संपादने
Marathi

जिल्हाधिकारी झाले मुलांचे मित्र, अनवाणी शाळेत जाणा-या पंचवीस हजार गरीब मुलांना ‘चरण पादूका’ योजनेतून दिली पादत्राणे!

kishor apte
20th Feb 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

असे म्हणतात की, जे इतरांच्या तुलनेत वेगळे असतात त्यांची प्रत्येक गोष्टच निराळी असते. आणि त्यांचे हे कार्य समाजासाठी असेल तर नक्कीच लोक त्यांना कधीच विसरु शकत नाहीत.

ही गोष्ट राजस्थानच्या जलौर जिल्ह्यातील आहे. येथील जिल्हाधिकारी जितेंद्रकुमार सोनी यांनी ते करून दाखवले ज्याची अपेक्षाच सामान्यपणे केली जात नाही. पदभार घेतल्यानंतर वर्षभरातच सोनी यांनी अनेक अशी कामे करुन दाखवली आहेत ज्यांचे कौतूक करायलाच हवे. जितेंद्र सोनी यांनी एक अनोखे अभियान सुरू केले आहे. अनवाणी शाळेत जाणा-या मुलांना ‘चरण पादूका’ योजना! जलौरचे जिल्हाधिकारी सोनी यांनी केवळ आठवडाभर आधी ही योजना अंमलात आणली ज्यातून अनावणी शाळेत जाणा-या मुलांना पादत्राणे देण्याची व्यवस्था करण्यात आली.


 जितेंद्रकुमार सोनी मुलांना पादत्राणे  घालताना

 जितेंद्रकुमार सोनी मुलांना पादत्राणे  घालतानाजिल्हाधिकारी जितेंद्रकुमार सोनी यांनी जिल्ह्यातील सर्व २७४ग्रामपंचायती आणि तीन नगरपालिकांकडे ही माहिती मागितली की शाळेत अनवाणी येणा-या मुलांची संख्या किती आहे. त्यांना लवकरच ही माहिती देण्यात आली की सुमारे २५०० शाळांमध्ये २५हजार मुले आहेत ज्यांना या थंडीत पादत्राण नाहीत. गणिताच्या भाषेतच सांगायचे झाले तर प्रति शाळा दहा पादत्राणे हवी होती. बस अजून काय हवे होते?! या युवा आयएएस अधिका-याने केवळ आठवडाभरात अशक्य वाटणारे हे कार्य करून दाखवण्याचे ठरवले. खरेतर ही योजना सुरू होण्यामागेही एक मोठे कारण आहे जे तुमच्या काळजाचा ठाव घेईल. डिसेंबर२०१५मध्ये एका शाळेच्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी सोनी गेले होते. तेथे त्यांनी तीन मुलांना अनवाणीच येताना पाहिले. या कडाक्याच्या थंडीत ही मुले अशीच राहतात हे काही या संवेदनाशील अधिका-याला पाहवले नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्या तिघांना त्यांनी लगेचच बाजारात नेले त्यांना पादत्राणे घेतली आणि स्वत:च ती त्यांना घातली. त्याच वेळी त्यांच्या मनात एक अशी योजना तयार करण्यासाठी विचार सुरू झाले की, गरीब मुलांना थंडीत पादत्राणाशिवाय शाळेत जावे लागू नये. 

image


या घटनेनंतर लगेच त्यांनी ही योजना प्रत्यक्षात आणली आणि अनवाणी येणा-या गरीब मुलांना पादत्राणे मिळाली. आणि इथूनच ‘चरण पादुका’ या योजनेचा शुभारंभ झाला. २५ हजार अनवाणी शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना २६जानेवारी २०१६ला पादत्राणे देण्याचा संकल्प करण्यात आला मात्र त्यात निधीची टंचाई ही अडचण होती. पण म्हणतात ना तुमचा प्रामाणिक प्रयत्न असेल तर सारे जग तुमच्या मदतीला धावते, तसेच या योजनेचे झाले. जिल्हाधिकारी यांच्या योजनेची माहिती मिळताच अनेक जणांनी त्यात आपले योगदान देण्यासाठी हात पुढे केले आणि पैश्यांची सोय झाली.

युवर स्टोरीशी बोलताना जिल्हाधिकारी सोनी म्हणाले की, “अनेक शाळांत मुलांना हे समजले की अनवाणी शाळेत जाणा-या मुलांना पादत्राणे देण्याची योजना तयार करण्यात आली आहे, तेंव्हा त्यानी देखील त्यासाठी आपल्या पॉकेटमनीची रक्कम देऊ केली. इतकेच नव्हेतर अनेक शिक्षक आणि ग्रामीण लोकांनी या योजनेसाठी निधी गोळा केला.” 

image


जिल्हाधिकारी आणि त्यांच्या काही अधिकारी मित्रांनी मिळून २७हजार रुपये जमा केले आणि बँकेत खाते सुरू करून लोकांनाही यासाठी निधी देण्याचे आवाहन केले. ही घोषणा होतानाच जिल्हाधिकारी सोनी यांना सामाजिक संपर्क माध्यमातूनही चांगला प्रतिसाद मिळत गेला. लोकांनी फोन केले. अनेक जण खूपच दुर्गम गावात राहतात. या मुलांना पादत्राणे देण्याच्या या योजनेत त्यांनी पैसे किंवा पादत्राणे दान केली. इतकेच नाही विदेशातूनही मदतीचे हात पुढे आले. परदेशी राहणारे काही भारतीय जिल्हाधिकारी यांना संपर्क करून कौतुक करु लागले आणि त्यांनी यासाठी सक्रीय योगदानही दिले.

याबाबत सांगताना जिल्हाधिकारी म्हणाले की, “ मला लंडन आणि गांझाओ (चीन) येथून अनिवासी भारतीयांनी संपर्क केला. आणि त्यांनी भारतात राहणा-या आपल्या नातेवाईकांच्या मदतीने पादत्राणे पाठवली.”

image


युवर स्टोरीला या बाबत सांगताना जिल्हाधिकारी सोनी म्हणाले की, ही योजना आता एक लोकचळवळ झाली आहे. गावोगाव जाऊन लोकच आता अनवाणी येणा-या मुलांना पादत्राणे घेऊन देत आहेत. त्यांच्या मते आम्ही ज्या समाजात राहतो, तेथे सगळ्यांना सर्वकाही मिळतेच असे नाही.अशावेळी ज्यांना गरज आहे त्यांना विशेषत: शिकणा-या मुलांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केली गेली पाहिजे.

सोनी पुढे सांगतात की, त्यांचे वडील देखील खूप श्रीमंत नव्हते.पण त्यांनी दोन्ही भावंडांना शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट केले. जिल्हाधिकारी सोनी यांच्यामते त्यांचे शिक्षण सरकारी शाळा-महाविद्यालयातच झाले. त्यानी प्रचंड मेहनतीने हे पद मिळवले आहे त्यामुळे ते लोकांच्या अडी-अडचणी ते फारच चांगल्याप्रकारे जाणतात आणि त्यांना मदत करण्याचा नेहमी प्रयत्न करतात.

युवर स्टोरीने जेंव्हा त्यांचे वडील मोहनलाल यांच्याशी संवाद साधला तेंव्हा त्यांनी सांगितले की, “ जितेंद्र लहानपणापासूनच संवेदनशील मनाचे आहेत. त्यांच्यावर सामजिक घटनांचा प्रभाव झाला आहे.”

image


त्यांच्या पत्नी अंजली सोनी यांच्या म्हणण्याप्रमाणे, ते जिल्हाधिकारी असले तरी त्यांच्या आतला संवेदनशील माणूस जागाच आहे. त्या सांगतात की जिल्हाधिकारी असूनही ते एक चांगले कलावंत, चित्रकार, छायाचित्रकार आहेत. इतकेच नाहीतर नुकत्याच झालेल्या राजस्थानी भाषेतील त्यांच्या कविता संग्रह ‘रणखार’ ला साहित्यक्षेत्रातून चांगली दाद मिळाली.

जलौरच्या या युवा जिल्हाधिका-यांचे कौतूक करावे तेवढे थोडे आहे. त्यांना त्यांच्या ‘चरण पादूका’ या योजनेसाठी युवर स्टोरी कडून शुभेच्छा. अनावणी मुलांच्या शिक्षणाच्या सुविधेसाठी त्यांना पादत्राणे देण्याच्या त्यांच्या या योजनेला त्यांनी असेच सुरू ठेवावे.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

"भूक मिटाओ" मोहिमेमुळे टळली १८०० मुलांची उपासमार

सकारात्मक बदलांचे दूत घडविणारा 'प्रखर भारतीय'

अंध वाचकांसाठी उमेश जेरे आणि सहकाऱ्यांचे निरपेक्ष कार्य

लेखक : रुबी सिंह

अनुवाद : किशोर आपटे. 

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा