संपादने
Marathi

१००९ वेळेस नकार पचवल्यानंतर त्यांनी जगाला दिलं 'केएफसी' चिकन

Team YS Marathi
6th Dec 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

जर तुमच्यामध्ये काही तरी करण्याचा ध्यास आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही सर्व अडचणी पार करुन ते ध्येय गाठू शकता. अगदी वयाचा अडथळाही तुम्हाला यापासून रोखू शकत नाही. सर्व अडचणी पार करुन यशाचं शिखर गाठणा-या कर्नल सँडर्स यांचं आयुष्य आपल्याला हेच शिकवतं. जगप्रसिद्ध अशा केएफसी चिकनचे तुम्ही चाहते नसाल. पण त्याचे संस्थापक सँडर्स यांचा संघर्ष माहिती झाल्यानंतर तुम्ही त्यांना सलाम केल्याशिवाय राहणार नाही.

image


कर्नल हारलॅँड सँडर्स हे आपले ध्येय, निष्ठा आणि महत्त्वकांक्षा यांच्या जोरावर आज अनेक तरुणांचे रोल मॉडेल बनलेत. सँडर्स यांची संघर्षगाथा ऐकल्यानंतर प्रत्येक जण त्यांची मेहनत आणि दृढनिश्चयाला सलाम करतो. जगातला असा एखादाच देश असेल ज्या देशात सँडर्स यांचे ‘फिंगर लेकीन गुड’ आणि केंटकी फ्राईड चिकन ( केएफसी ) मिळत नाही. सा-या देशातले खवय्ये त्यांचं हे चिकन बोटं चाटत खात असतात.

डोळ्यावर चष्मा, स्वच्छ पाढंरा सुट, काळा टाय आणि हातामध्ये छडी घेतलेल्या सँडर्स यांना सहज ओळखता येतं. केएफसीच्या प्रत्येक बोर्डावर त्यांचं हेच छायाचित्र असते.

कर्नल सँडर्स यांचं आयुष्य हे एका रोमाचंक कथेसारखं आहे. या आयुष्याला सर्वात मोठं वळण ६५ व्या वर्षी मिळालं. त्या वर्षी सँडर्स यांनी आपलं हॉटेल बंद केलं. आयुष्यभर कष्ट केल्यानंतरही आपल्या खात्यामध्ये काहीच बचत नाही. आपण पूर्ण कंगाल आहोत हे सँडर्स यांना त्यावेळी लक्षात आलं.

वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी हॉटेलला कुलूप लावलं. निवृत्तीनंतरचं निवांत आयुष्य जगण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्याचवेळी सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणा-या रकमेचा पहिला चेक त्यांना मिळाला. या चेकनंतर त्यांचं आयुष्य बदललं.

१०५ डॉलर्सचा पेन्शन चेक त्यांची प्रसिद्धी आणि आर्थिक समृद्धीच्या इमारतीचा पाया होता. पण कदाचित त्यांचं विधिलिखित काही तरी वेगळंच होतं. याच चेकनं त्यांचं आयुष्य बदललं. त्यांनी काही तरी वेगळं करण्याचं ठरवलं. ज्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर ते प्रसिद्ध झाले.

कर्नल सँडर्स हे पट्टीचे खवय्ये होते. तसंच त्यांना इतरांना खाऊ घालण्यासही आवडत असे. उत्तम यजमान अशी त्यांची ओळख होती. ते खूपच सुंदर फ्राईड चिकन बनवत असत. त्यांना भेटणारा प्रत्येक जण त्यांनी बनवलेल्या फ्राईड चिकनच्या प्रेमात पडायचा.

आयुष्यातली ६५ उन्हाळे पूर्ण केलेल्या बहुतेक मंडळींची आरामदायी आयुष्य जगण्याची इच्छा असते. त्याचवेळी कर्नल सँडर्स यांनी काही तरी नवं करण्याचा निश्चय केला. आपली स्पेशल डीश असलेल्या फ्राईड चिकनची ओळख सा-या खवय्यांना करण्याचा त्यांचा निश्चय होता.

खवय्यांपर्यंत आपली ही डीश पोहचवणं सँडर्स यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. त्यासाठी त्यांना दिवस-रात्र एक करावे लागले. सुरुवातीला सँडर्स यांनी आपल्या परिसरातल्या प्रत्येक हॉटेलला भेट दिली. आपल्या चिकनबद्दल त्यांना माहिती दिली. त्यांच्या चिकनचा गोडवा ओळखणारा कुणीतरी सहकारी आपल्याला भेटेल जो याची महती जगापर्यंत पोहचवण्यास मदत करेल असा सँडर्स यांचा विश्वास होता. पण प्रत्येक बाजुनं त्यांना निराशाच सहन करावी लागली.

सुरुवातीच्या टप्प्यात सतत अपयश येत असूनही सँडर्स यांनी हार मानली नाही. लोकांपर्यंत आपले चिकन पोहचवण्यासाठी त्यांनी नवा मार्ग शोधला. सँडर्स आता शहरातल्या वेगवेगळ्या हॉटेलमधल्या किचनमध्ये जाऊन तिथं आपलं चिकन बनवू लागले. हॉटेल मालकाला त्यांचं चिकन आवडलं तर त्याचा हॉटेलच्या मेन्यूमध्ये समावेश होत असे. तब्बल १ हजार ९ हॉटेल मालकांकडून नाही असं उत्तर मिळाल्यानंतर सँडर्स यांच्या या प्रयत्नांना यश मिळालं. १ हजार दहाव्या हॉटेल मालकाला त्यांचं चिकन आवडलं. या सर्व काळात सँडर्स यांनी आपली जिद्द सोडली नव्हती हे विशेष.या होकारानंतरच केएफसी चिकन बनवण्याची मालिका सुरु झाली.

हॉटेलात विक्री होणा-या प्रत्येक चिकनमधली पाच सेंट रक्कम कर्नल सँडर्स यांना मिळेल असा कर्नल आणि त्या हॉटेल मालकांमध्ये करार झाला होता. या करारामुळेच फ्राईड चिकनच्या बाजाराचा दरवाजा कर्नल सँडर्स यांनी ठोठवला, पण ही तर केवळ सुरुवात होती.

चिकन बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या मसाल्यांची माहिती होऊ नये म्हणून कर्नल यांनी हॉटेलमध्ये मसाल्याचं पाकिट पाठवण्यास सुरुवात केली. ज्यामुळे हॉटेलमध्ये त्यांचं चिकन तर बनत असे, पण त्याचवेळी त्यांची पाककृतीही गुप्त राहिली.

काळाचं चक्र बदललं. १९६४ च्या सुरुवातीला कर्नल सँडर्स यांच्या चिकनची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली होती. तब्बल ६०० हॉटेलमध्ये त्यांच्या चिकनची विक्री होत असे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना कर्नल सँडर्स यांनी केएफसी कंपनीला तब्बल २० लाख डॉलर्स इतक्या रकमेत विकून टाकलं. ते स्वत: कंपनीचे प्रवक्ता बनले.

आपल्या चिकनमुळे सँडर्स यांना प्रचंड लोकप्रिय केलं. १९७६ मध्ये जगातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांचा दुसरा क्रमांक होता.

वयाच्या ६५ व्या वर्षी बहुतेक लोकं निवृत्त होऊन घरात बसण्याची तयारी करत असतात. त्यावेळी सँडर्स यांनी जिद्दीनं नवी झेप घेतली. कधीही हार न मानण्याची वृत्ती ठेवून कोणतंही काम केलं तर यश नक्की मिळवता येतं हे कर्नल सँडर्स यांनी जगाला दाखवून दिलंय.

लेखक : निशांत गोयल

अनुवाद : ओंकार डी.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags