बंदरावरील हमाल ते २५००कोटींचे साम्राज्य उभारणारा मालक!

एम जी मुथू यांची थक्क करणारी कहाणी 

26th Dec 2016
Add to
Shares
7
Comments
Share This
Add to
Shares
7
Comments
Share

“ जिथे इच्छा असेल तिथे मार्ग असतोच” हा मंत्र बहुतांश यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिकांनी अंगिकारला त्यामुळेच ते यशाच्या उंच शिखरावर पोहोचले आहेत. काहीवेळा प्रचंड आत्मविश्वास ठेवून वाटचाल करावी लागते आणि तेच बळ असते, अगदी तशीच कहाणी आहे एमजी मुथू यांची, संस्थापक मालक एमजीएम समुह. यांनी हाच मार्ग त्यांच्या जीवनात अंगिकारला. शिक्षणातीचा अभाव आणि प्रचंड अडचणी असूनही त्यांनी कोणत्याही संकटाला भीक न घालता त्यांनी त्यांच्या पध्दतीने पुढे जात राहणे पसंत केले.

image


एम जी मुथू एका गरीब घरातून आले आहेत, शाळेत हजेरी लावणे हे त्यांचे स्वप्न राहिले आहे. १९५७मध्ये जहाजावरील हमाल म्हणून काम सुरू करणारे मुथू यांनी त्यावेळी अवजड सामान उतरविणे आणि चढविण्याचे काम केले. त्यांचे वडीलदेखील याच व्यवसायात होते आणि काही काळ हे काम केल्यानंतर त्यांचे आयुष्याचे उदरनिर्वाहाचे हेच साधन बनले होते. ऐवढे करूनही त्यांच्या कुटूंबावर अनेकदा उपासमारीची वेळही येत असे आणि उपाशीपोटी झोपावे लागत असे. मुलांना गावी शाळेत घालावे असा विचार करुन त्यांनी तसा प्रयत्न करून पाहिला मात्र भूक भागविण्याच्या प्रयत्नात शाळा करणे या दोन्ही गोष्टी साध्य करणे शक्य नव्हते त्यामुळे काही दिवसांतच त्यांची शाळा बंद झाली. वडील कुली म्हणून राबत असताना श्रीमंत जमीनदारांकडून त्यांना थोडे जास्त जेवायला मिळत होते. कष्टाची कामे करत, चेन्नईच्या बंदरावर मोठे बोजे पाठीवर उचलून ठेवत (त्यावेळेचे मद्रास) त्यांनी काही पैसे बचत म्हणून गाठीशी ठेवले. या बचतीमधूनच, त्यांनी छोट्या प्रमाणात लॉजिस्टिकचा (वाहतूक)व्यवसाय सुरु केला. त्यानंतर काही काळात लोकांशी संपर्क वाढला त्यावेळी हा व्यवसाय चांगला चालू लागला. जरी ते लहानसे वेंडर म्हणून काम करु लागले होते, मुथू यांनी ग्राहकांना समाधान कारक सेवा देण्यास सुरुवात केली. त्यांनी नेहमी हाच प्रयत्न केला की त्यांचे ग्राहक कधीही काही तक्रार घेवून येणारा नाहीत. त्यांनी वेळेपूर्वी सामान पोहोचविण्याचे काम सुरु केले. हळुहळू त्यांची किर्ती सा-या मद्रास मध्ये पसरली. मग त्यांनी मोठ्या ग्राहकांना आणि वेंडर्सना सेवा देण्यास सुरुवात केली. बघता बघता छोट्या उद्योगाने मोठ्या साम्राज्याचा आकार घेतला ‘एमजीएम समूह’.

एमजीएम समूह आज वाहतूक क्षेत्रात देशातील खूप मोठे नाव आहे, तर एमजी मुथू उद्योजक म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांच्या या यशानंतर त्यांनी कोळसा क्षेत्रात आणि खाण क्षेत्रात, तसेच अन्नप्रक्रिया साखळी आणि आदरातिथ्य क्षेत्रात पाय रोवले. अनेक देशात त्यांच्या मालकीची हॉटेल सुरु झाली आहेत.

एमजीएम समूहाने नुकतेच आंध्र आणि तामिळनाडूमध्ये उद्योगाचा पसारा असलेल्या कंपनीला खरेदी केली आहे. द्रवित पदार्थांच्या अनेक प्रकारच्या उत्पादनांसाठी प्रसिध्द असलेल्या या कंपनीचा आता कर्नाटकात विस्तार केला जात आहे. याशिवाय मुथू यांनी मलेशियातील लोकप्रिय ब्रँण्ड मेरी ब्राऊनची फ्रँन्चायजी भारतात सुरु केली आहे.

एमजीएम समुहाने बंगळूरूमध्ये व्हाईटफिल्डमध्ये नुकतेच बँक्वेट बिझनेस हॉटेल सुरु केले आहे. सध्याच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले की, “ बंगळूरू मध्ये अश्या प्रकारची संधी आदरातिथ्य क्षेत्रात मिळाल्यावर ती अव्हेरणे शक्यच नव्हते.”

हे केवळ स्वप्नवत वाटण्यासारखेचआहे जेंव्हा एक माणूस केवळ प्रामाणिकपणे मिळालेल्या संधी घेत या स्तरावर जावून पोहोचतो.कष्ट करण्याची तयारी आणि कमालीचा साधेपणा. एमजीमुथू यांच्या कहाणीतून प्रेरणा तर मिळतेच पण नव्याने उद्योगाच्या क्षेत्रात येवून काही करण्याची अपेक्षा असलेल्यांना खूप काही शिकायला मिळते. 

Add to
Shares
7
Comments
Share This
Add to
Shares
7
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags