संपादने
Marathi

इंदूरच्या जिल्हाधिका-यांनी २५०उपेक्षित घटकातील मुलींसाठी दंगल सिनेमाचा विशेष खेळ दाखविला

Team YS Marathi
8th Jan 2017
1+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

आमीर खान याच्या ‘दंगल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुम केली आहे, या सिनेमातून देशात मोठ्या प्रमाणात सकारात्मक सूर उमटायला लागले आहेत. कुटूंबांना त्यांच्या घरातील मुलींना त्यांच्यातील गुणांना वाव द्यावा असे वाटू लागले आहे. इंदूरचे जिल्हाधिकारी पी. नरहरी यांनी देखील समाजातील दुर्लक्षित उपेक्षित घटकातील २५० मुलींसाठी या सिनेमाच्या विशेष खेळाचे आयोजन केले होते. त्यांना लहान वयातल्या या मुलींना प्रेरणा घेता यावी यासाठी हा उपक्रम आयोजीत करावा असे वाटले, त्यांना योग्य तो पाठिंबा मिळावा यासाठी या मुलींना दंगल सिनेमा दाखवावा असे त्यांना वाटले.


Source : Amity University

Source : Amity University


उपेक्षीत घटकातील लोकांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी नरहरी नेहमीच जागरुक असतात, कारण ते स्वत: देखील अशाच समाजातून आले आहेत. त्याबाबत बोलताना नरहरी म्हणाले की, “ मी काही अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदा करत नाही, ग्वालेर येथे जिल्हाधिकारी म्हणून असतानाही मीअशा प्रकारचे काम केले आहे. तेथेही मुलींच्या उन्नतीसाठी मी काही कामे केली आहेत.” फोगाट भगिनींचे उदाहरण बोलताना ते नेहमीच मुलींना देत असतात जेणे करून त्यांना प्रेरणा मिळावी. ते म्हणाले की, “ मी प्रोत्सहनात्मक बोलणारा वक्ता आहे, आणि म्हणून मी नेहमी फोगाट भगिनीचे उदाहरण अनेकदा देत असतो. त्यामुळे जेंव्हा मला समजले की त्यांच्या जीवनावर सिनेमा तयार करण्यात आला आहे, मला वाटले की मुलींना तो दाखवलाच पाहिजे, त्यांना त्यातून प्रेरणा घेता आली पाहिजे.” त्यांनतर त्यांनी सर्व मुलींना पाहता येईल अशा प्रकारच्या सिनेमा हॉलची योजना केली. वृत्तानुसार या सा-या मुली वेगवेगळ्या अनाथालयातील होत्या, जी सेवाभावी संस्था चालवितात. जसे की जीवन ज्योती आणि श्रध्दानंद आश्रम. नरहरी म्हणाले की, “ सिनेमागृहाच्या चालकाने आमच्यासाठी तातडीने बुकींग दिले. अनेक मुली त्याच्या जीवनात त्या पहिल्यांदाच सिनेमागृहात जावून सिनेमा पहात होत्या किंवा मॉल मध्ये आल्या होत्या. त्या उत्साही होत्या. आम्ही त्याच्यासाठी उपहाराची व्यवस्था ठेवली होती. आमची अपेक्षा आहे की या मुलीनी जीवनाची भव्यता पहावी, आणि या सिनेमाच्या मदतीने ती त्यांना समजू शकेल.

ते पुढे म्हणाले की, “ आम्ही पाच भाऊ आणि एक बहीण असे कुटूंब होते. माझ्या वडीलाना मुलगी हवी होती! ते शिंपी(टेलर) होते, पण त्यांना माहिती होते की गावात स्त्रीया आणि पुरुषांत फारसे काही अंतर नव्हते. त्यामुळेच माझ्या बहिणीने आम्हा भावांपेक्षा जास्त शिक्षण घेतले.” तिचा वडीलांचा अभिमान आहे ज्यानी मुलांना कायम महिला सक्षमीकरणाचे चांगले काम करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी सूचना केली की सार्वजनिक सेवेतील अधिका-यांनी जबाबदारी घेवून नवे उदाहरण घालून दिले पाहिजे. लोकांना त्यांनी हे दाखवून दिले पाहिजे की आम्ही समाजाचा विचार करतो त्यांची काळजी घेतो. त्यातून लोकांचा विश्वास वाढेल आणि लोकांचे भले होवू शकेल, म्हणून मी हे करत राहीन.

1+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags