संपादने
Marathi

चुटकीसरशी वाजवी दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणारे ‘हेल्थएनेब्लर’

12th Mar 2016
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

वर्ष २०१३ मध्ये बामाशिश पॉल, वय ३९ वर्ष आणि अविषेक मुखर्जी, वय ३६ वर्ष युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधून त्यांचे एमबीएचे शिक्षण पूर्ण करत होते आणि त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टवर काम करत होते. प्रोजेक्टचा (अभ्यासाचा) भाग म्हणून त्यांनी एक डॉक्टर नेटवर्किंग पोर्टल तयार केले.


बामाशिष पॉल (डावीकडे) आणि अविषेक मुखर्जी  

बामाशिष पॉल (डावीकडे) आणि अविषेक मुखर्जी  


त्यापूर्वी, अविषेक हेल्थकेअर ऍनालिटिक्समध्ये काम करत होता आणि त्याने मायो क्लिनिक, कॅपिटल ब्ल्यू क्रॉस या कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम केले होते. बामाशिशने एआयजी प्रायव्हेट इक्विटी आणि ब्रुकफिल्ड इक्विटीमध्ये इन्वेस्टर म्हणून काम केले होते, जिथे तो रिअल इस्टेट सेक्टर सांभाळायचा.

इन्वेस्टर म्हणून काम करणाऱ्या बामाशिशला उद्योजक व्हावे असे का वाटले? या प्रश्नाचे उत्तर देताना तो सांगतो, “मला वाटतं माझ्या क्षेत्रात माझं काम खूपच आरामात चाललं होतं. एक इन्वेस्टर म्हणून तुम्ही एखाद्याच्या प्रवासातील केवळ एक भाग असता. तुम्ही स्वतः तुमच्यासाठी काही निर्माण करत नसता. मला माझा मार्ग स्वतः तयार करायचा होता.”

कोर्स संपल्यावर बामाशिशने एआयजी कॅपिटलबरोबर काम करायला सुरुवात केली आणि अविषेकने जिनीआ टेक्नॉलॉजीजमध्ये चीफ टेक्नॉलॉजी ऑफीसरची जबाबदारी स्विकारली. तथापि, व्यवसायाविषयीच्या प्रयत्नांबद्दल त्यांची चर्चा सुरुच होती. बऱ्याच चर्चेनंतर एक कल्पना वाजवी दरात सहज उपलब्ध होत असलेली एक रुग्ण केंद्रित हेल्थकेअर सेवा ‘हेल्थएनेब्लर’च्या रुपात अस्तित्वात आली.

‘हेल्थएनेब्लर’ ही एक टेलिमेडिसिन हेल्थकेअर सर्विस कंपनी आहे. या कंपनीने वाजवी दरात जगभरात हेल्थकेअर सुविधा पुरविण्याचे मिशन हाती घेतले आहे. कंपनीने स्वतःच्या मालकी हक्काचा वेब आणि मोबाईल सेंट्रिक प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. ज्याद्वारे रुग्णांना मदत मिळण्याबरोबरच डॉक्टरांना त्यांचे वेळापत्रक हाताळायला आणि त्याची आखणी करायलाही मदत होत आहे.

हा प्लॅटफॉर्म दोन भागांमध्ये विभागलेला आहे. पोककेअर - ही या उत्पादनाची रुग्णांकरिताची बाजू आहे, ज्याद्वारे सामान्य रुग्ण व्हिडिओ अपॉइंटमेंट बुक करु शकतात, डॉक्टरला प्रत्यक्षात पाहू शकतात किंवा डॉक्टरबरोबर प्रत्यक्ष बोलू शकतात. या प्लॅटफॉर्मवर सध्या तुम्ही त्यांच्या वेबसाईट, ऍन्ड्रॉइड ऍप किंवा हेल्पलाईनवरुन अपॉइंटमेंट बुक करु शकता

दुसरा विभाग आहे पोकक्लिनिक. हे डॉक्टरांसाठीचे एक प्रगत क्लिनिक मॅनेजमेंट सास सॉफ्टवेअर आहे. जे डॉक्टर्सना त्यांच्या दिवसाचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यास मदत करते. यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. ब्रॅण्डएज- जी अपॉइंटमेंट रिक्वेस्ट स्विकारुन आणि डॉक्टर्सची उपलब्धता तपासून अधिक रुग्ण सामावून घेण्याचे काम करते; रेकॉर्डप्रो, जी डॉक्टर्सना सुरक्षित क्लाऊडवर त्यांच्या सर्व रुग्णांच्या माहितीचे व्यवस्थापन करण्यास मदत करते; आणि प्रॅक्टीस ३६०, जी डॉक्टर्सना टेलिमेडिसीन विजीटच्या माध्यमातून प्रॅक्टीसचा विस्तार करण्यास मदत करते.

सध्या या प्लॅटफॉर्मवरील नेटवर्कमध्ये कोलकाता आणि परिसरातील, तसेच आसपासच्या शहरातील ३७०० च्या आसपास डॉक्टर्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कंपनीचे हेडक्वार्टर असलेल्या मुंबईतील डॉक्टर्सही नेटवर्कमध्ये आहेत. कंपनीचे पाच इनहाऊस डॉक्टर्सचेही एक नेटवर्क आहे आणि संस्थापकांच्यानुसार या नेटवर्कवरील डॉक्टर्सची संख्या आणखी वाढेल.

डिसेंबर २०१५ पर्यंत कस्टमर सपोर्टमधील १६जण आणि सपोर्ट सेल्समधील १२ जणांसह टीमची संख्या ३० वर गेली. नोव्हेंबर २०१५ पर्यंत कंपनीद्वारे दर दिवशी १५ टेलिमेडिसिन कन्सल्टेशन्स केल्या गेल्या. तर एकूण ५० व्हिडिओ कॉल्स घेतले गेले.


हेल्थएनेब्लरची टीम  

हेल्थएनेब्लरची टीम  


संस्थापक सांगतात की वार्षिक महसूलाच्या भाषेत बोलायचे झाले तर त्यांचा ४० टक्के महसूल ब्रान्डएजवरील रु २५० किंमतीच्या सेवा आणि रु ४५० किंमतीचे बेसिक पोकक्लिनिक मॉडेल सबस्क्रिप्शन यांच्या प्रिमीयम सूचीसह, बिझनेस टू बिझनेस भागामधून निर्माण होतो.

व्यवसायातील बिझनेस टू कन्झ्यूमर पद्धतीने व्यवहार करण्यापूर्वी कंपनीने आपले लक्ष स्पष्टपणे व्यवसायाच्या बिझनेस टू बिझनेस बाजूवर आणि जास्तीत जास्त डॉक्टर्स आणि स्पेशालिस्टला नेटवर्कवर आणण्याच्या दृष्टीने त्यांच्याकरिता विविध चांगल्या ऑफर्स देण्यावर केंद्रित केल्याचे दिसते. कंपनी लवकरच ग्राहकांसाठी आपल्या विशेष सेवा २४/७ उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात आहे.

आयबीइएफ आणि पीडब्ल्यूसीच्या रिपोर्टनुसार भारतातील हेल्थकेअर मार्केटची किंमत २०१५ पर्यंत १०० अब्ज डॉलर्स होती. युअरस्टोरीच्या रिसर्चनुसार, हेल्थकेअर क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांचा रस आधीच वाढलेला आहे. गेल्या वर्षी २७६.५ दशलक्ष डॉलर्स किंमतीचे ५७ सौदे झाले आहेत. २००४ ला झालेल्या ९१.६ दशलक्ष डॉलरच्या सौद्यांच्या तुलनेत ही खूप मोठी वाढ आहे.

वाढीव ऍक्टीव्हिटी, वाढीव नफ्याची व्याप्ती आणि मोठ्या गुंतवणूकदारांचे या क्षेत्राकडे असलेले लक्ष या सगळ्यांमुळेही अनेकांनी या बाजारात प्रवेश केला, त्यामुळे या विभागात बऱ्यापैकी गर्दी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झालेल्या आणि मार्केटमध्ये पाय रोवलेल्या ‘प्राक्टो’ आणि ‘लायब्रेट’शी ‘हेल्थएनेब्लर’ची थेट स्पर्धा आहे. शिवाय स्पर्धा संपविण्यासाठी प्राक्टोसारख्या मोठ्या कंपन्यांनी ‘क्विकवेल’ आणि ‘इन्स्टा हेल्थ’चे केलेले संपादन यामुळे या क्षेत्रात अधिक ऊर्जा निर्माण झाली आहे.

देशाच्या लोकसंख्येच्या ७० टक्के असलेली ग्रामीण भागात राहणारी जनता भविष्यात मागणीचा स्रोत म्हणून उदयाला येईल हा आयबीइएफचा रिपोर्ट विचारात घेता टिअर- २ श्रेणीतील शहारांमधून केलेली सुरुवात ही कंपनीसाठी एक चांगली बाब ठरु शकते.

सकारात्मक चिन्हे दिसत असली तरी सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या हेल्थएनेब्लरने मार्केट प्राप्त करण्यासाठी वाढत्या प्रमाणावर संपृक्त होत असलेले अभिनव धोरण बाजूला करणे गरजेचे आहे.

वेबसाईट: www.healthenablr.com

लेखक : तरुष भल्ला

अनुवाद : अनुज्ञा निकम

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags