संपादने
Marathi

मुद्रण व्यवसायात ठसा उमटवणाऱ्या निधी अग्रवाल

Ranjita Parab
16th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

ʻ२०१२ साली अमेरिकेतील सर्वात मोठे मुद्रण प्रदर्शन ʻग्राफ एक्स्पोʼमध्ये पहिल्यांदाच औपचारिक भागीदार झाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या बुथवर उभी होते तेव्हा एक युवक तिथे आला आणि त्याने मला विचारले की, या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कोण आहेत? मी उत्साहात उत्तर दिले की, मी आहे. माझ्या उत्तरानंतर त्याने काही क्षण मला निरखुन पाहिले आणि एकही शब्द न उच्चारता तिथुन निघुन गेला. त्याच्या या वागण्यानंतर मला जाणीव झाली की, मी एका अशा व्यवसायात आहे, जेथे कोणालाही माझे म्हणजेच एका महिलेचे अस्तित्व अपेक्षित नाही.ʼ हा अनुभव आहे प्रिंटर्ससाठी सॉफ्टवेयर तयार करणारी कंपनी ʻDesign ʻNʼ Buyʼच्या (डिझाइन ʻएनʼ बाय) मुख्य कार्य़कारी अधिकारी निधी अग्रवाल यांची. मुद्रण म्हणजेच प्रिंटिंगच्या जगात संपूर्णपणे पुरुषांचे वर्चस्व आहे. या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी निधी या एकमेव प्रेरणास्त्रोत आहेत. ३३ वर्षीय उद्योजिका सांगतात की, ʻमी नेहमीच माझी एक वेगळी ओळख बनविण्याचा प्रयत्न केला आहे.ʼ

image


मध्यप्रदेशातील एका लहानशा गावातील मंदसौरमध्ये निधी यांचा जन्म झाला. पाच बहिणींमध्ये निधी सर्वात लहान असून, त्यांच्यापेक्षा एक लहान भाऊ आहे. त्यांचे वडिल व्यापारी होते. ज्यांनी आपल्या सहाही मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्यासाठी आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी मेहनत करण्यास प्रोत्साहित केले. निधी यांनी हिंदी माध्यमातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा निर्णय घेतला. निधी सांगतात की, ʻएकत्र कुटुंबात बालपण व्यतित करणे वास्तवात फार मजेशीर होते. माझ्या वडिलांना ११ भावंडे होती. त्यामुळे चुलत भावंडांसोबतच आम्ही लहानाचे मोठे झालो.ʼ निधी यांनी जेव्हा दहावीची परिक्षा दिली, तेव्हा त्यांच्या मोठ्या बहिणीचा विवाह झाला. अशा परिस्थितीत जेव्हा निधी यांनी मंदसौर येथून बाहेर जाऊन शिक्षण घेण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले, तेव्हा त्यांनी मोठ्या बहिणीच्या विवाहात अधिक खर्च झाल्याने निधी यांना पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. त्यावेळेस निधी यांनी जवळच असलेल्या एका राष्ट्रीयकृत बॅंकेच्या शाखेत कर्ज घेण्यासाठी संपर्क साधला. शालेय दिवसात निधी एक प्रतिभावान विद्यार्थिनी होत्या. निधी यांचे कर्जदेखील तत्काळ मंजूर झाले. अशाप्रकारे निधी यांचा मंदसौर शहराच्या बाहेरचा प्रवास सुरू झाला. त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अकराव्या इयत्तेत प्रवेश घेतला. इंटर केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या इंदौरला निघून गेल्या.

निधी प्रांजळपणे कबूली देतात की, ʻया स्पर्धेत टिकून राहणे पहिल्यांदा माझ्याकरिता फार आव्हानात्मक होते. कारण इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मला जुळवून घ्यावे लागले. ते फार कठीण होते. मात्र मी देखील चांगले करण्याचे ठरविले होते. पहिल्या वर्षापासून सर्वच विषयात अव्वल राहण्यात मी यशस्वी झाले.ʼ त्यानंतर निधी यांनी संगणक विज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर जेव्हा त्यांच्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली. तेव्हा त्यांनी एका कंपनीत नोकरी करण्याचे ठरविले. कोडिंग आणि डिझायनिंगचे काम त्या करत. त्यानंतर तांत्रिक चर्चांमध्येदेखील त्या सहभागी होऊ लागल्या. कंपनीच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे त्या जवळून अध्ययन करू लागल्या. त्यांच्या पूर्वी त्या कंपनीत १५० लोक कार्यरत होते. २००६ साली त्या लोकांना अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या तीन महिन्याच्या कार्यशाळेसाठी पाठविण्यात आले. निधी सांगतात की, ʻनंबर पोर्टेबिलिटी संबंधित एका स्वयंचलित उपकरणाचा शुभारंभ कंपनी करत होती आणि या योजनेची मी प्रभारी होते. ही माझ्यासारख्या लहान शहरातून येणाऱ्या मुलीसाठी शिकण्याकरिता आणि अनुभवासाठी एक सर्वोत्तम संधी होती. यामुळे माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून गेला.ʼ

image


२००७ साली अमेरिकेतून परतल्यानंतर निधी यांचा विवाह अभिषेक यांच्यासोबत झाला. लग्नानंतर निधी त्यांच्या पतीसह अहमदाबाद येथे स्थायिक झाल्या. निधी यांचे पती अभिषेक त्यांच्या दोन मित्रांसह एक माहिती तंत्रज्ञान कंपनी राईट वे सॉल्यूशन्स इंडिया प्रा. लि. (आरडब्ल्यूएस)चे संचालन करत होते. वेळेनुसार त्यांनीदेखील या कंपनीच्या कामात हातभार लावण्यास सुरुवात केली. कालांतराने त्या मनुष्यबळ, व्यवस्थापन, विक्री आणि विपणनापासून विकास, वितरण या कामातदेखील निपुण झाल्या. या दरम्यान त्यांना आपल्यातील उद्योजिकेची ओळख होण्यास मदत मिळाली आणि उद्योगात आपले नशीब आजमवण्यासाठी त्या प्रेरीत झाल्या. दोन्हीकडच्या कुटुंबांकडून मिळणाऱ्या निरंतर प्रोत्साहनामुळे त्या आरडब्ल्यूएसच्या अभियांत्रिकी विभागाच्या निर्देशक पदाचा भार स्वीकारण्यास तयार झाल्या. मात्र काही कालावधीतच त्यांना या गोष्टीचा वीट येऊ लागला आणि त्यांनी आपले काहीतरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे ʻडिझाइन -एन- बायʼचा जन्म झाला.

निधी सांगतात की, ʻबाजारपेठेतील प्रचंड मागणी पाहून मी एक इन हाऊस तांत्रिक टीम तयार केली आणि पहिल्या उत्पादनाच्या विकासाचे काम सुरू केले. २००९ सालाच्या अखेरपर्यंत आमचे उत्पादन जे टी-शर्ट प्रिंटर्स आणि व्यक्तिगत उत्पादन प्रिंटर्सकरिता पहिले ऑनलाईन समाधान देणारे उत्पादन होते. पहिल्याच वर्षी आम्हाला वापरकर्त्यांपासून सकारात्मक प्रतिक्रिया आणि प्रोत्साहन मिळाले. आम्ही आमच्या या उत्पादनाला ʻडिझाइन -एन- बायʼ हे नाव दिले. त्यानंतर मागे वळून पाहण्याची वेळच आमच्यावर आली नाही.ʼ निधी यांचा व्यवसाय जेव्हा बाजारात यशस्वी वाटचाल करत होता. तेव्हा त्या गरोदर असल्याचे त्यांना समजले. निधी सांगतात की, ʻएक नवजात मूल आणि वाढणारा व्यवसाय, या दोन्ही गोष्टींसोबत एकत्रित न्याय मी करू शकत नव्हते, याची मला कल्पना होती. त्यावेळेस मी एका मार्गदर्शकाकडे गेले, ज्याने मला माझ्या प्राथमिकता ठरविण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला सांगितले की, जवळपास प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या महिलेला अशा स्थितीतून जावे लागते. त्यामुळे मला माझ्या भूमिकांमध्ये संतूलन राखणे, शिकायला हवे.ʼ लवकरच निधी कामावर परतल्या आणि आपल्या मुलीलादेखील आपल्यासोबत नेणे सुरू केले. अशाप्रकारे आपल्या मुलीच्या देखभालीसोबत आपल्या कार्यालयाचे कामकाजदेखील सफलतापूर्वक पूर्ण करण्यात त्या यशस्वी ठरल्या. निधी सांगतात की, त्या वेळेस मला पहिल्यांदाच स्त्रियांमधील शक्तीची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. त्यांना हे समजले की, महिला सहजपणे कोणत्याही कामाला एकत्रितरित्या यशस्वी करू शकतात. याच कारणाने त्यांनी एक महिलाप्रधान टीम तयार केली. विपरीत परिस्थितीचादेखील खंबीरपणे सामना करण्याची क्षमता असलेल्या शक्तिशाली नेत्या इंदिरा गांधी यांना निधी आपला आदर्श मानतात. फावला वेळ त्या आपल्या मुलीसोबत घालवतात, तिच्याबरोबर खेळ खेळतात. अखेरीस निधी सांगतात की, ʻअशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे आपण शिकू शकतो. परिणामी आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना नव्या दृष्टीकोनातून पाहू शकतो.ʼ

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags