संपादने
Marathi

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून घरावर ठेवा नियंत्रण, गोहाटीच्या क्युबिकल लॅब्जचा वायरलेस आविष्कार

sachin joshi
21st Oct 2015
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share


मोबाईलचा वापर करुन घरावर नियंत्रण ठेवा

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मोबाईलच्या सहाय्यानं तुमच्या घरावर नियंत्रण ठेवणारं वायरलेस तंत्रज्ञान 'क्युबिकल लॅब्ज'नं तयार केलंय. क्युबिकल लॅबची सुरुवात गोहाटी आयआयटीचे पदवीधर असलेल्या ध्रुव रात्रा, स्वाती व्यास आणि राहुल भटनागर या तिघांनी केली. मानवी कष्ट कमी करणारे, ऊर्जेची बचत करणारे, सुरक्षित आणि किफायतशीर उपकरणं निर्माण करण्याच्या दृष्टीनं कंपनी काम करते.


imageक्युबिकल लॅबची सुरूवात कॉलेजच्या लॅबमध्ये प्राध्यापकांच्या प्रेरणेने झाली होती. या कंपनीचे संस्थापक २०१३ मध्ये गोहाटी आयआयटीचे विद्यार्थी होते. या ठिकाणी उत्पादनाची निर्मिती आणि चाचणी तसेच निर्मिती प्रक्रियेतील सुधारणा ते करत असत.

“घर स्वयंचलित ठेवण्याच्या तंत्रज्ञानामुळे तुम्ही मोबाईल,लॅपटॉप किंवा टॅबलेटच्या सहाय्याने तुमचं घर नियंत्रित करु शकता. तुम्ही दिवे कमी जास्त करु शकता, कोणत्याही जादा वायरींगशिवाय मोबाईलच्या सहाय्याने म्युझिक सिस्टम नियंत्रित करु शकता. एवढंच नाहीतर तुमचे आयपी कॅमेरा या उपकरणाला जोडले तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्हाला तुमच्या घरातील लाईव्ह फीड दिसू शकते. ऊर्जाबचत करणारे, सुरक्षित आणि जगणं सोयीचं करणारं तंत्रज्ञान निर्माण करण्याचं क्युबिकल लॅबचं ध्येय असल्याचं ” ध्रुव सांगतो.

क्युबिकलने दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये काही महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केली आणि सहा महिन्यांच्या काळातच त्यांची टीम ३ वरुन ६५ जणांवर पोहोचली. या टीममधील २० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी हे आयआयटी आणि आयआयएम पदवीधर आहेत.

या टीमने गेल्या दोन महिन्यात काही बिल्डर्ससोबत करार करुन आपली उत्पादनं विकली आहेत. भारताबाहेर व्यवसाय नेण्यासाठी आता ते निधी उभारण्याच्या कामाला लागलेत.

स्पर्धा

घरं स्वयंचलित करण्याच्या या व्यवसायात क्युबिकल लॅबोरेटरीज श्नायडर, लिग्रँड, हनीवेल आणि फिबारोसारख्या जागतिक पातळीवरील स्पर्धकांशी स्पर्धा करतेय.


image


क्युबिकल फक्त आपल्या मालकीच्या ‘Cube-R’ या रेडीओ लहरींच्या सहाय्यानं खासगी पातळीवरील संवाद साधण्यासाठीच्या अत्युच्च्य दर्जाच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असते. टीमच्या मते ‘Cube-R’ हे असं तंत्रज्ञान आहे ज्याच्यामुळे माहिती किंवा सूचनांचं तातडीनं आदान प्रदान होतं, त्यामुळे कंपनीची यंत्रणा इतरांपेक्षा जास्त वेगाने काम करते. क्रेडीट कार्ड वापरासाठी सुरक्षेच्यादृष्टीनं वापरलं जाणारं १२८ एईएस एन्क्रीप्शन या यंत्रणेतही वापरलं गेलं आहे.

उपकरणांचा वापर आणि वीज चालू-बंद करण्याव्यतिरिक्त कंपनीनं आपल्याकडील उपकरणाच्या माध्यमातून घरातील विविध वस्तु नियंत्रित करण्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाचे पेटंट काढलेले आहे. यामुळे तुम्हाला तुमचे पंखे, झुंबरामधील दिवे डीम करणे, तप्त झाल्यावर प्रकाशमान होणारे दिवे, डीम करता येणारे लाईट्स कोणतंही बाह्य उपकरणं न लावता नियंत्रित करता येतात. आयपीवर आधारित वायरलेस कॅमेरा आणि पडद्यांच्या मोटारींनाही हे तंत्रज्ञान वापरता येतं. सेवेशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी क्युबिकलची टीम यंत्रणा बसवण्यापासून ते त्याची निगा राखण्याचे आणि पहिल्या वर्षात काही तक्रार आल्यास स्वखर्चाने यंत्रणा बदलून देण्याचे काम करते.

क्युबिकल स्मार्टहोम्स ही वीज नियंत्रण आणि व्यवस्थापन यंत्रणा आहे. ही यंत्रणा वीज वापरावर लक्ष ठेवत असल्यानं आणि वापरकर्त्याला वीजेचा वापर कमी करण्यासाठी मदत होते. या स्मार्ट ऍपमुळे तुम्हाला वीजेच्या वापराची माहिती दैनिक,साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक कालावधीसाठी तक्त्याच्या रुपात मिळते, तसेच वापरावर लक्ष देऊन सदोष उपकरणं ओळखण्यास मदत होते.

भारतातील स्वयंचलित घरांची बाजारपेठ

भारतातील स्वयंचलित घरांची बाजारपेठ अजून खूप लहान आहे, पण यात खूप क्षमता आहे. स्मार्ट होम्सचे दरवाजे म्हणून स्मार्टफोन्सचा विचार केला तर १३ कोटी लोक स्मार्टफोन वापरत असलेली भारत ही प्रचंड आणि अजूनही दुर्लक्षित बाजारपेठ आहे. येत्या पाच वर्षात काही मोठ्या शहरांमधील उच्च उत्पन्न गटातर्फे रिअल इस्टेट क्षेत्रात जवळपास ७० लाखांपेक्षा जास्त युनिट्सची मागणी होईल तेव्हा या बाजारपेठेतील परिस्थिती आणखी सुधारलेली असेल, त्यामुळेच भारताची भविष्यकालीन बाजारपेठ हे इतर विकसित देशांपेक्षा मोठी ठरते.


image


आव्हानं

क्युबिकलच्या संस्थापकांच्या मते भारतात घर स्वयंचलित करण्याची यंत्रणा बसवण्यातील मोठी आव्हानं म्हणजे जादा किंमती, गुंतागुंतीची आणि मोठी वायरिंग तसेच जागरुकतेचा अभाव आहे.

भारतीय बाजारपेठ अजूनही स्वत: काही तरी करा या प्रकारच्या उत्पादनासाठी तयार नाही या जाणिवेवर त्यांचा व्यवसाय आराखडा आधारित आहे. वीजेच्या वायर घरात टाकण्याचे काम सोपे असले तरी त्यात वायर हाताळ्याव्या लागतात, त्यामुळे ई कॉमर्स सारखा आराखडा इथं वापरणं चुकीचे ठरेल. तसेच घर स्वयंचलित करण्याची यंत्रणा भारतात तशी नवीन असल्यानं ग्राहक ती नेमकी काय आहे हे समजून न घेता विकत घेणार नाही.

भविष्यात घरं स्वयंचलित करण्याच्या तंत्रज्ञानाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी क्युबिकल मोहीम आखणार आहे.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags