संपादने
Marathi

‘रेस्सी’च्या मदतीने मिळवा तुमच्या आवडत्या हॉटेलच्या बिलात सवलत

Nandini Wankhade Patil
10th Jul 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

तुम्ही तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवायला गेलात आणि तुमच्या जेवणाच्या किवा नाश्त्याच्या बिलावर तुम्हाला जर काही टक्के सवलत मिळाली तर ? मग काय, विचारायलाच नको. पुण्यातील दोन युवकांनी अशा प्रकारची सवलत देणारे अॅप विकसित केले आहे. ज्यामुळे तुम्हाला हॉटेलमधील जेवणाच्या बिलावर सूट मिळते. या अॅपचे नाव आहे ‘रेस्सी’ (RESSY).

image


‘रेस्सी’ हे एक असे अॅप्लिकेशन आहे ज्याच्या मदतीने वापरकर्त्याला नुसत्या जेवणाच्या बिलावरच सूट मिळत नाहीतर त्याच्या जवळपासच्या हॉटेल्सची माहितीही त्यांना घरपोच मिळू शकते. या अॅपचे जनक, सागर पाटील आणि कौस्तुभ राजेपंढेरे हे दोघेही एकमेकांना गेल्या १५ वर्षांपासून ओळखत होते. या दोघांच्या मैत्रीतून आणि प्रयत्नातून हे अॅप विकसित करण्यात आले. हॉटेल व्यवसाय किवा अनुभव कौस्तुभ यांच्यासाठी नवीन नव्हता. त्यांनी टाईनीआउल, ग्रुपआॅन आणि डील्सएण्डयूडाॅटकाॅम सारख्या कंपन्यांच्या सेल्स आणि मार्केटिंग मध्ये सहा वर्षे काम केले आहे.

याउलट सागर एक तांत्रिक विशेषज्ञ म्हणून काम करत होते आणि २००९ मध्ये त्यांनी ‘मास्टरवक्र्स’ नावाने स्वतःची मिडिया एजन्सी सुरु केली ज्याला नंतर २०१३ मध्ये मल्टिया नावाच्या आंतरराष्ट्रीय एजन्सीने खरेदी केले. कौस्तुभ सांगतात की, “ माझ्या कारकीर्दीच्या या क्षेत्रात दीर्घकाळ मी हेच पहिले की हॉटेल व्यवसायात कधीही हॉटेलमध्ये असणाऱ्या पूर्ण क्षमतांचा वापर न केलेलाच बरा, तसे केल्यास नुकसान सोसावे लागते. या व्यवसायातली सर्वात मोठी अडचण सोडवण्यासाठी त्यांना काहीतरी करायचे होते, त्यासाठी ते प्रयत्नशील होते.” त्यांनी केलेल्या संशोधनानुसार जास्तीत जास्त हॉटेल्स प्रत्येक आठवड्याला आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करत केवळ ६० ते ७० टक्के ग्राहकांनाच जेवण वाढतात. याचा अर्थ दररोज ४० ते ५० टक्के जेवण वाया जाते. कारण अनेक हॉटेल्सच्या किचनमध्ये वापरण्यात येणारे जिन्नस आधीच खरेदी केले जाते. त्यामुळे जर जेवणाच्या बिलात पन्नास टक्के सूट दिली तर हे नुकसान टाळले जाऊ शकते.

image


या दोन युवकांनी मग हॉटेल व्यवसायात होणाऱ्या नुकसानाला फायद्यात बदलायचे ठरवले आणि ‘रेस्सी’ हे अॅप बाजारात आणले. सागर सांगतात की, “आमचे प्रमुख उद्दिष्ट होते की, हॉटेल मालकाला एक उत्तम व्यवस्थापन उपलब्ध करून देणे आणि ते पुरवत असलेल्या विशेष सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणे.” ‘रेस्सी’ च्या मदतीने हॉटेल मालकाला त्यांच्या जवळपासच्या परिसरातील ग्राहकांना ते देत असलेली विशेष सूट किवा सेवा पोहोचवणे शक्य होते. या व्यतिरिक्त हॉटेलमालक डिस्काउंट टेम्पलेट्सच्या मदतीने ग्राहकांना ऑफिसच्या दिवसांत किवा सुट्टीच्या दिवशी नाश्त्यामध्ये, दुपारच्या जेवणाच्या वेळी किवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी दिली जाणारी सूट याविषयीची माहितीही देऊ शकतात. त्याचबरोबर हॉटेल मालक इतरही देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतात.

‘रेस्सी’ च्या वापरकर्त्यांना प्रामुख्याने दोन प्रकारच्या सेवेचा लाभ होत आहे. एक म्हणजे ‘ज़ोमेटो एपीआई’ चा प्रयोग करणारे वापरकर्ते एका विशिष्ट क्षेत्रात असलेल्या हॉटेलचा शोध घेऊ शकतात. दुसरे म्हणजे त्यांना अशाच हॉटेल्सची महिती दिली जाते जे १५ ते ६० टक्के सूट देतात.

सध्या ‘रेस्सी’चा पुण्यातील कल्याणी नगर, कोरेगांव पार्क आणि विमान नगर सारख्या परिसरात ४० हॉटेल्स बरोबर करार झाला आहे. आणि या परिसरातील निवासी त्यांना मिळणाऱ्या सुविधेचा लाभ घेत आहे. कौस्तुभ सांगतात की, “या व्यतिरिक्त ग्राहकांना हॉटेलपर्यंत जाण्यासाठी देशातल्या प्रमुख टॅक्सी सेवा उबेर यांच्याबरोबरही एक करार केला आहे. जे ग्राहकांना त्यांना सोयीच्या वाटणाऱ्या हॉटेलपर्यत सेवा उपलब्ध करतील.”

image


जेवणाच्या बिलात सूट देण्याव्यतिरिक्त हे त्यांच्या वापरकर्त्यांना आणखी काही सुविधा पुरवित आहेत. एक हजार रुपयाच्या बिलावर ५० रुपयाचे रेस्सी अंक दिले जातात ज्यामुळे फ्लिपकार्टवर खरेदी करणे, सिनेमा तिकीट खरेदी करणे, फोनचे बिल भरणे या सुविधा मिळतात.

भारतात हॉटेल क्षेत्रात झपाट्याने विस्तार होत आहे. सध्या या क्षेत्रात ४८ हजार कोटी पेक्षा जास्त उलाढाल होत आहे. वेगाने विस्तारणाऱ्या या क्षेत्रात सध्या ‘जोमाटो’ त्यांच्या ग्राहकांना स्वस्तात जवळचे हॉटेल शोधून देण्यास अग्रस्थानी आहे. तर ‘फूडपांडा’ ग्राहकांच्या घरापर्यंत जेवण पुरवण्यास अग्रस्थानी आहे. सागर यांचे म्हणणे आहे की, “या क्षेत्रात आणखी मोठे खेळाडू आपले नशीब आजमावत आहे. मात्र शेवटच्या क्षणी कोणीही आपल्या ग्राहकाला सूट देण्याबाबत जास्त लक्ष केंद्रित करताना दिसत नाही.”

अॅण्ड्राॅइड फोनचे वापरकर्ते प्ले स्टोर मधून हे अॅप मोफत डाऊनलोड करू शकतात आणि यामार्फत मिळणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्या जवळपासच्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकतात. या अॅपची बंगळुरूमध्ये लेसवेंचरच्या सहयोगाने आयोजित केलेल्या लेट्सइग्नाइट स्टार्ट-अप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली, आणि तिथे या अॅपमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवेचं खूप कौतुक करण्यात आलं.

रेस्सीला काही महिनापुर्वीच सुरवातीच्याच फेरीत नामवंत उद्योजक मोहनदास पै यांच्याकडून जवळपास अडीच कोटीची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. ‘रेस्सी’ ची सेवा सध्या पुणे आणि गोव्यापूर्तीच मर्यादित आहे. मात्र पुढील वर्षभरात या सेवेचा अधिक विस्तार करण्याचे नियोजन सुरु आहे. पुण्याव्यतिरिक्त अकरा शहरांमध्ये ही सुविधा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे. 

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

नोकरी सोडून डोंगरी स्वयंपाकात नशीब अजमावतायत अर्चना रतूडी आणि स्वाती दोभाल!

मुंबईत या माता-पूत्र जोडीने ‘बोहरी किचन’च्या माध्यमातून कसा बदलला ‘घर का खाना’चा अर्थ!

‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’..फूड चेन विश्वातलं आत्मविश्वासाचं पाऊल !

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags