संपादने
Marathi

लग्नाला विरोध करण्यासाठी तिने बारा कि.मी पायी चालून गाठले पोलिस ठाणे !

Team YS Marathi
11th Apr 2017
Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share

जरी बाल विवाहाला कायद्याने मानवाधिकाराचे पूर्णत: उल्लंघन ठरविण्यात आले असले तरी, भारतात मात्र आजही मोठ्या प्रमाणात बाल विवाह केले जात असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या महिला बाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अगदी कायदे करूनही आणि सरकारने लक्ष देवूनही, लोकांच्या वागण्यात काही प्रमाणात सकारात्मक बदल होत असूनही अशा घटना घडताना दिसत आहेत. नमिता महातो या अल्पवयीन आदिवासी मुलीने देखील अशाच प्रकारे सकारात्मक बदल घडवत समाजाला नवे वळण घालून दिले आहे.


image


नवव्या वर्गात शिकणारी ही मुलगी, जी पुरूलिया येथे राहते, जे पश्चिम बंगालच्या दुर्गम भागातील गाव आहे. तिच्या पालकांनी बाजूच्या गावातील वर मुलगा शोधला आणि तिला मंगळवारी पाहण्यासाठी तो येणार होता, मात्र तिने सातत्याने तिला शिकायचे आहे असा तगादा पालकांजवळ लावला होता. ज्यावेळी तिला तिच्या नियोजित वराच्या बाजूला बसायला सांगण्यात आले, तिने तेथून पलायन केले. तिच्या गावात सार्वजनिक वाहतून व्यवस्था नव्हती तरी तिने बारा कि.मी पायी चालत जावून पोलिस ठाणे गाठले आणि आपल्याला अजून शिकायचे आहे लग्न करायचे नाही अशी इच्छा बोलून दाखवली. याबाबतच्या वृत्तानुसार तिने पोलीस अधिका-याला सांगितले की, “ मी अल्पवयीन आहे, तरी माझ्या पालकांना माझे लग्न करायचे आहे, हे पहा माझा माध्यमिक शाळेत जाण्याचा दाखला ज्यावर माझा जन्म दिनांक आहे. मला शिकायचे आहे, लग्न करायचे नाही”. 

तिच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले, आणि सांगण्यात आले की जर त्यांनी हे लग्न केले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई केली जाईल. त्यांच्या कडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्यात आली की ते अशाप्रकारे बाल विवाह करणार नाहीत आणि तिचे वय अठरा होई पर्यंत शांत राहतील.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे, नमिता ही काही एकमेव मुलगी नाही जिने पालकांच्या बाल विवाहाच्या निर्णयाला विरोध केला, येथे रेखा कालिंदी, अफसाना खातून, आणि सुनिता महातो अशा मुली आहेत ज्याना राष्ट्रपतींचे शूरता पुरस्कार मिळाले आहेत, कारण त्यांनी असामान्य धैर्य़ दाखवून विरोध केला. याबाबत पालकांना विरोध करणा-या मुलींचा आकडा ६२च्या घरात असला तरी प्रत्यक्षात तो खूप मोठा असण्याची शक्यता आहे.

आमच्याकडे मुक्ती मंजीही सारख्या आदिवासी मुली देखील आहेत, ज्यांना नियोजित वरासोबत एक रात्र राहण्यासाठी बळजबरी करण्यात आली, कारण तिने लग्नास नकार दिला होता. त्यानंतरही तिला अमानुषपणे वागवण्यात आले मात्र तिने शिक्षकांच्या आणि सीएलपी अधिका-यांच्या मदतीने त्याचा प्रतिकार केला होता.

Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags