संपादने
Marathi

लहानग्यांना उद्योजकता शिकवण्यासाठी 'त्यांनी' स्वत:ची नोकरी सोडली

Team YS Marathi
16th Jul 2017
Add to
Shares
12
Comments
Share This
Add to
Shares
12
Comments
Share

जरी आमच्याकडे जगातील सर्वाधिक तरूण लोकसंख्या असली तरी, आमच्याकडे भारतीय बनावटीचे गुगल किंवा आयपॅड का नाही? हा प्रश्न घेवून उद्योजकता वाढवली तर हे शक्य आहे असा विश्वास बाळगून 'अत्राल अकदमीची' स्थापना करण्यात आली. बाला धांडपाणी यांच्या या सामाजिक व्यावसाईक संस्थेचे उद्दीष्ट तरूणांच्या व्यक्तिमत्व आणि क्षमता यांचा वेध घेवून त्यांच्यात उद्यमशिलता निर्माण करणे हा आहे.


Image: Aatrral Academy

Image: Aatrral Academy


अत्राल अकादमी हे नीट समजून घेण्यासाठी, कुणालाही नेहमीच्या धाटणीची प्रतिमा बाजूला करून आपण जसे शाळा किंवा महाविद्यालयाची कल्पना करतो तसा विचार करता कामा नये. येथे विद्यार्थ्यांना सांगितले जात नाही की काय करायचे आहे आणि प्रौढांकडून काय केले जाणार आहे. याची सुरूवात विद्यार्थ्यांना त्यांना कशात रूची आहे त्या क्षेत्रात मदत करण्यातून होते, आणि त्यांच्या क्षमतांचा विकास केला जातो, आणि ही तरूण मने त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात विकसित होत जातात, बाला यांच्या शब्दात, “ विद्यार्थी वाचनाची सुरूवात करतात की त्यांना काय आवडते. ते मला काही अडले की संपर्क करतात, किंवा त्यांना त्यांच्या विषयात काही प्रश्न असतात. मी त्यांना काही प्रयोग करून पहायला सूचवितो, जे आम्ही खास तयार केले आहेत ज्यातून ही शिक्षण प्रक्रिया परिपूर्ण होते”

विद्यार्थ्यांच्या गळतीचे महत्वाचे कारण म्हणजे शिक्षकांची भीती आणि शिक्षा. शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने मुलांच्या मनात ती स्वार असते ज्यांना शिकण्याची भिती वाटत असते. बाला त्यांच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देत नाहीत किंवा शिकवत नाहीत. त्याउलट ते त्यांना स्वयंशिक्षा घेण्यास प्रवृत्त करतात. मात्र अकदमी मध्ये ते विद्यार्थ्यांना उबदार, पोषक वातावरण देण्याचा प्रयत्न करतात, यावर बाला म्हणतात की, “ ज्यावेळी एखादे मूल आमच्यासोबत तीन किंवा चार दिवस घालविते, त्यांची किंवा तिची सारी भिती दूर होते. कारण आम्ही काही सूचना करत नाही किंवा त्यांच्या मनावर कोरण्याच प्रयत्न करत नाही. मात्र आम्ही साध्या प्रयोगाच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करतो.”


image


तमीळनाडूमधील गरीब घरातून आलेले बाला हे व्यवसायाने अभियंता आहेत. अभियांत्रिकीकडे ते अधिक पैसा मिळावा म्हणून आकर्षित झाले. मात्र बंगळुरूमध्ये काही वर्ष काम केल्यांनतर ते सिंगापूरला पैसा कमाविण्यासाठी गेले. मात्र ज्यावेळी त्यांना असे वाटले की त्यांनी पुरेसा पैसा कमाविला आहे, त्यांनी सिंगापूरच्या लोकांना त्यांची परतफेड करावी असा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यास सुरूवात केली. आणि त्याचवेळी त्यांना जाणिव झाली की त्यांना भारतासाठी देखील काही ठोस काम केले पाहिजे.

अंध मुलांसाठी संगणक कौशल्य शिकवण्यापासून स्टार्टअप सुरू करण्यापर्यंत त्यांनी काम केले दहा वर्षापूर्वी त्यावेळी त्यांनी अत्राल अकदमी सुरू केली नव्हती. बाला यांच्यात अनेक गोष्टी करण्याचा हुनर आहे. त्यांचा हेतू संख्या देण्यापेक्षा दर्जा देण्यावर असतो, बाला यांचा कटाक्ष असतो की वर्षात ३० पेक्षा जास्त विद्यार्थी घेता कामा नयेत. आणि जोवर त्या विद्यार्थ्याना त्यांच्या कामात खरोखर गती मिळत नाही, पैसा हा काही मुद्दा नसतो. गरीब मुलांना तर ते सारे मोफत शिकवतात.

Add to
Shares
12
Comments
Share This
Add to
Shares
12
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags