संपादने
Marathi

माझ्या निर्मितीबाबत युजर्सना पॉझिटिव्ह बोलताना ऐकलं की मला खूप हायस वाटतं : रोहन खारा, संस्थापक,जब्बरकास्ट

Team YS Marathi
12th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

डिसेंबर २०१०पर्यंत रोहन खारा यांनी एकही पॉडकास्ट (Podcast) ऐकलं नव्हतं आणि पॉडकास्ट क्षेत्राबद्दलही त्यांना काही माहित नव्हतं. पण आज भारतात पॉडकास्ट सुरु करणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये त्यांचाही समावेश होतो. पॉडकास्ट म्हणजे एखादा मजकूर किंवा गाणं ध्वनीच्या माध्यमातून प्रसारित करणे. रोहन यांच्या कंपनीत खूप दर्जेदार कार्यक्रमांचं निर्माण आणि प्रसारण केलं जातं.


image


या सगळ्याची सुरुवात कशी झाली हे रोहन आठवून सांगतात, "डिसेंबर २०१० मध्ये माझा मित्र गुस्ताव बिटनिगर यानं मला पॉडकास्ट क्षेत्रातल्या अडचणी सांगणारा एक सविस्तर इ-मेल केला. मी माझा आय फोन घेतला, पॉडकास्ट अॅप उघडलं आणि सहा आठवडे मी वेगवेगळे पॉडकास्ट ऐकू लागलो. त्यांच्या विषयी खोदून माहिती घेऊ लागलो. मला जाणवलं गुस्तावच्या मेलमध्ये लिहिलेला शब्द न शब्द खरा आहे. विशेषतः 'नवीन कार्यक्रम शोधायला आणि ऐकायला सुलभ झालं पाहिजे."

ते म्हणतात, "पॉडकास्ट चा वापर करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय. ऑडिओ प्रोग्रामिंगमध्ये जाहिरातींचा व्यवसाय वार्षिक १८ बिलीयनचा आहे. जुन्या रेडीओवर कार्यक्रम ऐकण्यापेक्षा, मोबाईलद्वारे कार्यक्रम ऐकून आनंद घेण्याकडे लोकांचा कल आता वाढतोय. जब्बरकास्ट ने याच संधीचा फायदा घेतला. आम्ही दर्जेदार कार्यक्रम सादर करायला निर्मात्यांना पाचारण करून श्रोत्यांचा पॉडकास्ट ऐकण्याचा आनंद द्विगुणीत केला.


image


जब्बरकास्ट

कार्यक्रम शेअर करण्यामुळे पॉडकास्ट प्लेयर इतरांपेक्षा वेगळं ठरतं. रोहन म्हणतात, "पॉडकास्ट मध्ये मुलभूत आनंद मिळाला पाहिजे आणि जब्बरकास्ट ऐकण्याचा मनमुराद आस्वाद देतं. एखाद्याला कार्यक्रम शोधणे आणि शेअर करण्याचे 'निरामय पॉडकास्ट क्षण' देण्याचा आमचा हेतू आहे. आमचं गुपित म्हणजे 'रसिकांना विलक्षण अनुभूती'. दररोज तुमच्या आवडीप्रमाणे बनवलेल्या ठळक पॉडकास्ट गोष्टी आणि तुमचे आवडते पॉडकास्ट कार्यक्रम तुमच्या मित्रासोबत तुम्हांला चुटकीसरशी शेअर करता येणं."

आकडेवारीने ते आपल्या बोलण्याला पुष्टी देतात. "सध्या दर महिन्याला ४६ दशलक्ष अमेरिकन नागरिक पॉडकास्ट ऐकतात आणि यात वर्षाला १५-२५% नी वाढ होतेय. नियमित पॉडकास्ट ऐकणारा श्रोता दिवसभरात इतर कोणत्याही ध्वनी माध्यमांपेक्षा किमान २ तास पॉडकास्ट ऐकतो. २०१४ मध्येच श्रोत्यांनी ७.५ अब्ज तास पॉडकास्ट ऐकलं. हा आकडा २०१६ मध्ये १० अब्ज तासांवर पोहचण्याचा अंदाज आहे.


image


एक दशकापूर्वी इंटरनेट जिथं होत त्याजागी आज पॉडकास्ट आहे. अत्युच्च दर्जा, वैभवशाली आशय यामुळे हे वापरणाऱ्यांना अलोट समाधान मिळतं. सध्याच आप हे शेअर आणि प्रसार करायला फार थोडा वाव देतं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असलात तरी तुम्ही इथे अगदी सहज एपिसोड अपलोड करू शकता. तुमच्या मित्रासोबत समान आवडीचं शेअर आणि त्यावर चर्चा करायला तुम्हांला क्वचितच अडचण येऊ शकते. फेसबुक आणि फ्लिपबोर्ड यांचा खूप प्रसार झाल्यामुळे त्यावर मजकूर टाकणे आणि शेअर करणे सुलभ आहे. रोहन यांना जब्बरकास्टला फ्लिपबोर्डच्या यादीत आणायचं आहे.

रोहन यांच्या मते शेअर केल्यामुळे लागलेले शोध आणि वापरण्यात असणारी सहजता पॉडकास्ट ला पहिल्या क्रमांकावर पोहचवतात.

वेगळेपणा कशामुळे ?

रोहन स्पष्ट करतात, " प्लेयर स्क्रीनवरील चांगल्या दर्जाच्या चित्रांचा/व्हिजुअल्सचा स्लाईड शो, एका क्लिकनिशी कार्यक्रमांमध्ये चर्चा करण्यात आलेले विषय आणि ट्विटर मोड्युलशी जोडला जातो. यामुळे श्रोत्यांना अॅ पवरच त्यांच्या आवडत्या कार्यक्रमासंबंधीच्या चर्चांमध्ये सहभागी होता येतं. आमच्या सुरुवातीच्या श्रोत्यांनी याचं खूप स्वागत केलं." पॉडकास्ट साईड हस्टल शो चे होस्ट निक लोपर म्हणतात, "जब्बरकास्ट ने स्टीचरअॅपला (sticherapp) नाहीसं केलं."

उद्योगामी होण्याकरता दूरची वाट

मूळच्या कोलकत्त्याच्या रोहन यांनी बेंगळूरूच्या आरव्हीसीई नंतर स्टंडफोर्ड विद्यापीठात आपलं शिक्षण पूर्ण केलं. सिएटलमध्ये मायक्रोसॉफ्ट आणि मुंबईला क्विकरमध्ये चौकटीत काम करताना स्वतःचं काहीतरी सुरु करावं असं त्यांना वाटू लागलं. भारतात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे लोक पॉडकास्ट वर पूर्णवेळ काम करतात. तरीही इथलं स्टार्टअपचं क्षेत्र त्यांना खुणावत होतं. भारतातले बरेचशे लोकप्रिय पॉडकास्ट हे साईड प्रोजेक्ट म्हणून यशस्वी झालेत. रोहन म्हणतात, "भारतात पॉडकास्टिंगची आता कुठे सुरुवात होतेय. आपल्याला 'इंडिया स्टार्टअप' सारखे उत्कृष्ट निर्मिती असलेले आणखी कार्यक्रम आणि ऑडीओमटीकसारखे चांगले पॉडकास्ट नेटवर्क्स हवेत."

या अनोख्या दुनियेचा भाग होण्यासाठी बेंगळूरूला परत यायचा धाडसी निर्णय त्यांनी २०१४ मध्ये घेतला. "२०१० मध्ये भारतातलं स्टार्ट अपचं क्षितीज आजच्या सारखं विस्तारलं नव्हतं. बरेचसे नवीन किंवा २-३ वर्षांचा अनुभव असणारे लोक सध्या ९ ते ५ च्या साच्यात न अडकता स्वतःचा उद्योग सुरु करताना दिसतात. आपल्या वैयक्तिक बाबींमुळे जे ९ ते ५ ला टाळू शकत नाहीत, ते संध्याकाळी ७ ते रात्री २ या वेळेचा सदुपयोग करत आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट घडत आहे. कारण यामुळे लोक धोका पत्करत आहेत. लहान वयात सुरु केल्यामुळे अनुभव कमी असला तरी, चांगली पायाभरणी होऊन उद्योग सक्षमपणे लवकर उभा राहतो. स्वाभाविकपणे सक्षम इंजिनिअर्सना कामावर घेताना मोठी स्पर्धा निर्माण झालीय. महत्वाचं म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसंच उद्योजकांना भविष्यात अधिक नाविन्यपूर्ण शोध लावण्याकरिता तसेच गुणवंत कर्मचारी निवडण्याकरता भाग पडत आहे. ही उज्ज्वल भवितव्याची वाटचाल आहे."

बांधणी

या सगळ्यात रोहनचे भागीदार आहेत, गुस्ताव बिटडिंगर आणि विजय राघवन. विद्यापीठात असताना या तिघांची मैत्री झाली. या स्पर्धात्मक युगात ग्राहकांना अधिकाधिक तृप्ती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्यावर ते तिघंही ठाम असल्याचं त्यांना लक्षात आलं. आणि मग ते त्या दृष्टीने काम करू लागले. जब्बरकास्टची टीम मुद्दामहून मार्केटिंगपासून लांब राहिली. त्यांनी युझर्सची बीटा कम्युनिटी उभारण्यावर भर दिला. आणि हा अगदी महत्वाचा निर्णय ठरला. रोहन सांगतात, सन फ्रान्सिस्कोच्या 'एंजल इनवेस्टर'सोबत त्यांची सध्या बोलणी सुरु आहेत आणि लवकरच त्यांतून चांगलं काहीतरी घडणार आहे.

मधुचंद्र संपल्यावर

रोहनच्या मते, "एकदा का आपला उद्योग प्रत्यक्षात सुरु झाला की, सुरूवातीचं छान छान सरून खरी आव्हानं काय आहेत ते कळू लागतं. आयपीओचं स्वप्नातलं जग किंवा मोठं होण्याची आकांक्षाच आपल्याला रोजच्या कामात मार्ग दाखवतं. नवख्या उद्योजकाच्या मनात निगेटिव्ह विचार सतत घोळत असतात. काहीही करतांना आपण हे बरोबर करतोय ना असं सारखं वाटत राहत. मला वाटतं, या विचारांशी संघर्ष करू नका. याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जा. हे कठीण आहे आणि यातून बाहेर पडायला वेळ लागेल पण तुमचं व्यक्तिमत्त्व यातून खंबीर बनेल."

जेव्हा आपण चांगल्या बाजूकडे पाहतो तेव्हा, आपल्याला वाटतं तेवढी परिस्थिती वाईट नसते. ते म्हणतात, "माझ्याकरता स्टार्टअपमध्ये दोन गोष्टी खूप समाधान देणाऱ्या आहेत, हुशार लोकांसोबत काम करणे आणि त्यांच्यासोबतची नात्यातली घट्ट वीण. आम्ही लोकांच्या अडचणी सोडवून त्यांना आवडेल असं प्रोडक्ट बनवण्यात यशस्वी ठरलो. आपण जे काही बनवलंय ते लोकांच्या पसंतीस उतरतंय आणि लोक त्याबद्दल चांगलं बोलतायत हे ऐकून खूप हायस वाटतं."

भविष्य

रोहन म्हणतात, "दर्जेदार साहित्य ऐकण्यामध्ये परिवर्तन करण्याची मोठी ताकद असल्याचं आम्हाला वाटतं. ध्वनीमध्ये एक मोठी विलक्षण अनुभूती आहे जी तुम्हांला व्हिडीओ /चित्र पाहून किंवा इतर कुठल्याही माध्यमांतून मिळत नाही. हेच औत्सुक्य आम्हांला पॉडकास्ट मुख्य प्रवाहात आणायला भाग पडतंय." यावरूनच जब्बरकास्ट च्या भविष्याबद्दलचा त्यांचा हुरूप दिसून येतो.

ते स्पष्ट करतात, "तुम्ही तुमचं आवडतं रेडिओ स्टेशन सहजपणे लावता, तीच सहजता आम्हांला चांगलं पॉडकास्ट शोधणं आणि लावणं यात आणायची आहे. कल्पना करा की, तुम्ही कारने चालला आहात आणि एकच बटण दाबलं किंवा ट्रेन-बसमधून कामाला जाताना फोनवर केवळ एका क्लिकने जगातल्या उत्कृष्ट गोष्टींचं भांडार तुमच्या पुढे उघडलं तर? हे नक्कीच चांगल्या विचारांना चालना देणारं असेल किंवा निखळ मजेशीर असेल. जब्बरकास्टच्या माध्यमातून असंख्य लोकांनी हा अनुभव मनमुरादपणे लुटावा असं आम्हांला वाटतं."

सल्ला

'आवडतयंना' या कल्पनेत रमणाऱ्यांना हे नवे उद्योजक एक कडू सल्ला देतात. "एखादी कल्पना 'कूल' आहे, असं म्हणण्याचे दिवस आता गेलेत. किंवा उत्पादन पुढे आणताना तकलादू टाग लावून तुम्ही उद्योजक बनणार नाहीत की निधी उभारता येणार नाही. हे २०१५ आहे. उठा आणि तुमच्या कॉफीचा गंध ओळखा! तुमचं उत्पादन वापरणाऱ्यांना काय हवं? हे तुम्हांला पहिल्या दिवसापासून माहिती हवं. जर तुमच्याकडे त्यांच्याकडे पोहचण्याचा ठाम मार्ग नसेल किंवा युझर्स तुमच्याकडे आकर्षित होत नसतील तर तुम्हांला ठोस विचार करण्याची गरज आहे. बरेचसे नवीन उद्योजक 'कूल आयडिया' च्या धुंदीत असतात. ज्यामुळे प्रश्न सोडवला जात नाही. आणि मग धुंदीचा परिणाम व्हायचा तोच होतो, घोर निराशा. तुमच्या स्टार्ट अपच्या सुरुवातीच्या काळात लोकांनी तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसवर प्रेम केलं पाहिजे केवळ 'लाईक ' नाही. हे लोक तुमच्या परिवारातले किंवा मित्रमैत्रिणी नकोत. कारण ते तुम्हांला तुमच्या उत्पादनाबद्दल खरी प्रतिक्रिया देतीलच असं नाही. ज्यामुळे तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे येतील."

लेखक : राखी चक्रवर्ती

अनुवाद : साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags