संपादने
Marathi

मुकेश अंबानी म्हणतात, “भारत लक्षावधी स्टार्टअप्सचा देश बनू शकतो”!

29th Sep 2017
Add to
Shares
45
Comments
Share This
Add to
Shares
45
Comments
Share

इंटरनेट आणि त्यावरील वापर देशात सतत वाढत आहे, देशातील तरूणवर्ग जे एकूण लोकसंख्येच्या ६३टक्के आहेत, त्यांच्यात नव्याने डिजीटल व्यवसाय उभा करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, “जर योग्य साधने आणि वातावरण निर्मिती केली तर, भारत हा लक्षावधी स्टार्टअप्सचा देश बनू शकतो”.


मुकेश अंबानी 

मुकेश अंबानी 


याबाबत पुन्हा एकदा नव्याने आठवण करून देताना ते म्हणाले की, ‘डेटा हेच नवे तेल आहे’ भारताला ते आयात करावे लागणार नाही. “भारतीय मोबाईल बाजार हा सध्या डेटाने ओसंडून वाहत आहे. आम्हाला १.३ दशलक्ष भारतीयांना योग्य ती साधने देवून सक्षम करण्याची गरज आहे जेणे करून डिजीटल बाजारपेठेत ते त्यांचे योग्य ते स्थान निर्माण करू शकतील”.

याबाबत बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, “ डेटा हा डिजीटल अर्थव्यवस्थेचा ऑक्सिजन आहे, आणि भारतीयांना यापासून कुणी दूर ठेवू शकत नाही, जो जीवनावश्यक भाग झाला आहे.”

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनुदानित रिलायन्स जिओने नुकतेच कमी किमतीच्या योजनेतून भारतीय टेलिकॉम विश्व हलवून टाकले आहे. अंबानी म्हणाले की, ४जी कव्हरेज देशात पुढच्या बारा महिन्यात दिले जाईल, ते २जी पेक्षा खूपच मोठे विस्तारित असेल. अंबानी म्हणाले की, “ भारतीय अर्थव्यवस्था ७अब्जांची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होत आहे, यापूर्वीच्या दहा वर्षात ती २.५ अब्ज इतकीच होती.”

भारताने पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीच्या वेळी संधी गमावली आहे, पण संपर्क, डेटा (माहितीचा खजिना) आणि कृत्रिम शहाणपणाच्या बळावर आपण चवथ्या औद्योगिक क्रांतीसाठी निघालो आहोत. भारताला त्यात नेतृत्व करण्याची संधी आहे. असे अंबानी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मोबाईल, इंटरनेट आणि क्लाऊड कॉम्पिटिंग हे चवथ्या क्रांतीचे आधारस्तंभ आहेत.

तीन दिवसांच्या भारतीय मोबाईल कॉंग्रेसमध्ये उद्योग जगतातील गणमान्य एकत्र आले आहेत, ज्या मध्ये देशाला चांगला सक्षम मार्ग आणि दिशा देण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर ओळख देण्यासाठी विचारविनिमय होत आहे.

यावेळी होणा-या प्रदर्शनात जगभरातील या क्षेत्रातील स्टेक होल्डर्स एकत्र येत असून यावेळी संचारता आणि तंत्रज्ञान याबाबत खोलात जावून भविष्यातील मोबाईल उद्योगाचा मार्ग कसा असावा याची रूपरेषा ठरवली जाईल. यामध्ये वृद्धीचे भाग कोणते आणि तंत्रज्ञानात आणखी काय बदल होतील त्यानुसार वृद्धी करण्याच्या कल्पना यावर चर्चा होत आहे.

येथे डेल स्टार्टअप्स चॅलेज सिझन-२ आहे, यामध्ये पाच हजार डॉलर्सच्या डेल तंत्रज्ञानाच्या वस्तू जिंकता येतील त्यात डेल व्होस्ट्रो लॅपटॉप्स आहेत, त्यासाठी तुम्हाला तुमच्या कल्पना मांडता येतील जेणेकरून ऐंजल गुंतवणूकदार आणि बीज भांडवलदार आकर्षित होतील. 

Add to
Shares
45
Comments
Share This
Add to
Shares
45
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags