संपादने
Marathi

२०१७ – शक्यतांचे वर्ष!

Team YS Marathi
3rd Jan 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

नवे वर्ष नेहमीच नव्या शक्यता घेवून येत असते, आणि अपेक्षा असते की या वर्षात काहीतरी छान घडेल. नवी सुरुवात नेहमीच आपल्यासाठी संधी देत असते, आपण त्यांच्यापैकी सा-या संधी वापरल्या पाहिजेत.

आपल्याला नेहमीच नव्या सुरुवातीची ओढ असते. प्रत्येक उमेदवार नवी सुरुवात करण्याचे आश्वासन मतदारांना देवून त्यांची मते मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. आपण नव वर्षाचे संकल्प करतो. नव्या व्रर्षाचे कँलेंडर भिंतीवर लावतानाच आपल्या मनात नव्या वर्षात नव्याने काही वागावे असे वाटत असते. त्यातून आपले मागे काहीतरी करायचे राहून गेल्याचे ध्वनित होते असते, अपूर्ण राहू गेलेल्या गोष्टी पूर्ण करण्याच्या उर्मी त्यामुळेच नव्याने मनात येत राहतात. नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे न उघडलेल्या भेटवस्तूच्या सारखा असतो, ज्यात माहिती नसते काय आहे त्यामुळे खूप आशेने आपण ते उघडण्यासाठी उत्सुक असतो. काही देशात अगदी सरकारी विभाग देखील नव वर्षांचे संकल्प जाहीर करत असतात.

image


प्रोत्साहनात्मक वागणूक

लाखो लोकांच्या मनात पहिल्याच दिवशी आशा निर्माण करणा-या या अपेक्षांमागे काय असते तर काहीतरी आव्हानात्मक असावे. धर्म देखील आम्हाला नवे काहीतरी सुरू करण्याची संधी देतात. कबुलीनामा किंवा अपराधी भावना या दोन्हीतून सारख्याच प्रकारे धर्म त्यांच्या अनुयायीना प्रोत्साहन देत असतात. उत्सव हे ताजी सुरुवात करण्याचे प्रतिक असतात. सुट्ट्या आणि वाढदिवस हे सुध्दा अशाच प्रकारे उत्तेजन देत असतात.

मानसिक गणना

कामात बदल म्हणजे देखील कारकिर्दीत ताजेपणाने काही करण्याचा प्रयत्न असतो. जीवनातील प्रसंग जसे की लग्न, नवीन जन्म किंवा आवडत्या व्यक्तींचा मृत्यू आपल्याला हलवून सावध करतात की कसे जगले पाहिजे. महत्वाचे म्हणजे संधी जी आपल्याला नव्या प्रकारे जगण्याची दृष्टी देते. नव्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करण्यास सुचविते. जुन्या त्याच त्या पध्दतीने आपल्याला रडविलेले असते. नवअभ्यासक्रम हा सुध्दा स्थित्यंतर असते जसे की शाळेतून महाविद्यालयात, नवे नाते सुध्दा जीवन नव्याने कसे जगावे यांची संधी देत असते. मानस शास्त्रज्ञांनी शोधले आहे की, आपल्या मनातील हिशेब काहीतरी नवे शोधत असतात. जेव्हा आपण नव्या खुणा पाहतो, आपण मनात त्यांची खुणगाठ बांधतो. त्यातून नव्या कल्पना तयार केल्या जातात जुन्या सुधारल्या जातात. काही काळ थांबून विश्रांती घेण्यातही आपण नवा उत्साह मिळवून पुन्हा काम करत असतो. त्यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतो. मानसिक संतुलनातून आपण भूतकाळापासून स्वत:ला वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. गुगल सर्चवर डायट आणि व्यायाम हे शब्द दरवर्षी १ जानेवारीच्या आसपास नेहमीच शोधले जातात. तुमचा जो काही संकल्प असेल लक्षात ठेवा तुम्हाला खूप संधी असतील. ज्यातून वर्षभरात नव्याने सुरुवात करता येवू शकते. कोणत्याही दिवशी जेंव्हा असे वाटेल ‘संधी आहे’ तुमच्या मनातील वर्षभरातील कोणतीही इच्छा पूर्ण करता येईल.

अनेक संधी अनेक जीवन

जर तुमच्या मनात असेल त्यावेळी सुरुवात किंवा शेवट करता येत असेल, तर या वर्षात खूप संधी आहेत. तुम्ही १ जानेवारी २०१७ला नवे वर्ष सुरु झाले असे मानता जो सोमवार आहे. चीनी लोक २८ जानेवारीला नवे वर्ष साजरे करतात. १४ एप्रिल रोजी बंगाली लोकांचे नवे वर्ष सुरु होत आहे. त्यानंतर १७ ऑगस्टला पारसी नव वर्ष सुरु होत आहे.ज्यूंचे २०-२१सप्टेंबरला सुरु होणार आहे.

आठवड्याचा पहिला दिवस, किंवा महिन्याचा पहिला दिवस यांच्यात नवी सुरुवात करण्याची क्षमता असते. जगात केवळ एक प्रकारचे कँलेंडर मान्य नाही. त्यातच संधी दडली आहे. प्रत्येक धर्माने वेगवेगळ्या दिवशी नवी सुरुवात करण्याची संधी दिली आहे.

चला २०१७ला संधी तून नव्या शक्यता निर्माण करुया. तुम्ही करु शकला नाहीत तर प्रत्येक दिवशी तुम्ही ते करू शकता. कुणीतरी, कुठेतरी आधीच कारण तयार करून ठेवले आहे ३६५ दिवसांत काही देखील करता येण्यासाठी. जे मी करतो आहे. प्रत्येक दिवस ही नवी सुरुवात आहे, संधी आहे. तुमचे कार्य तुमच्या सोयीनं करण्यासाठी. तुम्हाला पटते आहे का?

लेखक : अभिजित भादूरी

सूचना : या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते लेखकांची स्वत:ची मते आहेत त्या मतांशी युअरस्टोरीचे संपादक सहमत असतीलच असे नाही. 

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags