संपादने
Marathi

पुण्याच्या राममणी अय्यंगार स्मृती योग संस्थेने पटकाविला पहिला योग पुरस्कार!

Team YS Marathi
23rd Jun 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठीचा पहिला वहिला पंतप्रधानांचा पुरस्कार पुण्याच्या राममणी अय्यंगार स्मृती योग संस्थेने पटकाविला आहे. याबाबतच्या वृत्ता नुसार आयुश मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, याबाबतचा निर्णय यासाठीच्या परिक्षण आणि निवड समितीने घेतला आहे, त्यानुसार २०१६च्या पुरस्कारासाठी ही निवड असेल.


Credit: Shutterstock

Credit: Shutterstock


या वृत्तानुसार या निवेदनात म्हटले आहे की, “ ही निवड ८५ नामांकनातून आणि समितीकडे असलेल्या १५ शिफारशीतून करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, “ दोन समित्या प्राथमिक निवडीसाठी स्थापन करण्यात आल्या होत्या, जेणे करुन पारदर्शक पध्दतीने निवड व्हावी, खुल्या जाहिराती देवूण नामांकने मागविण्यात आली होती.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरस्कारांची घोषणा मागील वर्षी २१ जून रोजी योग दिवसांच्या निमित्ताने केली होती. छत्तिसगढ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्तच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली होती. यासाठीची मार्गदर्शक तत्वे आयुश मंत्रालयाने निश्चित केली होती. या बाबतच्या वृत्ता नुसार, निवेदनात म्हटले आहे की, पंचांनी या वर्षीचा पुरस्कार राम मणी अय्यंगार स्मृती योग संस्थेला देण्याचा निर्णय या बाबतची सर्व ती आवश्यक माहिती घेतल्यानंतर घेण्यात आला.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, समितीनं संस्थेची निवड केली आहे कारण त्यांनी गेली चार दशके योगाच्या प्रचारासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनिय आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्था योगाच्या प्रचाराचे काम करत आहे, त्यासाठी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत ज्यांचे भाषांतर अनेक भाषांत झाले आहे. हजारो अय्यंगार योगा शिक्षक योगाच्या संवर्धन आणि प्रचारात जगभर कार्यरत आहेत.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags