दुबईतील एका लहानशा रो हाऊसमध्ये सुरुवात करत, संपूर्ण मध्य पूर्वेत सर्वात मोठे ट्रॅव्हल पोर्टल बनण्याचे ‘हॉलीडेमी’ चे लक्ष्य...

30th Nov 2015
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

भटकंतीची प्रंचंड आवड असणाऱ्या दिग्विजय प्रताप आणि गीत भल्ला, या दोघांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली, ती म्हणजे संपूर्ण प्रवासाची ऑनलाईन आखणी करण्याचा अनुभव हा खूपच त्रासदायक असून त्यामुळे प्रवासाची सगळी मजाच निघून जाते. आज जरी बरीच संकेतस्थळे आणि पोर्टल्स उपलब्ध असली, तरी ती एकाच फटक्यात सर्व आरक्षणे करण्यासाठी आवश्यक साधनांनी युक्त अशी नाहीत.

तसेच अनेक संकेतस्थळे अशी आहेत, जी तयार हॉलिडे पॅकेज (सुट्टीसाठी तयार योजना) देऊ करतात, मात्र त्यामध्ये बदल करत प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करुन सहजगत्या प्रवासाची योजना आखण्याची काहीच सोय उपलब्ध नाही. एकतर जे काही उपलब्ध आहे त्यामधूनच निवड करण्याची तडजोड तरी करावी लागते किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय घेतलात, तर प्रवासाची योजना आखताना एका खूपच लांबलचक प्रक्रियेतून तरी जावे लागते.

याची सुरुवात झाली ती एका रो-हाऊसमधील लहानशा खोलीत काम करणाऱ्या पाच लोकांपासून... एका मोठ्या विचारमंथनानंतर आणि कल्पनांच्या देवाणघेवाणीतून हॉलीडेमी (HolidayMe)चा जन्म झाला. गीत सांगतात, “ केवळ काही सरळ क्लिक्समध्ये सुट्टीचे आयोजन करण्यासाठी आणि आरक्षण करण्यासाठी बाजारात एका सोप्या व्यासपीठाची गरज असल्याची आम्हाला खात्री पटली होती.”

image


नविन बाजारपेठांचा शोध

हॉलीडेमीच्या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या गरजांनुसार आरक्षण करता येते, यामध्ये हॉटेल्स, कार्यक्रम आणि हस्तांतरणाचा समावेश आहे, तेदेखील काही सरळसोप्या क्लिक्समध्ये आणि हे झाल्याची पुष्टीही तुम्हाला लगेचच मिळते. ही एक स्टार्टअप असल्याने या जोडगोळीला एक गोष्ट निश्चितच जाणवली होती, ती म्हणजे या उत्पादनाचे स्वतःचे असे खास स्थान निर्माण करण्याची गरज आणि त्याचबरोबर ज्या बाजारपेठांमध्ये त्यांना काम करायचे आहे, त्या बाजारपेठांची चिकित्सकपणे निवड करण्याची गरज.

भारत, जरी एक खूपच मोठी आणि रंजक बाजारपेठ असली, तरीही तेथे मोठे खेळाडू यापूर्वीच बाजारात होते आणि त्यामुळे ग्राहक मिळविणे हेदेखील खर्चिक असल्याने वेगळीच आव्हाने होती. यानंतर मध्य पूर्वेमध्ये असलेल्या मोठ्या संधीकडे त्यांचे लक्ष गेले.

यासाठी मूळ नमुना तयार करण्यासाठी कारणीभूत ठरले ते रजत पनवार आणि या क्षेत्रातील दिग्गजांनीदेखील त्याची खूपच प्रशंसा केली. ज्यामुळे त्यांना हे उत्पादन बाजारात आणण्यासाठीआत्मविश्वास निर्माण झाला.

“ मध्य पूर्वेकडील लोकांना अजूनही सुट्टयांचे आरक्षण करण्यासाठी स्थानिक ट्रॅव्हल एजंटवरच अवलंबून रहावे लागत होते. त्यांना कोणतेही स्थानिक ऑनलाईन पोर्टल उपलब्ध नव्हते, ज्यामाध्यमातून ते सहजपणे त्यांच्या सोयीने आणि गरजांनुसार सुट्ट्यांचे आरक्षण करु शकत होते,” गीत सांगतात.

हॉलीडेमीने ही पोकळी भरुन काढली आणि वापरकर्त्यांना त्यांचा प्रवासाचा मार्ग आखण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर आपल्या हॉलीडे पॅकेजचे त्वरीत आरक्षण करणेही त्यांना सहज शक्य झाले. मध्य पूर्वेतील वापरकर्त्यांना आपल्या प्राधान्यक्रमानुसार सुट्टीची आरक्षणे करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, ही यामागची कल्पना होती. यामध्ये सुट्टीचा कालावधी, तारखा, तेथील कार्यक्रम, मुक्कामाच्या ठिकाणी विशेष हॉटेलचे आरक्षण आणि पैशांचे हस्तांतरण करण्यासाठी त्यांच्या आवडीचा पर्याय, यांचा समावेश होता.

ग्राहकांचा आवाज

“ ग्राहकांच्या गरजा आणि आवश्यकता डोक्यात ठेवून, आमच्या संकेतस्थळावर ‘स्पिक टू ऍन एक्सपर्ट’ (तज्ज्ञांशी बोला) ही वैशिष्ट्यपूर्ण सोयही उपलब्ध आहे. जेणेकरुन ग्राहकांना कोणत्याही वेळी मदत उपलब्ध होऊ शकते,” दिग्विजय सांगतात.

या क्षेत्रातील इतरांकडून आणि तज्ज्ञांकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार, सौदी अरेबियातील गुंतवणूकदारांपुढे सादरीकरण करण्यापूर्वी मुळ नमुन्यात सुधारणा करण्यात आली. वरीष्ठ पदांसाठी या क्षेत्रातील कुशल लोकांना नेमले गेले, ज्यांच्यामुळे हे उत्पादन सद्यस्थितीत पोहचण्यासाठी मदत झाली.

“वेगवेगळ्या माध्यमातून माहिती जमविण्याचा आमचा प्रयत्न असतो, उदाहरणार्थ आमचे ग्राहक आणि आमचे प्रतिनिधी यांच्यामधील संवादातून, पुरवठादारांकडून, त्याचबरोबर ग्राहकांच्या समीक्षेतून आम्ही माहिती गोळा करतो. त्याचबरोबर लोकांच्या भावना, संदर्भ आणि ‘मशीन लर्निंगचा’ वापर करुन त्यांना कोठे आणि कधी जाण्याची योजना आहे हेदेखील ओळखण्याचा आमचा प्रयत्न असतो. यामुळे मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते,” गीत सांगतात.

‘ ट्रस्टपायलट’ सारख्या खुल्या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्राहकांनी आपले अनुभव सांगावेत, यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो. त्याचबरोबर टीमला वापरकर्त्यांच्या अनुभवी दृष्टीकोनातूनही काही उपयुक्त माहिती मिळते.

नविन बाजारपेठांमध्ये प्रवेश

मध्य पूर्वेमध्ये हॉलीडेमीसारखी नविन संकल्पना ग्राहकांना पटवून सांगणे, हे सुरुवातीच्या काळातील प्रमुख आव्हान होते. “ युएई मध्ये गेल्या एका वर्षातच, ऑनलाईन हॉलीडे पुरवठादार म्हणून आम्ही वेगाने आघाडीवर आहोत,” गीत सांगतात.

सातत्याने नाविन्यपूर्ण आणि सुधारित गोष्टींचा पुरावठा करत रहाणे आणि ग्राहकांना अधिकाधिक चांगला अनुभव देत रहाणे, हे या टीमपुढील सर्वात महत्वाचे आव्हान आहे. “ सध्या आम्ही दरमहा शेकडो हॉलीडे पॅकेज विकत आहोत,” गीत सांगतात.

ओपन सोअर्स आणि मायक्रोसॉफ्ट डॉट नेटचे मिश्रण हॉलीडेमी वापरते. त्यांनी त्यांच्या मालकीचा तांत्रिक पाया हा एसओए, हाय एव्हेलेबेलिटी (एचए), स्केलेबिलिटी आणि अधिक रंजक संकल्पना जशा की बीग डेटा, मशीम लर्निंग आणि प्रेडीक्टीव ऍनॅलिटीक्स यासारख्या संकल्पनांवर तयार केला आहे.

भाषिक अडथळ्यांवर मात

गीत सांगतात की हे केवळ हॉलीडे पॅकेजेस् देऊ करणारे पहिलेच अरेबिक संकेतस्थळ आहे असे नाही तर स्थानिक बाजारपेठेत अरेबी भाषेतच कार्यक्रम आणि पैशाच्या हस्तांतरणाची सोय देऊ करणारेही पहिलेच संकेतस्थळ आहे. सौदी अरेबिया आणि जीसीसी (गल्फ कोऑपरेशन कॉन्सिल) मधील बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या हेतूनेच अशी उभारणी केली आहे.

व्यवस्थापकीय संचालक असलेले दिग्विजय, हे कंपनीचे प्रमुख उत्पादन धोरणकर्तेही आहेत. कोडींगमध्ये स्वतःला असलेली आवड दिग्विजय यांना आयुष्यात खूपच लवकर लक्षात आली आणि सॉफ्टवेअर अभियंता म्हणून एका यशस्वी कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी कंप्युटर ऍप्लिकेशनस् मध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली.

अविवा, हॉटेलट्रॅव्हलडॉटकॉम (ज्याचा ताबा पुढे मेकमायट्रीपडॉटकॉम ने घेतला) आणि पाथफाईंडरमध्ये त्यांनी व्यवस्थापनामध्ये महत्वपूर्ण भूमिका केल्या. त्याचबरोबर थॉमस कुकमध्येही ते तंत्रज्ञान सल्लागार होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या गीत यांना स्वतःला प्रवासाची खूपच आवड असून त्यांनी आतापर्यंत पन्नासहून अधिक देशांना भेट दिली आहे. त्यांना आर्थिक आणि बॅंकींग तंत्रज्ञान क्षेत्राची पार्श्वभूमी असून, मध्य पूर्वेमध्ये विक्री आणि विपणन व्यवस्था उभारण्याचा पंधराहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.

त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम केले आहे आणि मध्य पूर्वेतील व्यावसायिक जगतातील व्यावसायिकांशी उत्तम संबंध प्रस्थापित केले आहेत.

मध्य पूर्वेकडील बाजारपेठ हस्तगत करताना

मध्य पूर्वेतील ग्राहकांना त्यांच्या सुट्टीची योजना पुरविणारे सर्वात मोठे आणि परिपूर्ण ऑनलाईन शॉप होण्याचे हॉलीडेमीचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर ग्राहकांनी त्यांच्या सुट्ट्यांचे आरक्षण करण्यासाठी या उत्पादनाचा मोबाईलद्वारे वापर करावा, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

“जरी सुरुवातीला युएई बाजारपेठेवर आम्ही लक्ष केंद्रीत केले असले, तरी सध्या मात्र आमचे संपूर्ण लक्ष आहे ते सौदी बाजारपेठेत प्रवेश करण्यावर, जी प्राथमिकरित्या अरबी भाषिक आहे. तर भविष्यात कतार, कुवेत आणि बहरीन यासारख्या मध्य पूर्वेतील प्रदेशातही प्रवेश करण्याचा आमचा बेत आहे,” गीत सांगतात.

लेखक – सिंधु कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा

Our Partner Events

Hustle across India