संपादने
Marathi

मुंबई विमानतळावर ग्रीन बॅक्टेरियाच्या मदतीने दररोज स्वच्छतेसाठी लागणा-या एक लाख लिटर पाण्याची बचत!

Team YS Marathi
10th Apr 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता एका अनोख्या पध्दतीमुळे स्वच्छतागृहात आणि जमिनीवर स्वच्छता करण्यासाठी पाण्याचा वापर करण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार आहे. यामुळे असे सांगण्यात येते की रोज लाखभर लिटर पाण्याची बचत होणार आहे.


Image source: Firefly Daily

Image source: Firefly Daily


येथील प्रशासनाने अमोनिया शोषून घेणा-या बॅक्टेरियांच्या मद्तीने येथील मुता-या स्वच्छ करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या मुता-यांमध्ये वापर होताच येथील अमोनियाचे नायट्रोजन मध्ये रूपांतर केले जाते. व्यवस्थापनाचा दावा आहे की, विशिष्ट प्रकारच्या मिश्र जिवाणूंमुळे संपूर्ण १४००एकरच्या टर्मिनल-२ मध्ये त्यामुळे स्वच्छता राहणार आहे.

या पर्यावरण स्नेही जिवाणूंचा वापर करणारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रथम ठरले आहे. येथील अधिका-यांनी फ्लशला जोडण्यात येणारे ऑटे सेंसर बंद केले आहेत, त्या ऐवजी स्वच्छेतेची जबाबदारी अनेक प्रकारच्या मिश्र जिवाणू आणि बँक्टेरियांवर देण्यात आली आहे. या शिवाय पारंपारीक पध्दतीने माणसांकडून स्वच्छता करून घेण्याच्या कामाला देखील फाटा देण्यात आला आहे, कारण बँक्टेरिया चोविस तास त्यांचे काम करत असतात. मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावरील एका उच्च पदस्थ अधिका-यांनी चॅट वरून सांगितले की, “ या प्रकल्पावर आम्ही मागील जुलै महिन्यात काम सुरू केले, आम्हाला पहायचे होते की ग्रीन केमीकल प्रभावीपणे काम करते कि नाही. त्यांच्या कडे जितके काम दिले होते तितके ते विमानतळावरच्या प्रवाश्यांच्या प्रमाणात त्यांच्याकडून ते प्रभावीपणे केले जाणे अपेक्षीत होते. आम्हाला दिसून आले की मुता-या आणि शौचकूप अशाप्रकारे स्वच्छ झाले की जणू ते वापरलेच गेले होते की नाही. ते अस्वच्छ रहात होते आणि सतत स्वच्छ करणे शक्य होत नव्हते”.

दी इंडियन ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन (आयजीबीसी) ने मुंबई विमानतळाला विशेष प्लॅटिनम मुल्यांकन दर्जा देवून प्रमाणित केले आहे की, व्यवस्थापनाने खूपच छान काम करून दाखवले आहे.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags