संपादने
Marathi

आयसींग ऑन द केक ते आयओटीसी

5th Mar 2016
Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share

प्रत्येक शहराची एक खासियत असते. त्या विशिष्ठ शहरातल्या सामाजिक आणि आर्थिक घडामोडी त्या शहराची जडणघडण करत असतात. त्यातून या शहराचीही खासियत ठरते. ती विकसित होते ती तिथल्या लोकांच्या आवडीनिवडीतून. मग ती भाषेसंदर्भातली असो किंवा मग थेट खवय्येगिरी संदर्भातली. नागपूर शहराच्या बाबतीत हे आराखडे आणि अंदाज तंतोतंत खरे ठरतात. नागपूर म्हटलं की दोन गोष्टी समोर येतात. एक हल्दीरामची संत्रा बर्फी आणि सावजी. गेली कित्येकवर्षे नागपूर शहराची हे ओळख बनून राहिलेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या दोन्ही गोष्टी नागपूर शहराचं बिरुद ठरत होत्या. या शहराची ओळख बनल्या होत्या. इथं येणाऱ्या लोकांना याबद्दल फारच अप्रूप होतं. गेल्या पाच ते सहा वर्षात नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. याला कारण ठरली ती इथली वाढलेली तरुणांची संख्या. यातूनच मग सीसीडी, मॅक्डी आणि इतर तरुणांना आवडणाऱ्या इतर गोष्टी आल्याच. या सर्व गोष्टींकडे ट्रेन्डी म्हणून पाहू शकतो. पण याच काळात मेड इन नागपूर म्हणून आणखी एक नाव पुढे आलं. ते म्हणजे आयसींग ऑन द केक.... सध्या या आयसींग ऑन द केक या दुकानाला तरुणांनी आयओटीसी असं छोटं लाडाचं नाव दिलंय. 

image


शहरातलं एक मुख्य ठिकाण असलेल्या इंपेरियल कोर्टजवळ आयसींग ऑन दे केक हे बेकरी बिस्ट्रो आहे. मोठंच्या मोठ्या इमारतीत निळ्या अक्षरात लिहिलेली आयसींग ऑन द केक ही अक्षरं तशी लगेच लक्ष जाणारी नाहीत. कारण ही इमारत आहे अगदी टोकावर. गर्दीपासून दूर... थोडं पुढे गेलं की धरमपेठची खाऊगल्ली येते. तिथं तरुणाईचा नुसता कल्ला असतो. बाईकवर स्वार होऊन हे महाविद्यालयीन तरुण या खाऊ गल्लीत फेऱ्या मारत असतात. पिझ्झापासून कालाखट्टापर्यंत सर्व काही इथं मिळतं. या सर्व गोंगाटापासून दूर जाऊन शांत बसायचं असेल. तर तुम्हाला एकच पर्याय राहतो. आयसींग ऑन द केक. इथं आलं की आपल्याला मेनू कार्डमध्ये पहायला मिळतात ती थेट इटालियन डिशेस... चीझ केक, पेस्ट्रीज, न्यूडल, मंचूरियन, पेन अराबिटा. लाल, पिवळ्या रंगाच्या पेस्ट्रींजवरंच आकर्षित करणारं टॉपींग आणि सर्वात महत्वाची म्हणजे वॉलनट पाय. असं सर्व काही युरोपीयन थाटात तुमच्या समोर असतं. पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला पानी सुटेल इतकं आकर्षक आणि स्वादिष्टही. इथलं सर्वात जास्त काय आवडतं असं जर कुणाला विचारलं तर एकच उत्तर मिळतं एम्बीयन्स.. सध्या हवा या एम्बीयन्सचीच जास्त आहे. त्यामुळं परफेक्ट एम्बीयन्ससाठी आयओटीसीची निवड होते. 

image


आम्ही जेव्हा आयसींग ऑन द केक सुरु केलं तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट होती ती एकदा आलेली व्यक्ती माझ्या स्टोरमध्ये पुन्हा पुन्हा यायला हवी. त्याला ते आपलं वाटायला हवं. त्याला इथल्या स्वादिष्ट पदार्थांबरोबरच तो इथल्या वातावरणाच्या प्रेमात पडायला हवा. म्हणूनच जागा निवडताना आम्ही थोडी गर्दीपासून दूर असलेली जागा निवडली. अगोदर मनात थोडी शंका होती पण फक्त लोकांना एकदा का चव लागली की ते त्यासाठी ते कुठेही जायला तयार असतात. आज इथल्या एम्पीयन्ससाठी येणारी लोक आहेत. ते इथं येतात. गप्पा मारतात. एक एक पेस्ट्री फस्त करतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इथल्या गोष्टी आवडल्याची पोचपावती असते. आम्हाला तेच हवं असतं. “आयसींग ऑन द केकचे मालक आशिष राठी सांगत होते. 

image


आशिष राठी हे व्यवसायानं बांधकाम व्यवसायिक. बेकरी व्यवसायाशी त्यांचा दूरुनही संबंध नव्हता. चांगलं खायला आवडायचं पण कधी आपणही आपलं केकचं असं आऊटलेट सुरु करु असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. काही परदेश वाऱ्यांमधून आपल्या शहरातही अश्या स्वादिष्ट पेस्ट्रीज किंवा केक मिळायला हवेत असं आशिष यांना वाटत होतं. त्यामुळं नागपूर शहरात असं काहीही सुरु करता येईल का याचा रिसर्च सुरु झाला. याचं उत्तर होय असं मिळालं. “माझा या क्षेत्राशी काहीही संबंध नाही. बांधकाम व्यवसायापासून वेगळं होऊन असं काही सुरु करावं असं कधीच वाटलं नव्हतं. पण नागपूरमध्ये असं आऊटलेट बेकरी रेस्ट्रो असलं पाहिजे असं वाटत होतं. रिसर्चनंतर अशा आऊटलेटची खरंच गरज असल्याचं जाणवलं. मी स्वत: बेकरी प्रोडक्ट तयार करायला शिकलो. ती प्रक्रिया फार मजेशीर होती. काहीच माहिती नसलेल्या क्षेत्रात उडी घेणं आणि निव्वळ प्रयोग म्हणून नाही तर आऊटलेट सुरु करण्याच्या इराद्यानंच उतरणं असं हे फार एक्सायटींग होतं. मला आऊटलेट सुरु करण्याचा विश्वास आला आणि धरमपेठ भागात आमच्या स्वत:च्या जागेत हे सुरु केलं. यापूर्वी नावं ऐकली नसतील अशा गोष्टी आम्ही इथं विकायला सुरुवात केली. पेस्ट्री, चीझ केक असं सर्व काही इतरांपेक्षा वेगळे प्रोडक्ट आम्ही विकायला सुरुवात केली. आधी शंका होती चालेल की नाही पण लोकांना टेस्ट आवडली. हळूहळू माऊथ पब्लिसिटीनं आम्ही काही दिवसामध्ये संपूर्ण नागपूर शहरात प्रसिध्द झालो.“ आशिष सांगत होते. 

image


आयसींग ऑन द केक हे नाव कसं आलं तर यावर आशिष सांगतात, “ हे थोडं ट्रेन्डी असलं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. आजूबाजूला कॉलेज आहेत. मध्यमवर्गीय राहतात त्याच्या पटकन लक्षात राहिल आणि तोंडात बसेल असं नाव असायला हवं होतं. आम्ही तोच विचार करत या फ्रेजला नाव म्हणून फायनल करुन टाकलं. आता लोकांनी त्यांचं आयओटीसी असं नामकरण केलंय. तुम्हाला एक सांगतो कॅफे कॅफे डेचं सीसीडी झालं, मॅक्डॉनल्डचं मॅक्डी झालं याचं कारण काय होतं माहितेय कारण ते लोकांना आवडायला लागले. त्यांच्या रोजच्या जीवनाच्या घटक बनले. आमच्या आयसींग ऑन द केकच्या बाबतीत ही तेच घडलं. इतकं की काही दिवसांमध्येच आम्ही नागपूर शहरात आयओटीसी म्हणून ओळखू लागलो. मला वाटतं हीच आमच्या यशाची पावती आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे.“

image


अवघ्या चार वर्षांमध्ये नागपूर शहरामध्ये आयओटीसीचं नेटवर्क उभं राहिलंय. आता शहरात चार ठिकाणी आयसींग ऑन द केक गर्दी खेचतायत. इतक्या कमी कालावधीत नागपूरसारख्या शहरात एका बेकरी एन्ड बिस्ट्रोचा असा विस्तार होण्याची ही पहिलीच घटना असावी. 

image


आशिष सांगतात “ आम्ही इथं येणाऱ्या प्रत्येक कामगाराला शिकवतो. या व्यवसायातले कामगार मिळणं खूप कठिण असतं. आम्ही त्याला आमची कला शिकवतो. काही कालावधीत त्याला तरबेज केलं जातं. हीच आमची खासियत आहे.” 

image


आयओटीसीला आता नागपूरच्या बाहेर विस्तार करण्याचे वेध लागलेत. पण त्याकरता त्यांनी महाराष्ट्राचा विचार न करता मध्यप्रदेशातले इंदौरसारख्या शहराची निवड करण्याचा मनसुबा आहे. “इंदौर शहराला एक खवय्यांचा इतिहास आहे. तिथल्या खाद्यपदार्थांवरुन जागेची ओळख होते. खवय्यांच्या या शहरात आयओटीसीलाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे.“ आशिष सांगत होते. 

आयओटीसीची आतापर्यंतची कामगिरी पाहता लवकरच नव्या शहरांच्या सीमारेषांना कवेत घेण्यासाठी ते तयार असल्याचं स्पष्ट जाणवतंय. “मी स्वता खवय्या आहे. मला खायला आवडतं. मी माझ्यावरुन लोकांचं निरिक्षण करतो. विकएन्डला शांततेत आपल्या कुटुंबासोबत घालवायला एक जागा हवी असते. मला वाटतं आयओटीसी ही ती जागा आहे. जिथं गेल्यावर घरच्या सारखं वाटतं. आठवडाभर कॉलेजचे तरुण-तरुणींची रेलचेल असते इथे. विकएन्डला सर्वजण आपल्या फॅमिलीसोबत येतात. गप्पा मारतात. खुष होऊन जातात. त्यामुळे आयसींग ऑन द केक महाविद्यालयीन तरुणांचं जितकं आवडतं आहे, तेवढंच ते इथल्या फॅमिलींचंही आहे.”

नागपूर हे देशाचं मध्यवर्ती शहर आहे. या शहराच्या मधोमध उभं असलेल्या आयओटीसीनं शहरात जसा आपला ठसा उमटवला आहे. तसाच देशभरही होईल असा विश्वास आशिष यांना वाटतोय.  

अशाच नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कथा :

अस्सल मुंबईकर 'फोगो'

ʻअन्नपूर्णाʼ सुरेखा वाळके यांचा ʻचैतन्यʼमयी प्रवास

झटपट खादंती अर्थात क्यूएसआरचा मुंबईत अविष्कार : रिधीमा आणि श्रेयांस विजय यांचे ‘स्टफड्’ !

Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags