संपादने
Marathi

आपण महिला शेतक-यांबाबत का बोलत नाही ?

Team YS Marathi
8th Aug 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

शेतकरी महिला नेहमीच अपार मेहनत करतात आणि त्या अनेक दुर्धर आजारांना समो-या जातात. त्यांचा जमिनीवर कोणताच हक्क असत नाही, किंवा निर्णय प्रक्रीयेत त्यांचा सहभाग असत नाही, या लैंगिक भेदभावाला धोरणात्मक पातळीवर बदलण्यात आले पाहिजे.

पार्वती, वय ४०, या पुणे परिसरातील शेतमजूर आहेत. त्यांच्या कुटूंबातील एकमेव कमवित्या व्यक्ती. त्या गेल्या तीन दिवसांपासून कामावर जात नाहीत कारण त्यांच्या पाठीतून तीव्र वेदना होत आहेत. त्यांनी मला काही गोळ्या किंवा मलम आहेत का म्हणून विचारणा केली जेणेकरून त्यांना पाठदुखीपासून मुक्ती मिऴेल.


Women at work on a farm. (Source: India Water Portal)

Women at work on a farm. (Source: India Water Portal)


शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचे काम

शेतीमध्ये देशात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीण पुरूष कामासाठी मोठ्या शहरात जात आहेत. मागे महिला मुले आणि ज्येष्ठ नागरिक राहतात जे शेती आणि जमीन यांची काळजी घेतात. त्यामुळे महिलांच्यावर अतिरिक्त भार येतो आणि त्यांना घरासोबत बाहेरच्या कामाची जबाबदारी पडते. सर्वेक्षणा नुसार, ७५ टक्के महिला, ज्यांची तुलना ५९ टक्के पुरूषांशी केली जाते. या भारतात आणि ब-याच भागात शेती क्षेत्रात महिला काम करतात, शेतात काम करून त्या उत्पन्न वाढवितात.

“आम्ही मालकाच्या बसने येतो. त्यात आम्हाला पोहोचायला २.५ तास लागतात. आम्हाला सारे काम घरीच पूर्ण करावे लागते, आणि येथे सकाळी नऊला यावे लागते आणि संध्याकाळी पाचपर्यंत काम करावे लागते. आम्ही घरी जाईपर्यंत अंधार होतो. हे खडतर काम आहे पण तक्रार कुठे करणार? आम्हाला रोज १५० रूपये मिळतात.” ४३ वर्षीय संगीता, अन्य शेतमजूर ज्या पार्वती यांच्यासोबत शेतीवर कामाला जातात त्या सांगत होत्या.

पूर्वाश्रमीच्या शेतकरी असलेल्या ब-याच महिला आता शेतमजूरी करत आहेत. कारण भारतीय शेतीवर येणारा ताण ज्यातून कुटूंबाचा निर्वाह करता येणे कठीण झाले आहे. जेणे करून जमीनीवर गुजराण होत नाही. आलेखावरून शेतमजूरीचा आढावा घेतला असता, एखादा माणूस जो दुस-याच्या जमीनीवर शेती काम करतो आणि मजूरी मिळवतो, त्याला किंवा तिला शेतीच्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा करार करण्याचा अधिकार नसतो ज्यात तो काम करतो. भारतातील ६३ टक्के स्त्रिया या शेतमजूरी करतात, ज्या दुस-यांच्या शेतीवर अवलंबून असतात. ज्या स्त्रिया स्वत:च्या शेतीत काम करतात त्यांच्या बाबतीत सांगायचे तर त्यांच्या घरच्या पुरूषाच्या मालकीच्या शेतीत त्या काम करतात.

अतिश्रम अणि अवहेलना


Source: Swamikannan and Jeylakshmi (2015), Ministry of Labour and Employment (2012-2013)

Source: Swamikannan and Jeylakshmi (2015), Ministry of Labour and Employment (2012-2013)


त्या स्वत:च्या शेतीत काम करत असोत किंवा इतरांच्या शेतीत मजूरी करत असोत, त्यांना अतिश्रम करावे लागतात. गुणाबाई, शेतकरी महिला ज्या पुणे शहराबाहेर कुटूंबासोबत दोन एकराच्या शेतात काम करतात, त्या म्हणाल्या की, “ मला पर्यायच नाही त्यामुळे शेतीत काम करावेच लागते. मी घरचा स्वयंपाक, पाणी, सरपण सारे करून येते. त्यासाठी देखील मलाच दूर भटकावे लागते. घराची सफाई नव-याची, सासू-सास-यांची काळजी घेणे, मुलांना शाळेत पाठविणे आणि नंतर ९ वाजेपर्यंत शेतात येणे. माझे पती मला मदत करत नाहीत, ते वडापावच्या गाडीवर सायंकाळी कामाला जातात, आणि इतरवेळी घरी बसून असतात. हंगामात आम्ही आमच्या शेतावर मजूर बोलावतो, नाहीतर मलाच शेतावर काम करून भाज्या विकाव्या लागतात. हा व्यवसाय कुणाच्या आधाराशिवाय करावा लागतो. कुणाला वेळेची किंमत नसते की माझ्या मेहनतीची” त्या म्हणाल्या.

ग्रामीण भागात महिलांच्या श्रमाला मोल नाहीच. पेरणी करण्यापासून शेतीच्या महत्वाच्या कामात त्यांचा हातभार असतो. याशिवाय पूरकउद्योग जसे की कुकूटपालन किंवा दूध व्यवसाय असेल तरी महिलाच तेथे राबत असतात. खालील आलेख हेच दाखवतो की, पुरूषांच्या तुलनेत महिलांच या कामात जास्त सहभागी असतात.

महिला १४-१६ तास कामे करतात, आणि त्यानंतरही त्यांना घरी कामे करावी लागतात. घरच्या इतकीच मेहनत त्या शेतीत करतात. इतके करूनही त्यांना मिळणा-या कामाचा मोबदला मात्र तुटपुंजा असतो. मात्र पुरूषांचे यातील योगदान कमी असूनही त्यांना जास्तीचा मोबदला मिळतो.

त्यांच्या आरोग्याचे प्रश्न

स्त्रिया जी कामे करतात त्यात बहुतांश वेळ त्यांना वाकून काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या पायात, मानेत, हात किंवा पाठीत दुखते. शेतीची अनेक कामे जसे की लावणी, स्वच्छता, खुरपणी यामध्ये महिलांसाठी काही काळजी घेण्याची व्यवस्था नसते, तरी त्या पुरूषांच्या बरोबरीने जास्त काम करत असतात. त्यांच्यात जखमी होण्याचे प्रसंग जास्त असतात, त्यांच्यात अतिश्रमाने गर्भपाताचे प्रमाण जास्त असते. बालमृत्य़ू किंवा गर्भात मुले मृत्यू पावण्याचे प्रमाणही मोठे आहे.

“ माझे अनेकदा गर्भपात झाले मात्र पुरेशी विश्रांती न घेताच मला कामावर यावे लागले. आता मला खूप पाठदुखी आहे, आणि सतत वाकून काम करावे लागते, त्यामुळे ती वाढत जाते.” सुधा यांनी सांगितले, ज्या शेतमजूर आहेत. तानीबाई म्हणाल्या की, “ गवत कापताना आम्हाला काळजी घ्यावी लागते, आम्हाला कॉंग्रेस गवतामुळे खाज येते, कापते, किंवा किटक चावतात त्यामुळे जखमा होतात. आमच्या पैकी काही तापाने आजारी असतात, किंवा डोकेदुखी, अंगदुखी किंवा डोळ्याची जळजळ यांचा त्यांना त्रास होतो.”


image


डॉ भालेराव ज्या पुण्याच्या ग्रामीण भागात काम करतात, ते म्हणतात की अपु-या अन्नामुळे आम्लपित्त आणि तीव्र डोकेदुखी, उन्हात काम केल्याने महिलांच्या आरोग्याच्या अनेक समस्या असतात. “ गंभीर गुप्त आजार आणि शरीरातून सफेद द्रव जाणे, खते आणि किटकनाशकांच्या संपर्कात आल्यानंतर होणा-या आजारांचे प्रमाण, मूत्राशयाचे आजार, सातत्याने झालेली बाळंतपण आणि अतिश्रम याने होणारे आजार हे रोग सर्वसामान्य पणे दिसून येतात. मोठे बोजे वाहून नेण्याच्या काम करणारांना स्पॉन्डीलायसीस सारख्या व्याधी देखील होत असतात. तणावा मुळे होणारे मनोविकार आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्याने होणारी कुचंबणा यामुळे देखील त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.” असे त्या म्हणाल्या.

पुण्यातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ जोशी म्हणाल्या की, “ गरीबी आणि सातत्याने बळजोरी होत असल्याने मांसपेशीच्या असमतोलाचा विकारही या महिलांना होतो. “अतिश्रम, अपुरे अन्न, विश्रांतीचा आभाव, सातत्याने बाळंतपण, ऍनिमीया कँल्शीयमची कमतरता यामुळे हाडाचे आजार आणि विकार महिलांना होतात. मोठ्या प्रमाणात स्वत:कडे दुर्लक्ष केल्यानेही हे आजार बळावतात आणि गंभीर रूप धारण करतात. सातत्याने पाण्यात काम केल्याने देखील बरेच आजार उदभवतात”. त्या म्हणाल्या.

सामाजिक सन्मानाचा आभाव

जरी तीन चतुर्थांश महिला भारतात शेतीत काम करत असल्या तरी, आणि त्यातील बहुतांश त्यांचे विनामूल्य योगदान देत असल्या तरीही त्यांच्या कामाची अधिकृत दखल कुठेच घेतली जात नाही. शेती आणि शेतीच्या प्रश्नात त्यांच्या समस्यांची पुसटशी देखील चर्चा केली जात नाही.

७६ टक्के महिला शेतीच्या व्यवसायाशी संबंधित असल्या तरी, केवळ १२.८ टक्के महिलांच्या नावे शेती आहे, जे क्षेत्र एकूण शेतजमिनीच्या १०.३४ टक्के इतके आहे. गरिबी, निरक्षरता, निर्णय घेण्याची क्षमता नसणे, मर्यादीत जमीन, या किंवा अशा कारणांमुळे महिला त्यांच्या हक्कापासून वंचित राहील्या आहेत. त्यामुळे त्या आधुनिक तंत्र आणि बाजार विपणन व्यवस्था यापासूनही दूर राहतात आणि शेतीच्या व्यवसायात त्यांचा निभाव लागत नाही. जरी धोरणे आणि कायदेशीर बंधने असली तरी, लैंगिक असमानता दूर करण्यात त्या उपाययोजना कमी पडल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्यात अडचणी येत असतात.

सोप्पेकॉम च्या सीमा कुलकर्णी, ज्या नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन क्षेत्रात ग्रामीण भागात काम करतात त्या म्हणतात की, “ विदर्भात जेथे शेतकरी आत्महत्या सर्वाधिक होतात, जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या पत्नींची त्यांच्या मागे समाजाने आणि कुटूंबाने दखल न घेतल्याने वाईट स्थिती होते. त्यांना जमिनीवर हक्क नसतो आणि शेतीच्या उत्पन्नावर देखील, त्यांना उत्पन्नाचे साधनही नसते. कर्जाची जबाबदारी आणि मुलाबाळांचा खर्च भागविणे त्यांच्या आवाक्याबाहेर असते. सरकारच्या योजना नेहमीच त्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत, लैंगिक असमानता धोरणात देखील दिसून येते. त्यामुळे अशा महिलांना तातडीने कायदेशीर मदत देण्याची गरज असते.”

तज्ञांचे मत आहे की महिलांना जमीनधारणेचा हक्क हे समान हक्क देण्याचे महत्वाचे पाऊल ठरेल, त्यामुळे सामाजिक विषमता कमी होण्यास मदत मिळेल. संघटनात्मक बांधणी करताना त्यात महिलांचा सहभाग अनिवार्य करण्यासारख्या अटी घातल्यास त्यातून त्यांना न्याय देण्यास मदत होणार आहे असे पत्रकार पी साईनाथ यांनी सुचविले आहे. जे ग्रामीण भारताच्या समस्यांचे तज्ञ समजले जातात. त्यांनी सरकारी कार्यक्रम ‘कुटूंबश्री’ जो केरळात १९९८ मध्ये लागू करण्यात आला आहे त्याचे उदाहरण देताना म्हटले आहे की, चार लाख शेतकरी महिलांना त्यात ४७ हजार गटात संघश्री या नावाने योजना करून सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जे पडीक जमिनीवर शेती करत आहेत, अशाप्रकारे महिलांना जास्तीत जास्त त्यात सामावून घेतले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.

अशा सा-या अडसरांनंतर महिलांनी त्यांचे भावनिक नाते जमिन आणि कामाशी जोडले आहे, गोदाबाई, ज्यांचा एकुलता मुलगा शहरात कामासाठी गेला आहे, त्या म्हणाल्या की, “ मला माहिती नाही माझा मुलगा शेती करेल की नाही, पण मी मरेपर्यंत शेतीच करत राहीन. ही सर्वात महत्वाची संपत्ती आहे ज्यावर संकटाच्या प्रसंगी विसंबून राहता येते.”

सुनिल जोशी म्हणतात की, “ जर आम्हाला भारतात शेतीतून देश जगवायचा असेल, आम्ही त्यात महिलांचे असणारे योगदान समजून घेवून त्यांचा आदर केला पाहीजे. त्यांना सुधारणा आणि प्रगती करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांची कौशल्य विकसित करून, सामुहिक प्रयत्नातून त्यांना प्रशिक्षण आणि क्षमता विकास यासाठी पुढाकार घेवून त्याचा आत्मविश्वास वाढविला पाहीजे.

Disclaimer: This article, authored by Aarti Kelkar-Khambete, was first published in India Water Portal

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags