संपादने
Marathi

वर्तमानपत्र विकणा-या या मुलीने आयआयटी शिकून मिळवली नोकरी, फेसबुकवर ठरली सर्वात लोकप्रिय!

Team YS Marathi
7th Nov 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

इच्छा असेल तर मार्ग सापडतो असे म्हणतात, देहा गावांत वृत्तपत्र विकून गुजराण करणा-या शिवांगी यांनी हे शब्द खरे करून दाखवले आहेत. शिवांगीने नुकतेच आयआयटी मध्ये उत्तिर्ण होऊन चांगली नोकरी मिळवली आहे. तिच्या या यशाचा उल्लेख तिचे शिक्षक आणि सुपर३० चे आनंद कुमार यांनी फेसबुकवरून केला आहे. त्यामुळे तिच्या यशाची कहाणी मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. 

image


शब्द पूर्ण झाला

अलिकडेच सुपर३०चे आनंद कुमार यांनी फेसबुकवरुन एक पोस्ट केली. कानपूर पासून ६० किलोमिटर दूर असलेल्या देहा गावातील शिवानी यांची कहाणी त्यांनी दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांना आज खूप आनंद झाला की, या मुलीने या स्तरापर्यंत मजल गाठली आहे. एकेकाळी वृत्तपत्र विकणारी शिवानी आज आयआयटीची परिक्षा उत्तिर्ण झाली, त्यातूनच एका चांगल्या कंपनीत तिला मोठ्या हुद्यावर नोकरी मिळाली आहे. शिवानी यांच्या या यशाने तिची आई आणि कुटूंबिय खुश आहेत. त्यांना असे वाटते की आज शिवानीने यांच्या वडिलांना दिलेला शब्द पूर्ण केला.

निवड झाली.

आनंद कुमार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवानीने यासाठी खूप मेहनत घेत जिद्दीने संघर्ष केला आहे. शिवानी खूप लहान होती त्यावेळी ती तिच्या वडीलांसोबत वृत्तपत्र विकण्यासाठी जात असत आणि सरकारी शाळेत शिक्षण घेत होती. इंटरची परिक्षा दिली त्यावेळ पर्यंत तिने वडिलाचे पूर्ण काम स्वत:कडे घेतले होते. त्या दरम्यान तिला सुपर ३० बाबत माहिती मिळाली. वडीलांसोबत शिवानी सुपर३०च्या आनंदकुमार यांना भेटली आणि तिची निवड सुपर३०मध्ये झाली. खूप जिद्द आणि मेहनतीने तिने अभ्यास केला.

image


आईला रडू कोसळले.

त्यांनतर तिने नियोजित वेळेत आयआयटी पूर्ण केले. त्यांनतर तिला एका चांगल्या कंपनीतून नोकरीची विचारणा झाली. शिवानीने न घाबरता दिवस-रात्र मेहनतीने अभ्यास केला त्याचे हे फळ होते. आनंद कुमार यांच्या सोबत शिवानी कुटूंबातील सदस्याप्रमाणे झाली होती. त्यामुळेच जेंव्हा नोकरी मिळाली त्यावेळी तिने स्वत:च्या घरी सांगण्यापूर्वी आनंदकुमार यांच्या घरी फोन केला. त्यांच्या या आनंद वार्तेने तर त्यांच्या आईला आनंदाचे अश्रू आवरणे शक्य नव्हते, शिवानीच्या यशाची बातमी त्यांना अभिमान वाटावी अशीच होती. त्यांना विश्वास आहे की शिवानी असेच अजून यश संपादन करत राहील.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags