संपादने
Marathi

सायकलवरील एक ‘सहर्ष’ प्रवास

Pramila Pawar
24th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

कधी महाराष्ट्रातील प्रचंड उष्मा तर कधी केरळमधील ढगाळ वातावरण, तर कधी ४५ डिग्री सेल्सिअस तापमान... या अशा प्रतिकूल परिस्थितीतही तो न थकता दिवसाला १५०० किमी अंतर कापत होता, तेही सायकलवरून! नवी मुंबईच्या सहर्ष देऊलकर या तरुणाची ही साहसकथा आहे.

image


ऐरोलीतील सेक्टर ५ मध्ये राहणार्‍या सहर्ष देऊलकर या २९ वर्षीय तरूणाने ११ नोव्हेंबर पासून सुरू केलेला ऐरोली ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास रविवारी पूर्ण केला आहे. पर्वतीय प्रदेशातील आव्हानात्मक चढ-उतारांचा आणि वळणांचा रस्ता. एका बाजूला दरी तर दुसर्‍या बाजूला उंच पर्वतरांग, उंचीवर असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता आणि तोंडावर सतत आदळणारा जोरदार वारा अशा प्रतिकुल परिस्थितीत या खडतर मार्गावर सायकल प्रवास करण्याचे लक्ष्य सहर्ष या तरूणाने नुकतेच पूर्ण केले आहे. ऐरोली ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करण्यामागचे कारण विचारले असता सहर्ष सांगतो, ‘‘ कामाच्या आणि जगण्याच्या रहाटगाड्यातील तोच तोचपणा न करता काहीतरी वेगळे करण्याचे त्याने ठरवले. काहीतरी वेगळे म्हणजे असे, ज्यात आव्हाने आहेत आणि जे जरा धाडसाचेच आहे. तसेच सायकलिंग ही संकल्पना परदेशात खूप रूजली आहे, परंतू आपल्या भारत देशात सायकलिंग हा प्रकार फारसा वापरला जात नाही. म्हणूनच ऐरोली ते कन्याकुमारी पर्यंत सायकल प्रवास करून आपल्या भारतीयांना सायकलिंगचे महत्त्व पटवून द्यायचे आहे.’’

image


सायकल चालवा-इंधन वाचवा, सायकल चालवा-पर्यावरण वाचवा असा संदेश नागरिकांमध्ये रूजविण्यासाठी सहर्ष याने ऐरोली ते कन्याकुमारी सायकल प्रवास करण्याचे दुसरे उद्दीष्ट होते. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात या सायकलस्वाराने तब्बल १७०० कि.मी. चे अंतर केवळ १२ दिवसांमध्ये पार केले. या प्रवासादरम्यान दर दिवशी साधारण १५०० कि.मी. अंतर सहर्ष रोज पार करीत होता. विशेष म्हणजे ‘हॅव प्राईड इन सायकल राईड’ हा संदेश देण्यासाठी केलेल्या या संपूर्ण प्रवासात त्याला प्रत्येक राज्यातील प्रवासी व नागरिकांनी उत्तम साथ दिली. या प्रवासासाठी सायकलवरून भारत परिक्रमा करणारे सागर गावकर हे सहर्षचे प्रेरणास्थान आहे. ऐरोली ते कन्याकुमारीपर्यंत प्रवास करणार्‍या सहर्षने यापुर्वीही मुंबई ते गोवा असाही सायकलवरून प्रवास केला आहे. कन्याकुमारीपर्यंतच्या प्रवासानंतर पुढे उत्तरोत्तर टोकाकडे सायकल प्रवास करण्याचा संकल्प सहर्ष याने केला आहे. ऐरोली- कन्याकुमारी प्रवासादरम्यान काही राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने निसरडत्या रस्त्यांवरून सायकल चालविणे त्यांना कठिण जात होते. ‘‘ वादळ वारा पाऊस धारा, मुळी न आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही तिमिरातले दिवे,’’ असा बाणा सहर्षमध्ये रूजला होता आणि म्हणूनच तो हा सायकल प्रवास पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. काही राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामूळे हा प्रवास पुर्ण करण्यासाठी त्याला १ दिवस उशिर झाल्याचे सहर्ष याने सांगितले.

image


ऐरोली ते कन्याकुमारीपर्यंतच्या सायकल प्रवासादरम्यान आलेले अनुभव सांगताना सहर्ष म्हणतो की, ‘‘ऐरोली ते कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास करीत असताना एका ठिकाणी त्याच्या सायकलचा अपघात झाला होता. यामध्ये त्याच्या गुडघ्याला जखम झाली होती. अशा अवस्थेत आपला सायकल प्रवास थांबवावा लागतो की काय अशी भिती वाटत होती. परंतू कन्याकुमारी गाठायचीच या इच्छाशक्तीने पुन्हा एकदा जोमाने सायकल प्रवास करण्याचे बळ दिले आणि अखेर मी ऐरोली ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास पूर्ण केला.’’ पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने सायकलचा दैनंदिन वापर वाढावा यासाठी सहर्षने घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.

image


"कन्याकुमारीतील निसर्ग म्हणजे जणू वरदान आहे. इथे थोड्याथोड्या अंतरावर निसर्गाचे विविध आकर्षक रूप पाहायला मिळते, हे विशेष! कन्याकुमारीमधल्या अनुभवांनी जीवनातला सर्वाधिक आनंद आपणास दिला. या यात्रेने माझ्या सहनशिलतेत कमालीच वाढ झाली. प्रसंग व परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता आधीपेक्षा आता कितीतरी वाढलेली आहे, या प्रवासातूनच हे शक्य झाले." सहर्ष देऊलकर, ऐरोली.
image


Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा