संपादने
Marathi

उद्योजक रतन टाटा करणार 'कॅशकरो'मध्ये गुंतवणूक

Team YS Marathi
20th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

कॅशबॅक आणि कुपन्सचे संकेतस्थळ कॅशकरो, ही एक नवी कंपनी लवकरच आता उद्योजक आणि गुंतवणूकदार रतन टाटा यांच्या वेगाने वाढत असलेल्या स्टार्टअप्सच्या यादीत स्थान मिळवणार आहे. अवघ्या दोन वर्षापूर्वी सुरू झालेली ही कंपनी रतन टाटा यांची २०१६मधील तिसरी गुंतवणूक ठरणार आहे. आदर्श उद्योजक असलेले रतन टाटा यांनी २०१५ साली जवळपास १४ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यात प्रामुख्याने अर्बनक्लॅप, क्रयॉनडाटा आणि पेटीएम यांचा उल्लेख करावा लागेल. जानेवारी महिन्यातच त्यांनी ट्रॅकएक्सएन आणि डॉगस्पॉट या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.

image


गुडगावस्थित कॅशकरो या स्टार्टअपची सुरुवात २०१३ साली उद्योजक दांम्पत्य स्वाती आणि रोहन भार्गव यांनी केली. त्याच वर्षी त्यांनी लंडनस्थित गुंतवणूकदारांच्या एका गटाद्वारे त्यांच्या गुंतवणूकीत ७,५०,००० डॉलर्सची वाढ झाली. कलारी कॅपिटलने सुरुवातीच्या काळात गुंतवणूक केल्यानंतर कॅशकरो यांनी साखळीपद्धतीने २५ कोटींचा महसूल जमा केला. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत उद्योजक रतन टाटा यांनी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. एमेझॉन.इन, पेटीएम, जबॉंग आणि शॉपक्लूस यांसारख्या जवळपास एक हजार शॉपिंग पोर्टल्ससोबत हे स्टार्टअप काम करते. कॅशकरो या पोर्टल्सवर जे वापरकर्ते लॉग-इन करतात आणि त्यानंतर ऑनलाईन खरेदी करतात, त्यांना ३० टक्के अधिक खरेदी रक्कम परत करण्यात येते. कॅशकरो हे पोर्टल कमिशन या पद्धतीवर काम करते. दहा लाखाहून जास्त नोंदणीकृत सदस्य असलेल्या आणि प्रतिमाह जवळपास पाच दशलक्ष ग्राहक भेट देत असलेले हे पोर्टल असल्याचा दावा कंपनी करते. येत्या काही महिन्यात एक हजार कोटीचे लक्ष्य पार करण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच वापरकर्त्यांना आतापर्यंत ३० कोटी रुपये कॅशबॅक स्वरुपात परत केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. २०१५च्या उत्तरार्धात जमा झालेल्या निधीचा कंपनी वापर करत असल्याचे स्वाती सांगतात. त्या म्हणतात, 'खरेदीच्या किंमतीची तुलना करणाऱ्या आणि उत्पादन शोधणाऱ्या आमच्या तंत्रज्ञानाचा आम्ही विकास करत आहोत. ज्यामुळे कॅशकरो हे ऑनलाईन सेव्हिंगकरिता उत्तम पर्याय ठरणार आहे.' दक्षिण पूर्व आशियात आपला विस्तार करण्यासाठी कंपनी आपल्या निधीचा वापर करत आहे.

ऑनलाईन रिटेल क्षेत्रात कॅशकरोसारख्या कंपन्यांचा उदय होत आहे. गोल्डमॅन सॅच्स यांच्यानुसार इंडियन ई-कॉमर्स क्षेत्र शंभर अब्ज डॉलर्सचा पल्ला २०२० या आर्थिक वर्षात गाठेल. इंटरनेट एण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या २०१५ सालच्या अभ्यासानुसार, त्यांच्याशी संलग्न असलेली संकेतस्थळे, (ज्यात कॅशबॅक क्षेत्रात कॅशकरोसारख्या संकेतस्थळांचा समावेश आहे) भारतात ई-कॉमर्स क्षेत्रात जवळपास १५ टक्के विक्रीची नोंद करतात. कॅशबॅक या क्षेत्रामध्ये तसे पाहता अनेक स्टार्टअप्सची वर्दळ आहे. लाफालाफा, गोपैसा आणि पेन्नीफूल यांसारखे प्रतिस्पर्धी कॅशकरोसमोर आहेत. ५०० स्टार्टअप्सचा पाठिंबा असलेल्या लाफालाफा या पोर्टलने डिसेंबर महिन्यात आपल्या निधीमध्ये वाढ केली. कॅशकरोच्या टीमला या क्षेत्रातील आव्हानांची तसेच स्पर्धेची पुरेपुर कल्पना आहे. वाढत असलेल्या निधीमुळे कायम या स्पर्धेत अव्वल राहण्याची कंपनीची अपेक्षा आहे. 'कॅशकरो ही भारतातील सर्वात मोठे कॅशबॅक संकेतस्थळ आहे. ज्यामुळे आम्हाला विपणनावर अधिक काळ काम करता येते. तसेच कर्मचाऱ्यांची मोठी फळी असल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आमची वाढ जलदगतीने होते. ग्राहकांचा विश्वास राखण्यास यामुळे आम्हाला मदतच होत असते', असे स्वाती सांगतात. खरेदी मुल्याची तुलना करणारे खास फिचर आल्यास ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे.


टाटा सन्सचे अध्यक्ष सन्मानित सेवानिवृत्त असलेले रतन टाटा हे सद्यस्थितीला भारतातील स्टार्टअप्ससाठी एक दैवी गुंतवणूकदार ठरले आहेत. कॅशकरोचे सह-संस्थापक स्वाती आणि रोहन भार्गव यांच्या एकत्रित निवेदनानुसार, कॅशकरोमध्ये उद्योजक रतन टाटा यांनी केलेली गुंतवणूक ही या पोर्टलसाठी एक मोठी संधी आहे. उद्योजक रतन टाटा यांनी केलेली गुंतवणूक हा कॅशकरोच्या तीन वर्षाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. आमच्या बोर्डवर गुंतवणूकदार म्हणून टाटा असणे, हे आमचे भाग्य आहे. त्यांचे अनुभव कॅशकरोसाठी नेहमीच फायदेशीर ठरतील. तसेच ग्राहकांकरिता एक नावीण्यपूर्ण रणनीती आखण्यास मदत होईल, असे कॅशकरोचे संस्थापक सांगतात.

लेखक- राधिका पी. नायर

अनुवाद – रंजिता परब

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags