चिकित्सासेवा घरोघर पोहोचवणारे ‘हेल्प मी डॉक्टर’!

चिकित्सासेवा घरोघर पोहोचवणारे ‘हेल्प मी डॉक्टर’!

Wednesday November 04, 2015,

4 min Read

आपल्या उभरत्या उद्योगातील व्यावसायिक व्याप्तीची माहिती देताना सुव्रो घोष सांगतात की, “उपलब्ध अहवालांनुसार २०१३-१४मध्ये चिकित्सासेवा व्यवसायाचा आकार सुमारे ८० दशलक्ष डॉलरचा होता.२०१७ पर्यंत तो १७० दशलक्ष डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यातील किमान २५ टक्के ई-हेल्थकेअरचा हिस्सा असेल. ही संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे. कारण आता जास्तीत जास्त चिकित्सा सेवा इंटरनेटच्या माध्यमातून दिल्या जात आहेत”.

हेल्प मी डॉक, डॉक्टर्स, रूग्ण आणि प्रयोगशाळा यांचा एक मंच आहे. हा एक-दुस-यांना संपर्कात ठेवण्यास मदत करतो. या मंचाबरोबरच नोंदणीकृत डॉक्टर्स आणि लँब्ज बँकएंडच्या माध्यमातून आपली माहिती यामध्ये समाविष्ट करतात. ही माहिती रूग्णांना पोर्टलच्या माध्यमातून पाहता येते. मग ते आपल्या गरजेनुसार या सेवांचा शोध घेतात, ऑनलाईन नोंदणी करु शकतात आणि एसएमएस किंवा ईमेलच्या माध्यमातून त्याची पुष्टी मिळवू शकतात. वेबसाईट (संकेतस्थळ)वर सर्व सेंवासाठी ऑनलाईन अदा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. वापरकर्ते त्यांना हवेतर डॉक्टर्स किंवा लँब्स मध्ये रोखीने रक्कम अदा करु शकतील अशी सुविधा देखील देण्यात आली आहे. सध्या या पोर्टलच्या सेवा दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये उपलब्ध आहेत.

एका योजनेला परिणामांपर्यत पोहोचविणे.

या उभरत्या उद्योगाची स्थापना सुव्रो आणि मनीषा सक्सेना यांनी मिळून २००९मध्ये केली. दोघींनी २०१३मध्ये याची प्रायोगिक सुरूवात केली. सुव्रो पश्चिम बंगालमध्ये एका मध्यमवर्गीय परिवारातील आहेत. त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षीच आपले गृहनगर हावडामध्ये एसएसआय मँन्यूफँक्चरिंग युनीट सुरू केले. दिल्लीला आल्यानंतर सुव्रोना डॉक्टर आणि लँब्सची अपॉइंटमेंट घेण्यात खूपच अडचणींचा सामना करावा लागला होता. वेळ नोंदवण्यासाठी इकडे-तिकडे पळापळ करून ते हैराण झाले होते. त्यांच्या भूतकाळातील एका एजन्सीमध्ये सेल्स आणि मार्केटिंगची नोकरी दरम्यान त्यांची भेट अतीमहत्वाच्या ग्राहकांशी होत असे. त्यांनी एका पेट्रोकेमिकल कंपनीसाठी मनुष्यबळ आणि प्रशासकीय जबाबदारी हाताळली होती. त्यांनी एक संधी घेतली, चिकित्सासेवा क्षेत्रात कोणताही अनुभव नसताना त्यांनी ‘हेल्प मी डॉक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सुव्रो आणि मनीषा मागील दहा वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. त्यामुळे दोघांनी चिकित्सासेवा क्षेत्रात एकत्रच येण्याचा निर्णय घेतला. ते सांगतात की, त्यांची पकड तांत्रिक क्षेत्रात आहे. ते एक आर्किटेक्ट आहेत आणि त्या बीटूबी आणि बीटूसी सारख्या जटील संकेतस्थळाच्या मालकीण आहेत. म्हणून जिथे मी माझी क्षमता वापरून व्यवसायाची योजना आणि ती लागू करण्याचा प्रयत्न करतो, तिथे त्या वैचारीक प्रक्रियेत जीव ओतून त्यांना मूर्तस्वरुप देतात. डॉक्टर्स,लँब्स आणि वीसीच्या सोबतच वापरकर्ते आंम्हाला प्रोत्साहित करत आहेत की, आम्ही त्यांना या प्रकारच्या चिकित्सा सेवा एकाछताखाली द्याव्यात.

image


सुरूवातीच्या काळात त्यांना अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले, त्यामध्ये सर्वात मोठे आव्हान होते लोकांना हे समजावून देणे की डॉक्टर्स,लँब्ज आणि रूग्णांना एकाच छताखाली आणले जाऊ शकते. सुव्रो पुढे सांगतात की, “त्यावेळी आम्ही अनेकदा घसरलो, ओळख-परीचयातील लोक आणि मित्रांनी देखील आमची निराशा केली, पण आम्ही कधीही हताश झालो नाही. आमचे सुरूवातीचे दिवस तर खूपच अडचणींचे राहीले आहेत. आतापर्यंत ‘हेल्प मी डॉक’ला आम्ही मुळांपासून जोडले गेलो आहोत, परंतू हे देखील खरेच आहे की, प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान घेऊन येत असतो”.

सध्याच्या काळात चिकित्सा सेवाक्षेत्रात खूप काही घडामोडी झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथील ला रेनॉन हेल्थकेअर ने सेक्वाया कँपीटल,प्रँक्टो यांच्याकडून शंभर कोटींचा निधी मिळवला होता. सेक्वाया कँपिटल आणि मँट्रिक्स पार्टनर्सव्दारे समर्थीत प्रँक्टो२०१५ मध्ये हजार कर्मचा-यांना नियुक्त करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. मीणा गणेश आणि कृष्णन गणेश यांच्या होम हेल्थकेअर कंपन्या मागील वर्षी क्वालकॉम कडून निधी मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत. या शिवाय काही नविन कंपन्यादेखील या सेगमेंट मध्ये आल्या आहेत. जसे प्लेक्ससएमडी,डॉक्टरांसाठी नोकरी डॉट कॉम आणि प्रत्येक प्रकारची चिकित्सा सेवा देणारी वेबसाईट (संकेतस्थळ) झेयवाइये आहे.

व्यावसायिक आराखडा

रूग्णांसाठी ‘हेल्प मी डॉक’ची सेवा मोफत आहे. डॉक्टरांसाठीही काही सेवा मोफत आहेत, परंतू ‘डॉकप्रँक्टीस’ सारख्या काही साधारण सेवा- प्रँक्टीस मँनेजमेंट सॉफ्टवेअर (पीएमएस) डॉक्टरांना वार्षिकशुल्क आकारून उपलब्ध केली जाते. या सेवेअंतर्गत डॉक्टर आपली रसीद, देयके आणि भेटण्याच्या वेळा इत्यादीची माहिती डिजीटल फॉर्मेट मध्ये कुठेही आणि कधीही प्राप्त करू शकतात.

‘हेल्प मी डॉक’च्या माध्यमातून होणा-या प्रत्येक व्यवहारावर लँब आणि इमेजींग सेंटर्सना एडमीन शुल्क द्यावे लागते. वेगवेगळ्या गरजा आणि वयांच्या लोकांना समोर ठेऊन सध्या चार प्रकारची हेल्थ कार्ड जारी केली जातात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यत: डिजीटल मार्कैटिंगचा वापर केला जातो. त्याबरोबरच माऊथ पब्लिसीटी व्यतिरिक्त व्यक्तीश: डॉक्टर्स आणि लँब्ज यांना भेटी देऊन प्रचार करण्यात आला. तसेच वेबसाईट वर नोंद केल्यानंतर अनेक चाचण्यांमध्ये पंचवीसटक्के पर्यंत सूट देखील दिली जाते.

भविष्यातील योजना

मागील चार महिन्यात ‘हेल्प मी डॉक’ने ६५००पेक्षा जास्त डॉक्टरांना नोंदणीकृत केले आहे. यामध्ये ते सदस्य देखील सहभागी आहेत, ज्यांनी प्रिमीयम सेवांसाठीही नोंदणी केली आहे. या नोंदणीत ३५पेक्षाजा्स्त लँब सहभागी आहेत. मागील चार महिन्यात अडीचलाख लोकांनी या पोर्टलला भेट दिली आहे. तसेच प्रत्येक महिन्याला वापरकर्त्यांची संख्या पन्नास टक्क्यांनी वाढते आहे. आता पूर्ण देशभरात आपले नेटवर्क पोहचवण्यासाठी गुंतवणूकदारांचा शोध घेतला जात आहे. याबरोबरच वेबसाईटवर नवनविन गोष्टींचा समावेशही केला जात आहे.

त्यांचे लक्ष्य आपल्या नेटवर्कचा विकास करून प्रत्येक व्यक्तीपर्यंत चिकित्सा सेवा पोहोचविणे हे आहे. पुढील पाच वर्षात ‘हेल्प मी डॉक’ भारतातच नव्हे तर जगभरातील प्रत्येक घरात जाणारे पोर्टल बनावे असा प्रयत्न केला जात आहे. सध्या या सेवा केवळ वेबवर उपलब्ध आहेत भविष्यात मोबाईल ऍप लॉंच करण्याची देखील योजना आहे.