शिमल्याच्या महिलेने लैंगिक अडसर बाजुला सारत चालक म्हणून उद्योजकतेच्या दिशेने केला प्रवास !

शिमल्याच्या महिलेने लैंगिक अडसर बाजुला सारत चालक म्हणून उद्योजकतेच्या दिशेने केला प्रवास !

Wednesday July 05, 2017,

2 min Read

आज पासून केवळ काहीच वर्षात कदाचित, कदाचितच, आपण महिलांना चारचाकी वाहन चालविताना पाहून विनोद करणार नाही. सिमला येथील स्वयंरोजगार केंद्राने या दिशेने पाऊल टाकायचे ठरविले आहे, ज्यात महिलांना वाहनचालक म्हणून प्रशिक्षित करून उद्योजिका बनविले जात आहे.

महिलांना सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात आणि त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी २१महिलांच्या चमूला ज्यामध्ये माहविद्यालयीन तरूणींपासून गृहिणींपर्यत सा-या महिला आहेत त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. एका वृत्तानुसार, सुमन लता, या कार्यक्रमाच्या एक भाग आहेत त्या म्हणाल्या की, “ आमच्या पारंपारीक समाज रचनेत महिलांना वाहनचालक म्हणून शिकवायचे म्हटले तरी मस्करी उडवली जाते हे महिलांसाठी तितके सोपे नाही की समाजाची बंधने झुगारून द्यावी आणि मुक्तपणे जगावे. चालकाच्या जागेवर महिला असणे हेच मुळी समाज बदलण्याच्या दिशने टाकलेले पाऊल आहे”.

तिच्यासाठी शिकवणीला जाणे म्हणजे घरच्यांच्या रोषाला सामोरे जाणे असते. आणखी एक महिला निशा गर्ग या गृहिणी आहेत त्यांनी वाहन चालविणे शिकणे म्हणजे त्यांच्या नव-याच्या व्यवसायात हातभार लावणेच आहे आणि त्यांनाही उद्योजिका बनायचे आहे, आणि इतरांप्रमाणेच जगावे आणि त्यांचे इतरांनी अनुकरण करावे असे त्यांचे मत आहे.


image


एका वृत्तानुसार संगिता ठाकूर म्हणतात की, “ माझ्या भागातील अन्य मुलींना मी यासाठी प्रोत्साहन देते की त्यांनी घरातून बाहेर पडावे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी काम करावे. मी देखील स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी वाहन चालविणे शिकत आहे. भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या मदतीने या प्रशिक्षण केंद्राला चालविले जात आहे. सा-या देशात हे सुरू आहे आणि याचा उद्देश आहे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देणे.

शंभर अर्जदार महिलांमधून २१जणींची या यादीत निवड करण्यात आली आहे, ज्या महिनाभराचे प्रशिक्षण घेत आहेत. शिमलाचे उपायुक्त आर सी ठाकूर यांनी या संकल्पनेला चालना दिली ज्यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या की, चालकांचे वर्तन चांगले नाही आणि ते आरेरावीने वागत आहेत. महिलांना चालक म्हणून काम दिल्याने महिला प्रवाश्यांना देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय कॅब घेता येतील.