संपादने
Marathi

वाचन संस्कृतीला चालना देणारे 'कॅफिनेटेड कनवरसेशन्स'

Team YS Marathi
10th Mar 2017
Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share

कविता सिंग झाला, या कॅफिनेटेड कनवरसेशन्सच्या संस्थापिका आहेत, त्यांनी त्यांचे अनुभव युवर स्टोरीला सांगितले.

त्या म्हणाल्या की, “इंदूरमध्ये वाचक, आणि लेखक किंवा ब्लॉगर्स एकमेकांच्या संपर्कात असतात. तसेच व्यावसायिक आणि हौशी कलावंत एकमेकांच्या संपर्कात असतात.अशा वेगवेगळ्या लोकांना संपर्कात राहण्याची आवड आणि गरज असते ती पूर्ण करण्याचे आणि या सा-यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम कॅफिनेटेड कनवरसेशन्स करते. त्यासाठी आयोजने केली जातात, त्यात कलांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम असतात. नोव्हे. २०१६पासून के के या कार्यक्रमातून लेखक आणि कलावंतांना मेक इन इंडियामध्ये सगभागी करुन घेत आहे. त्यात वर्गणी, बुक बॉक्स यांच्या माध्यमातून भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रसिध्दी दिली जाते.”

कविता या केके च्या सर्वेसर्वा आहेत, हा उपक्रम त्यांनी एप्रिल २०१६मध्ये सुरू केला. केके बुक बॉक्स या ब्रण्ड उत्पादनाच्या उदघाटनातून हा उपक्रम गतवर्षी १ नोव्हे. ला सुरू झाला.

३५ वर्षाच्या कविता यांनी कारकिर्दीची सुरूवात कन्सेप्ट इंस्टिट्यूट ऑफ एज्यूकेशन मधून केली, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी केंब्रीज विद्यापीठाच्या सोबत या कारकिर्दीला सुरूवात केली. तेथे त्यांनी पाचपेक्षा जास्त वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये इचाय व्हेंचर (eChai Ventures) केले. ज्यात स्टार्टअप आणि अान्त्रप्रिनीअर यांच्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. रायसिंग लिटेरा च्या देखील त्या सह संस्थापिका आहेत. अशी संघटना ज्यात त्या केके सोबत चालवित आहेत.


Founder Kaffeinated Konversation

Founder Kaffeinated Konversation


हे काय काम करते ?

कॅफिनेटेड कनवरसेशन्स कलात्मकतेसाठी जागा निर्माण करते. कला महोत्सव, कार्यक्रम, परिषदा यांच्या माध्यमातून के के बुक बॉक्स ब्रँण्ड आणि प्रकाशक आयोजक संस्था, लेखक यांना संपर्कात आणते, त्यातून वाचन संस्कृतीला चालना, पुस्तक प्रकाशने, कला आणि हस्तकला, यांना प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या सेवा असतात. पुस्तक प्रकाशनकर्ता, लेखकांच्या मुलाखती, पुस्तक परिक्षणे, आणि इतर. कंपनीने बुक बॉक्स संकल्पना दर महिन्यात राबविली आहे. यातून संपर्क वाढतो, आणि भारतीय लेखकांच्या पुस्तकांची ओळख लोकांना होते, भारतीय स्टार्टअपना त्यांच्या व्यवसायासाठी मदत होते.

कविता पुढे सांगतात की, “ मुलत: मी वाचकांना त्यांचे स्वत:चे ग्रंथालय असावे यासाठी मी प्रोत्साहन देते, कारण त्यांच्याजवळ स्वत:चे ज्ञान भांडार असायलाच हवे, प्रत्येक पुस्तकाचे काही खास अनुभवज्ञान असते, त्यामुळे ते स्वत:जवळ असणे लेखन वाचकांना प्रोत्साहित करत असते. वाचनात भारत मागे आहे- रोज सरासरी ३४ पाने आपल्याकडे वाचली जातात, जे काही देशात दोन हजार पाने इतके वाचन केले जाते. पुस्तक प्रकाशनात भारत जगात आठव्या क्रमांकावर आहे, आणि येथे साठ हजारपेक्षा जास्त ग्रंथालये आहेत. त्यामुळे वाचनाला आणि वाचकांना प्रोत्साहन देण्याची गरज नाही का?”

बाजारपेठेची व्याप्ती

भारतामध्ये, ६३५ लाख लोक सुशिक्षित आहेत, त्यापैकी केवळ २३ टक्केच शहरी भागात राहतात. त्यामुळे सर्वाधिक वाचक शहरी भागातून येतात. त्यामुळे ग्रामिण भागात आजही इंग्रजीत लिहिलेले पुस्तक पोहोचणे सोपे नाही. स्थानिक भाषांच्या पुस्तकांचे प्रमाणही कमीच आहे. वयोमानपरत्वे वाचक वेगळे असतात.

या व्यवसायाची संकल्पना समुदाय आणि प्रकाशनगृहांच्या स्टार्टअपवर आधारित आहे. ज्यातून व्यवसाय दिला जातो. याच्या महसूलाचे मार्ग असतात, पुस्तक परिक्षणे,लेखकांच्या भेटीगाठी, प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा, साहित्य मेळावे, साहित्योत्सव, आणि स्वत:चे ग्रंथालय. महाविद्यालयातील आणि शाळातीक तरूण वाचक, व्यावसायिक, शिक्षक, गृहिणी, लेखक, कलावंत एकत्रितपणे त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करतात.

सध्या कंपनी सोबत आठ जण शिकाऊ म्हणून काम करतात, ते भारताच्या वेगवेगळ्या भागातील आहेत. याशिवाय सध्या सहा कोअर सदस्य आहेत जे केके साठी मेळावे, भेटीगाठी आणि इतर चळवळीसाठी माहिती देण्याचे काम करतात.

Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags