संपादने
Marathi

कचऱ्यातून पैसानिर्मिती आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘कचरेवाल्या वहिनी’

sachin joshi
1st Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आपण रोज किती कचरा निर्माण करतो आणि त्याचं काय होतं, याचा विचार खूप कमी लोक करतात, अशाच काही लोकांपैकी आहेत पूनम बीर कस्तुरी ज्यांना लोक ‘कचरेवाल्या वहिनी’ म्हणूनही ओळखतात. कचऱ्यातून नवनिर्मिती करण्याचं मोठं काम पूनम करतात. खराब झालेल्या वस्तु फेकुन देण्यापेक्षा त्यापासून दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त अशी नवीन वस्तू ती सुद्धा वास न येणारी तयार झाली तर? पूनम गेल्या सात वर्षांपासून हाच प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या मते घरातील कचऱ्याच्या ८० टक्के कचऱ्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो, याच हेतुने पूनम यांनी ‘डेली डम्प’ची सुरूवात केलीये. या माध्यमातून घरातील कचऱ्यातून खतनिर्मिती तर करता येतेच पण भांड्यांसारख्या उपयुक्त वस्तुही बनवता येतात. या वस्तू सुंदर, स्वच्छ आणि सोयीच्यासुद्धा असतात आणि त्या बनवताना एकप्रकारचं समाधानही मिळतं.


image


तत्ज्ञांच्या मते कचऱ्यावर नियंत्रण मिळवलं गेलं नाही तर २०२५ पर्यंत जगात ६० लाख टन घनकचरा जमा होण्याची शक्यता आहे.. म्हणजे हा कचरा ५ हजार किलोमीटरर्यंत उभ्या असलेल्या ट्रक्समध्ये भरला जाईल एवढा असेल. डेली डम्प जागतिक पातळीवरही काम करतंय. भारतात त्यांची १२ तर परदेशात २ केंद्र आहेत. लोकांना टेराकोटाशी सबंधित अर्थात मातीच्या सहाय्याने तयार करण्यात येणाऱ्या वस्तू तयार करता याव्यात आणि त्यांनी इतरांनाही याबाबत शिकवावं यासाठी या केंद्रांमध्ये तांत्रिक माहिती मोफत दिली जाते. या मार्गानं कचऱ्याची समस्या किती गंभीर आहे हे लोकांना समजावण्याचा आणि त्याशिवाय बेकरी, खानावळी, धोबी, टेलर आणि इतर लोकांपर्यंतही आम्हाला हा संदेश पोहोचवायचा आहे असं पूनम सांगतात.

कोँणतीही सेंद्रिय वस्तू अगदी खराब झालेलं अन्न असलं तरी त्याच्यापासून खत बनवता येऊ शकतं. पर्यावरणाच्यादृष्टीनं हा चांगला पर्याय असला तरी वेळेची कमतरता आणि जागरुकतेचा अभाव यामुळे लोकांना त्याबाबत माहितीच नसते. पण शहरातील कचऱ्याच्या समस्येवर हा चांगला तोडगा असू शकतो आणि या गोष्टींचा विचार करुनच डेली डम्पची सुरूवात केली गेली आहे.


image


घरच्या घरी खतनिर्मितीची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्ही हे काम रोज करु शकता. ओल्या आणि कोरड्या कचऱ्यासाठी दोन वेगळ्या कचरापेट्या ठेवल्या की त्या कचऱापेट्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारची पावडर टाकली जाते. ही पावडर डेली डम्पच्या दुकानांमध्ये किंवा ऑनलाईनही खरेदी करता येते. यासाठी तुम्हाला डेली डम्पही मदत करु शकतं. उदा. तुमच्या घरात पार्टीनंतर उरलेलं अन्न कचरापेटीत टाकल्यानंतर त्यात पावडर मिसळून झाकण लावून ठेवा. त्यानंतर त्यातून तयार झालेलं खत तुम्ही तुमच्या घरातील कुंड्यांमध्ये घालू शकतात. जर तुमच्या घरात रोपं नसतील तर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांनाही तुम्ही हे खत घालू शकता. त्यानंतरही जर तुमच्याकडे जास्तीचं खत उरत असेल तर डेली डम्प ते खरेदी करुन इतरांना विकतं.

काम करताना धैर्य आणि भक्कमपणा बाळगण्याची कला पूनम यांना त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली तर जगाकडे नव्यानं पाहण्याची दृष्टी त्यांना अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये शिकत असताना मिळाली. या उद्योगात येण्याआधी पूनम यांनी शिल्प आणि शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे. १९९० मध्ये त्यांनी इंडस क्राफ्टची सुरूवात केली. या संस्थेतर्फे कारागिरांच्या मदतीनं विविध भारतीय शिल्प तयार करुन त्यांची निर्यात केली जायची. त्याशिवाय त्यांनी बंगळुरूच्या सृष्टी स्कूल ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापक म्हणूनही काम केले आहे. आव्हानांना सामोरं कसं जायचं हे त्या अनुभवातून शिकल्या आहेत.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags