संपादने
Marathi

पगारदारांसाठी 'लोनटॅप'ने केले कर्जवितरण सुलभ; वितरीत केले नियोजित २८ कोटी रुपयांचे कर्ज !

Team YS Marathi
21st Jan 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

पगारदारांना कर्ज घेणे आजही फारसे सुलभ झाले नाही, लोनटॅपला ही दरी भरून काढून सहजपणे कर्ज वितरण करण्याचे काम करायचे आहे. आज अनेकानेक कर्ज पर्याय उपलब्ध असण्याच्या काळात देखील, पगारदार लोकांना कर्ज मिळणे सहजशक्य नाही. त्यातील रकाने आणि पात्रता यातील निकष गोंधळात टाकणारे असतात. पगारदार असूनही अनेकांना परंपरागत बँकींग व्यवस्थेचा फटका बसतो, खासकरून ज्यावेळी कर्जाच्या सुरक्षेचा आणि हमी तारणाचा प्रश्न येतो त्यावेळी. बहुतांश कर्जमर्यादा आणि पात्रता निकष दशकानुदशके बदललेले नाहीत.

१७ वर्षांच्या आर्थिक क्षेत्रातील अनुभवानंतर सत्यम कुमार, यांनी विचार केला की लोनटॅप सुरु करण्याची हीच योग्य वेळ आहे. हा ऑनलाइन कर्ज वितरण करणारा पर्याय असेल जो पगारदार लोकांना लवचिकपणे कर्ज वितरण सहजपणे करेल.

तडजोडीची तयारी

त्यांनी त्यांचे मित्र विकासकुमार यांना त्यांच्या ब्राईनव्हिसा टेक्नॉलॉजी मधील १८ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे तांत्रिक सहकार्य करण्यास भाग पाडले, ज्यातून ऑनलाइन मंच आणि संकेतस्थळ तयार करण्यात आले. मागील वर्षी मे महिन्यात त्याचे अनावरण करण्यात आले. लोनटॅपला आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे जे त्याला आवश्यक होते.


Team @ LoanTap

Team @ LoanTap


“आम्ही साध्या एनबीएफसी सॉफ्टवेअरचा शोध घेत होतो, ज्यात सहजपणे वापरता येणारे तंत्रज्ञान (यूआय) असेल, स्थैर्य असेल ज्यातून शिकून लोकांना ते वापरता यावे, आणि गतीने व्यवहार करण्यास ते सक्षम असावे” सत्यम म्हणाले. सत्यम पुढे म्हणाले की, त्यांना असे काही हवे होते जे सुरुवातीलाच वेगाने काम करेल आणि थोडक्यात संपेल. ज्यात नेमकेपणाने डाटा ट्रान्सफरिंग करून पतनियंत्रण करता येईल, त्यातून सहजपणे कर्ज वितरीत करता येईल.

ते म्हणाले की, त्यांना स्क्रॅच करता येणारे एनबीएफसी सॉफ्टवेअर तयार करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. लोनटॅप स्थानिक पातळीवर ऑनलाइनवर चालविले जाणार होते, यामुळे सत्यम म्हणाले की त्यांना दैनंदिन खर्च कमी लागणार होते, तसेच वेगाने आणि अडथळ्याविना काम करता येणार होते.

वितरणाच्या कामावर लक्ष

“आम्ही इएमआय फ्री लोन देण्यास सुरुवात केली, व्यक्तिगत उचल सुविधा दिली, आणि भाडोत्री कर्जसुविधा दिली. ज्यात कोणतीही स्पर्धा नव्हती. ही उत्पादने प्रामुख्याने पगारदार लोकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली.” सत्यम यांनी माहिती दिली. ही सुविधा एक खिडकी करण्यात आली, त्यातून कर्ज संस्था आणि कर्जवितरण देण्याचे व्यवस्थापन करण्यात आले. हा मंच पतवितरणाशी जोडला गेला होता, बँकिंग व्यवहार आणि संकलन प्रणाली देखील त्याच्याशी निगडीत होती.

सत्यम यांनी सांगितले की, इएमआय कर्जात ४० टक्के वजावट इतकाच व्याजाचा भार देण्यात आला होता. त्यामुळे कर्जदारांना हवा तितका वेळ मिळत होता, आणि वेगाने परत करण्याचा पर्याय देखील होता. व्यक्तिगत उचल योजनेत संबंधिताने उचल केलेली रक्कम वापरावी आणि त्यांनी त्याच प्रकारचे पत देयक सुविधेतून ‘पे पर युज मॉडेल’व्दारे परतफेड करावी.

भाडोत्री कर्जसुविधेतून व्याजावर आधारीत कर्ज वितरणाची सुविधा मिळेल आणि पगारातून त्याची परतफेड करण्याची योजना करता येईल. क्रेडिट कार्ड धारकांना मासिक कार्ड मिळेल, ज्यात सामान्य क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त पत देण्याची सुविधा असेल.

नोटबंदीनंतर स्टार्टअपना कर्जवितरणाचा आवाका देखील वाढला आहे, २०१६च्या पहिल्या तिमाहीत, ४६ व्यवहार झाले. त्यात २८५ दशलक्ष डॉलर्सचे वितरण झाले. व्यवसायांना कर्ज वितरण देखील वाढते आहे, त्यात फिनोमेना, कॅपिटल फ्लोट, लेंन्डिंगकार्ट, आणि रुबीक्यू सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. कॅपिटल फ्लोट यांनी ‘ब’ वर्गातील कर्ज वितरण करताना २५ दशलक्ष डॉलर्स मागच्या मे महिन्यापर्यंत वितरीत केले, तर लेंन्डिंगकार्टने देखील ३२ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज वितरण करत ‘ब’ वर्गात स्थान मिळवले.

या खेरीज इंडिया लेन्ड सारख्या मंचा द्वारे, पी टू पी लेंन्डिंग प्लॅटफॉर्मद्वारे फेअरसेंट आणि कुडोज फायनान्स आणि इनव्हेसमेंट काम करतात. येथे अर्ली सॅलरी आणि खडकी सारखे रोजच्या रोज कर्ज देणारे पर्याय आहेत. गरज असेल त्यांना फिनटेक कर्ज हा पहिला पर्याय उपलब्ध झाला आहे.

संख्यात्मक भवितव्य

लोनटॅपच्या चमू मध्ये अमित तिवारीचा समावेश उत्पादने आणि व्यवसाय प्रमुख म्हणून करण्यात आला आहे. ज्यांचा तारण आणि मालमत्ता क्षेत्रात १८वर्षाचा अनुभव आहे, त्यासोबतच वितरण आणि कर्जतारणाबाबतही. अर्शद अली उत्पादन प्रमुख आहेत, ज्यांना १२ वर्षांचा कर्ज वसुली आणि वितरण क्षेत्राचा अनुभव आहे. अमित तानीया सुरचीत कर्जवितरणाचे प्रमुख आहेत, ज्याना अकरा वर्षांचा संपत्ती व्यवस्थापन आणि कर्ज वितरण यांचा अनुभव आहे. रिचीका चंद्रा या पत प्रमुख आहेत ज्यांना किरकोळ कर्ज वसुली क्षेत्रातील नऊ वर्षांचा अनुभव आहे.

या वर्षी मार्च महिन्यापर्यंत हा चमू २८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करेल असा त्यांचा दावा आहे आणि त्यातील चार कोटीचे वितरण त्यांनी केले आहे. सरासरी कर्जाचा आकार सध्या २.४८लाख रुपये आहे आणि त्याचे वितरण बेंगळुरू, दिल्ली, पुणे, आणि मुंबईत करण्यात आले आहे.

व्दितीय श्रेणीतील शहरातून या चमूला आपल्या व्यवसायाची वृध्दी करायची आहे आणि लवकर एमएसएमई लोन सुविधा सुरु करायची आहे. कॉर्पोरेट आणि सेवा क्षेत्रातील काही भागीदार संस्थाना सोबत घेण्याचा प्रयत्न देखील प्रगतीपथावर आहे.

लेखिका : सिंधु कश्यप

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags