संपादने
Marathi

सर्वकाही फिक्स करते ʻफिक्सोफीʼ

13th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

स्टार्टअप्समध्ये अद्भुत क्षमता आहे, ज्यामुळे ते आपल्यासोबत विविध आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या लोकांना जोडून ठेवते. नसरुल्लाह हे याबाबतील एक जिवंत उदाहरण आहे. लाजाळू स्वभावाचे नसरुल्लाह हे व्यवसायाने प्लंबर आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी बंगळूरू येथे लोकांना सेवा पुरवणारा समूह ʻफिक्सोफीʼ जॉईन करण्याचा निर्णय घेतला. नसरुल्लाह सांगतात की, ʻमी सहा महिन्याचा एक करार केला होता. जर ते लोक मला काम देतील तर मला नक्कीच आनंद होईल. आम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की, आमचे काम व्यवस्थित करायचे आणि ग्राहकांना संतुष्ट करायचे.ʼ

ʻफिक्सोफीʼचा प्रवास गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरू झाला. ʻफिक्सोफीʼचे संस्थापक मयूर मिश्रा हे आपल्या घराच्या दुरुस्तीकरता मजूर शोधुन हैराण झाले होते. त्यांनी सांगितले की, ʻएका शहरात दहा वर्षांपासून राहणाऱ्या लोकांकरितादेखील हे एक आव्हान आहे. मात्र प्रत्येक घराची ही गरज आहे.ʼ एका महिन्याच्या मेहनतीनंतर जानेवारी २०१५मध्ये फिक्सोफीने सरजापूर येथे आपले कार्यालय उघडले. मार्चपर्यंत इथल्या लोकांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती आणि एप्रिलपर्यंत त्यांनी आपल्या कामाचा विस्तार कोरामंगलपर्यंत केला होता. शशांक पेरी आणि शिवनारायण कार्तिक यांना आपल्या मुख्य टीममध्ये सहभागी करणाऱ्या मयूर यांच्या मते, ʻआम्ही आमच्या कामाला पहिल्यांदा सुरुवात केल्यानंतर तिच प्रक्रिया वारंवार करणे, सोपे झाले. आरटी नगर आमचे पुढचे ध्येय होते, ज्यावर आमचे लक्ष होते. त्यांच्याकडे आता गुडगाव येथे एक ऑपरेशन मॅनेजर असून, तो लवकरच एनसीआर येथे ʻफिक्सोफीʼ स्थापन करण्यासाठी मदत करणार आहे.ʼ

image


मयूर यांनी सांगितले की, दररोजची घरगुती कामे करण्यासाठी ऑनलाईन बाजारपेठ नाही, ही त्यांच्याकरिता एक समस्या नव्हती. तर मिळणाऱ्या सेवेचा दर्जा चांगला नव्हता, ही त्यांची समस्या होती. याक्षेत्रात पूर्वीपासूनच काही प्रस्थापित ब्रॅंड होते. जसे की, हॉनेस्टकॉलर्स, डोरमिंट, बुकमायबाई, इजीफिक्स, टास्कबॉब, जेप्पर आणि टाइमसेवर्ज. मयूर यांच्या मते, ʻʻफिक्सोफीʼ या सर्वांपेक्षा वेगळे आहे. कारण येथे फक्त १० सेकंदात बुकिंग केली जाऊ शकते. तसेच ग्राहकाला सेवा पुरवणाऱ्याच्या संपर्कात आणण्यासाठी फक्त ३० मिनिटांचा अवधी लागतो. आमचे संपूर्ण लक्ष बॅकएंड इकोसिस्टमला एवढे मजबूत बनविण्याचे आहे की, ज्यामुळे सेवा पुरवणाऱ्याशी तात्काळ संपर्क करता येऊ शकेल आणि ग्राहकांना जलदगतीने सेवा पुरवता येईल. सेवा पुरवणाऱ्या प्रत्येकाची अनेक स्तरावर पडताळणी केली जाते. त्याच्याकडे किमान पाच वर्षांचा अनुभव असणे, जरुरीचे आहे.ʼ ʻफिक्सोफीʼने प्रतितास या हिशोबात कोणताही दर निश्चित केलेला नाही. त्यामुळे सेवा पुरवणाऱ्याला आपला दर ठरविणे, सोपे जाते. मयूर सांगतात की, ʻत्यांना नव्या ग्राहकांची गरज आहे. अशा परिस्थितीत हे त्यांच्यासाठी एक उत्पन्नाचे साधन झाले आहे. त्यासाठी ʻफिक्सोफीʼ त्यांच्याकरिता एक आदर्श व्यासपीठ आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर आमच्या मनात एक ठराविक दर निश्चित करण्याचा विचार आला होता. मात्र सेवा पुरवण्याचा स्तर वेगवेगळा असल्याने असे करणे असंभव होते. अनेकदा असे होते की, ज्या समस्येचा अंदाज बांधण्यात येतो, वास्तवात तशी परिस्थितीच नसते. त्यामुळे विशेष प्रकारची सेवा पुरवणारेच अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करतात. जोपर्यंत सेवा पुरवण्याचा प्रश्न आहे, तोपर्यंत ग्राहक आणि सेवा पुरवणारे, हे दोन्ही पक्ष समाधानी होणे, गरजेचे आहे. त्यामुळे सेवा पुरवणारे स्वतः आपला दर सांगतात.ʼ

ʻफिक्सोफीʼचे पुढचे लक्ष्य आपले काम जास्तीत जास्त स्वयंचलित करणे, हे आहे. मयूर सांगतात की, ʻआतापर्यंत आमची सर्व तांत्रिक कामे बाहेरुन करण्यात येत होती. मात्र आता आम्हाला स्वतःची तांत्रिक टीम हवी आहे, जी बॅकएंडचे काम सांभाळेल.ʼ मयूर यांच्या मते, ʻकाम करण्यासाठी मानवी योगदान जेवढे कमी असेल, तेवढाच तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. जेणेकरुन कमी कालावधीत ग्राहकांना सेवा पुरवणाऱ्यासोबत जोडता येऊ शकेल.ʼ ʻफिक्सोफीʼ प्लंबिंग, रंगारी, इलेक्ट्रीकल (यात घरगुती उपकरणे आणि लॅपटॉप दुरुस्ती सारख्या कामांचादेखील समावेश आहे) या सेवा पुरविते. सध्यातरी ही सेवा मर्यादित आहे. मात्र हळूहळू गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता या सेवांचा विस्तार करण्याचा मयूर यांचा विचार आहे. सफाई आणि पेस्ट कंट्रोल सारख्यादेखील घरगुती सेवा पुरविण्याचा त्यांचा मानस आहे. ʻफिक्सोफीʼसोबत जोडलेले सेवा पुरवणारे आतापासून हे सांगत आहेत की, ʻफिक्सोफीʼमुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात फायदा झाला आहे. त्यांना दररोज किमान तीन नवे ग्राहक मिळत आहेत, जी त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे.

image


ʻफिक्सोफीʼचा प्रवास हा सहजसोपा नव्हता. एकीकडे एका अव्यवस्थित क्षेत्राला स्टार्टअपसोबत जोडणे कठिण होते, दुसरीकडे लोकांनादेखील यात सहभागी करणे, बरेच आव्हानात्मक काम होते. आरटी नगर येथून संचालन करणाऱ्या शशांक यांचे म्हणणे आहे की, ʻमाझ्यासाठी माझ्या आयुष्यातील ही एक चांगली संधी होती. कल्पना चांगली होती. त्यावर काम करणारी टीम चांगली होती. आम्ही लोकांनी काम पुढे नेले. सुरुवातीला आम्हाला अनुभव नव्हता. त्यामुळे आमच्यासाठी ही हळू आणि थकवणारी प्रक्रिया होती. मात्र आम्ही आमच्या चुकांपासून शिकत गेलो आणि पुढे जात राहिलो.ʼ स्पर्धेच्या या युगात कोणताही व्यवसाय प्रस्थापित करणे, मेहनतीचे काम आहे. याबाबत बोलताना आयआयटी हैदराबादचे पार्थ श्रीवास्तव सांगतात, ʻआम्ही पहिल्या दिवसापासून शिकायला सुरुवात केली होती. मी विपणन विभागात काम करण्यासाठी निवेदन केले होते. मात्र मी ऑपरेशन, आर्थिक आणि ऑन फिल्ड काम देखील करायचो. सुरुवातीच्या काळात कंपनी कशी चालवायची, हे मी इथे शिकलो. रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही कार्यालयात असायचो. मात्र आम्ही कामाचा आनंद लुटायचो.

कोणत्याही अन्य स्टार्टअपप्रमाणे ʻफिक्सोफीʼदेखील फंडिंगच्या शोधात आहे. ʻफिक्सोफीʼ किती चांगला व्यवसाय करू शकते, बाजारात कोणत्या नव्या गोष्टी घेऊन येईल आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यासमोर कशाप्रकारे आपले वेगळेपण सिद्ध करेल, हे येणारा काळ ठरवेल. सध्यातरी त्यांच्याकडे बंगळूरूवासियांची सेवा करण्यासाठी एक संकेतस्थळ आणि एप्लीकेशन आहे. चांगली सेवा देणाऱ्यांचा शोध घेणे एक आव्हानात्मक काम आहे. यांमध्ये अधिकतम लोक जावेद यांच्याप्रमाणे स्वतंत्र व्यवसाय करणारे आहेत. चार वर्षांच्या मुलाचे पिता असलेले जावेद सांगतात की, ʻʻफिक्सोफीʼसोबत जर मी जोडला गेलो नसतो, तर मला हा फायदा झाला नसता. माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी हे महत्वाचे ठरते. प्रत्येक झाड जे वाढण्याचा प्रयत्न करते, त्याला सांभाळण्यासाठी मजबूत मुळांची आवश्यकता असते.ʼ या व्यवसायात २२ वर्षे काढल्यानंतर त्यांना पूर्ण विश्वास वाटतो की, ग्राहक त्यांना कामासाठी कायम बोलवणार, भले ते चेन्नई येथे स्थायिक असो वा बंगळूरू येथे. ते पुढे सांगतात की, मी ʻफिक्सोफीʼसोबत दोन-तीन महिन्यांपासून काम करत आहे आणि ते चांगले सुरू आहे. जावेदने फक्त पाचवी इयत्तेपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर विविध कार्यशाळांमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, ते आपला व्यवसाय करू इच्छितात का?, तेव्हा त्यांनी सांगितले की, प्रत्येकाचे हे स्वप्न असते. मला फक्त कामात व्यस्त राहायचे आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags