संपादने
Marathi

कुठल्याही निधी उभारणीविना यशस्वी झालेले स्टार्टअप ‘दि टेस्टामेंट’

Team YS Marathi
10th Feb 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करणे सोपे नसते आणि टिअर- II स्तरावरील महाविद्यालातून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ते मोठे आव्हान असते. अभ्यास करणे, उत्पादनामध्ये बारीक सारीक आवश्यक सुधारणा करणे, कामांचा आराखडा तयार करणे आणि निधी उभा करणे ही सगळी कामे एकत्र करावी लागतात. अशातच जेव्हा तुमचा पहिलाच गुंतवणूकदार तुमच्या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे तुम्हाला दिलेले औपचारिक वचन पाळत नाही तेव्हा परिस्थिती आणखीनच बिकट होते. आयपी विद्यापीठाच्या तीन माजी विद्यार्थ्यांबरोबर हेच घडले. त्यांच्या कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना सुरुवात करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे दिलेले वचन पाळले नाही. मात्र तरीही या तिघांनी हार न मानता त्यांचे स्टार्टअप ‘दि टेस्टामेंट’ सुरु केले.

image


एप्रिल २०१२ मध्ये स्थापन झालेल्या ‘टेस्टामेंट’ने युनिव्हर्सिटी जर्नल म्हणून काम करायला सुरुवात केली. “आयपी विद्यापीठाला एक ब्रॅण्ड म्हणून सुपरिचित करुन देणे हे तेव्हा आमचे उद्दीष्ट होते. कारण आम्हाला टिअर-II कॉलेजमधले असल्याबाबतचा न्यूनगंड दूर करायचा होता,” ‘दि टेस्टामेंट’चा सहसंस्थापक निशांत मित्तल (२३ ) सांगतो.

सुरुवातीला ‘टीम टेस्टामेंट’साठी सगळे काही सुरळीत चालले होते. त्यांना त्यांच्या कॉलेज व्यवस्थापनाकडून (जुलै 2012 मध्ये) सुरुवात करण्यासाठी मदत करण्याचे वचन मिळाले होते. त्याचबरोबर काही राष्ट्रीय दैनिकांचा पाठिंबाही लाभला होता. मात्र कॉलेजने माघार घेतल्यामुळे त्यांना मुळापासून सुरुवात करावी लागली. निशांत पुढे सांगतो, “आम्ही तिथे थांबू शकलो असतो आणि दुसरे काहीतरी चांगले सुरु करु शकलो असतो, पण आम्ही याच स्टार्टअपवर ठाम राहून याला विकसित करायचा पर्याय निवडला.”

निशांत व्यतिरिक्त अविनाश खन्ना आणि कुमार संभव हे ‘दि टेस्टामेंट’चे इतर दोन सह-संस्थापक आहेत. या तिघांनी आयपी विद्यापीठातून इन्जिनिअरिंग केले आहे.

युनिव्हर्सिटी जर्नल म्हणून सुरुवात केलेल्या ‘दि टेस्टामेंट’ने स्वतःला एक प्रशिक्षण आणि विकास कंपनी म्हणून यशस्वीरित्या स्थापित केले आणि त्यानंतर मीडिया आणि मार्केटिंगमधल्या संधींचा शोध घेतला. “यामध्ये आर्थिक लाभ खूप कमी होता. पण या प्रवासादरम्यान १२ महिन्यांच्या कालावधीत आम्ही देशभरात एक दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांचे छुपे जाळे निर्माण केले,” निशांत सांगतो.

त्यानंतर शाश्वत प्रशिक्षण सेवांच्या आधारे ‘दि टेस्टामेंट’ने मार्केटमधील आपली ओळख बदलून कंपन्यांना तात्पुरती मनुष्यबळ सेवा पुरविणारे मॅनपॉवर सोल्यूशन्स म्हणून यशस्वी सुरुवात केली. हळूहळू कंपनी विकसित होत गेली आणि कंपनीने ऑन-ग्राऊंड ऍक्टिव्हेशनद्वारा बाजार संपादित करु इच्छिणाऱ्या कंपन्यांना ऍक्विझिशन, एन्गेजमेंट आणि रिटेंशन सेवा पुरवायला सुरुवात केली.

आज ‘दि टेस्टामेंट’ दरदिवशी १० शहरांमधून साठहून जास्त लोकांना रोजगार मिळवून देते. गेल्या आर्थिक वर्षापासून व्यवसायात ४०० टक्के वाढ प्राप्त केल्याचा कंपनीचा दावा आहे. निशांत सांगतो, “गेल्यावर्षी आमची आर्थिक उलाढाल ३० लाखांच्या जवळपास होती. या चालू आर्थिक वर्षात ती १.२ कोटीचा आकडा पार करेल.”

कंपनीने प्रत्येक प्रकल्पामध्ये २० टक्क्यापर्यंत मजबूत नफा कमावला असल्याचा कंपनी दावा करते. कंपनी फोर्ड, जनरल मोटर्स, मारुती सुझुकी, युबीएम, मेस्सी आणि उबेर, क्विकर, ट्रीपदा, अर्बन क्लॅप, स्वजल आणि जीएमएएस यासारख्या भरभराटीला आलेल्या स्टार्टअप्सना सेवा पुरविते. निशांत पुढे सांगतो, “आम्ही मूलतः या कंपन्यांना मार्केट ऍक्विझिशन (ग्राहक/विक्रेता) आणि प्रशिक्षण यामध्ये मदत करतो.”

२०१६-१७ च्या अखेरपर्यंत कंपनीची वार्षिक उलाढाल पाच कोटींपर्यंत नेण्याची कंपनीची योजना आहे. २०१५ मध्ये ‘दि टेस्टामेंट’ने २० शहरांमधून १० पेक्षा जास्त ग्राहकांसाठी ६००० मॅन-डेजसाठी ५०० हून जास्त लोकांना रोजगार प्राप्त करुन दिला.

कंपनीच्या वाढत जाणाऱ्या व्यवसायाचा विचार करुन वर्कफोर्स ऑन-बॉर्डिंग, व्यवस्थापन आणि प्रशिक्षण प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी कंपनी एक इन-हाऊस उत्पादन विकसित करित आहे. याकरिता यावर्षी २० च्या वर कर्मचाऱ्यांची भर्ती करण्याची आणि मुंबई व बंगळुरु येथे कार्यालय सुरु करण्याची कंपनीची योजना आहे.

सध्या पार्ट टाईम मनुष्यबळ पुरविणारे ९० टक्के मार्केट असंघटित आहे आणि मूलतः हा पुरवठा एजन्सी मार्फत होतो. मात्र या एजन्सीज नव्या युगातील तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्स आणि ब्रॅण्डच्या गरजा समजण्यास असमर्थ असतात. ‘दि टेस्टामेंट’ या एजन्सीज आणि ‘मायटी टीमलीज’ या १३ वर्षांपासून तात्पुरते मनुष्यबळ पुरविण्याच्या व्यवसायात असणाऱ्या कंपनीच्या स्पर्धेत आहे.

जिथे या क्षेत्रात यशस्वी स्टार्टअपच्या प्रवासात निधी उभारणीला उत्साहाने स्वीकारले जाते तिथे टेस्टामेंटने मात्र कधीही भांडवल उभे केले नाही. “मोठमोठ्या संस्थांमधून आलेल्या संस्थापकांना गुंतवणूकदार आणि मीडिया सहज उपलब्ध होतो. मात्र आम्ही कुणालाही फारशी माहिती नसलेल्या संस्थेमधून आलेलो होतो. त्यामुळे ना आम्हाला विदेशी भांडवल मिळू शकत होते, ना आमचा कुठल्या वेंचर कॅपिटल किंवा मीडिया ग्रुपशी काही संबंध होता,” निशांत सांगतो.

सध्या अधिकतर स्टार्टअप्स वेंचर कॅपिटलद्वारा उपलब्ध निधीवर सुरु आहेत. उद्योजकांना एक्सटर्नल कॅपिटलच्या आधारे कंपनी चालवणे आणि भरभराटीस आणणे कठीण वाटते. जेव्हा की १९९७ ते २००७ दरम्यानच्या जलद वेगाने वाढणाऱ्या ९०० पैकी ७५६ कंपन्यांनी कधीही भांडवल उभे केले नाही. निशांत सांगतो, “एक चांगला उद्योग उभा करण्यासाठी भरपूर पैशांची गरज नसते. गरज असते ती चांगल्या मिशन स्टेटमेंटची आणि व्यवसायाच्या आराखड्याची.”

सुरुवातीच्या दिवसात वेंचर कॅपिटल फ्रेण्डली नसणे किंवा स्केलेबल असणे हेच फायद्याचे असते. निधी प्राप्त झालेल्या स्टार्टअप्सना पाहिल्यावर लक्षात येते की त्यांची अवस्था खूप वाईट आहे. निशांत म्हणतो की आसपास प्रत्येकजण किंमतींची चढाओढ लावत आहे. अशावेळी तुमची सेवा सर्वात स्वस्त असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही अपयशी ठराल.

आणखी काही स्टार्टअप विषयी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

स्टार्टअप इंडिया मोहिमेने प्रेरीत बालउद्योजक बंधूंकडून पायाभरणी स्मार्टअप इंडियाची...

नवीन उद्योजकांसाठी मराठीतून व्हिडीओ ब्लॉग, पुण्याच्या अविनाश जोशी यांचा अभिनव प्रयोग

योग्य स्टार्टअप तेच आहे, जे यशाचा पाठलाग सोडत नाही, दोनदा अपयश आल्यानंतरही ‘अंशुल’ ने दाखवली हिम्मत!

लेखक : जय वर्धन

अनुवाद : अनुज्ञा निकम

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags