संपादने
Marathi

बीएसएनएलने आता दिली आहे आठ भारतीय भाषांमधून इमेल अॅड्रेस देण्याची सुविधा!

27th Dec 2016
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

अनेक प्रकारच्या सेवाबदल आणि नाविन्याच्या गोष्टी घेवून भारत संचार निगम कडून देशासाठी नव्याने काही चांगली बातमी आली आहे. भारत सरकारच्या डिजीटल इंडियाच्या स्वप्नाला साकारताना त्यांनी डाटामेलची नवी सुविधा दिली आहे, त्यानुसार त्यांच्या ब्रॉडबँण्ड सेवा घेणा-या ग्राहकांना त्यांचे इमेल आयडी आणि मिळणारे मेल त्यांच्या स्थानिक भाषेत मिळू शकणार आहेत. सध्या ही सेवा आठ भाषांत सुरु झाली आहे.

डाटामेल, या स्टार्टअप फिचरने मोबाईल स्पार्क२०१६मध्ये मोबाईल फोनच्या भाषेच्या अडथळ्यांना पार करण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. झेनप्लसने ते तयार केलेले हे इमेलबाबतचे सोल्युशन आहे. डाटामेल हे नवे उत्पादन आहे ज्याव्दारे इंग्रजी आणि बिगर इंग्रजी लिहिणा-या लोकांमधील दरी कमी केली आहे.

image


बीएसएनएलच्या या ऑफरचा उद्देश इमेल करणे आधिक सोपे करावे आणि देशाच्या ग्रामिण भागातील बिगरइंग्रजी लोकांना त्यासाठी प्रोत्साहित करावे हा आहे. या ‘भाषिक इमेल ऍड्रेस’ मुळे बीएसएनएल ला देशभरातील ८४.५४ दशलक्ष ग्राहकांना नव्या सेवा देता येणार आहेत.

अधिकृत प्रसिध्दीपत्रकानुसार, बीएसएनएलच्या व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, “ भाषिक इमेल ऍड्रेसची सुविधा दिल्याने हा अशाप्रकारचा एक पुढाकार आहे की, ज्यातून आमच्या पंतप्रधानाच्या डिजीटल इंडियाच्या स्वप्नांची पूर्ती करणे शक्य होणार आहे. यातून भारताच्या प्रत्येक भागात हव्या त्या भाषेतून आता इमेल समजणे आणि शिकणे शक्य होणार आहे.”

 सीएफएचे संचालक एन के गुप्ता यांनी सांगितले की हे ऍप कोणत्याही ऍन्ड्रॉइडवरून डाऊनलोड करता येणार आहे. हे ऍप डाटा एक्सजेन ने विकसित केले आहे, आणि कंपनीच्या सीईओने सांगितले की, पंतप्रधान मोदी याच्या डिजीटल इंडियामध्ये योगदान देताना बीएसएनएलशी सहकार्य करून त्यांना खूप आनंद होत आहे. 

ही सेवा उपल्बध करून घेण्यासाठी या काही पाय-या आहेत :

1. बीएसएनएल ब्रॉडबँण्ड ग्राहकांना डाटामेल ऍप वापरता येईल, जे कोणत्याही ऍन्ड्रॉईड किंवा आयओएसवर उपल्बध आहे.

2. वापरकर्ते त्यांना हव्या त्या भाषेत इमेल ऍड्रेस तयार करु शकतात.

3. मोबाईल क्रमांक भरा.

4. मी बीएसएनएल ग्राहक आहे हा बॉक्स भरा.

5. बीएसएनएल ब्रॉडबँण्ड क्रमांक एसटीडी कोड सह भरा.

6. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी क्रमांक येईल.

7. तुम्हाला हवा असलेल्या भाषेतील तुमचा ईमेल आयडी लिहा.

8. तुमच्या मित्रपरिवारासोबत त्या नव्या आयडीचा वापर सुरु करा.

डिजीटल मिडियामध्ये भारतीय भाषांना फारच थोडे स्थान आहे, थिंक चेंज इंडिया मध्ये आमचे मत आहे की, हे खूप मोठे पाऊल आहे. ज्यातून भारतीय भाषांचे डिजीटल जगतात मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व केले जाणार आहे. यातून या भाषांना जगातले खूप मोठे दालन उघडले जाणार आहे भारतीय नागरिकांना खास करून ग्रामीण भागातील लोकांना डिजीटल जगात पदार्पण करता येणार आहे.

सौजन्य - थिंक चेंज इंडिया

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags