संपादने
Marathi

अक्षय कुमार यांनी केले ‘अशक्याला शक्य’; स्टंट कलाकारांसाठी तयार केली विमा योजना!

Team YS Marathi
3rd May 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

सिनेमात आपण नेहमी साहसी दृश्य पाहून अचंबित होतो. मात्र कित्येक लोकांना हे माहिती नसते की पडद्यावर ही दृश्ये करणा-या स्त्रिया आणि पुरूषांना केवळ त्यांच्या या कामाचा जेमतेम मोबदला मिळतो. अनेकदा हे साहस कलाकार जखमी होतात किंवा गंभीर दुखापतीमध्ये सापडतात, मात्र त्यांचा विसर पडतो, आणि त्यांना फारशी किंमत देखील अशावेळी कुणी देत नाही. मात्र त्यांच्या या कलेची कदर करून त्यांच्यासाठी जीवन आणि आरोग्य विमा देण्याचे पाऊल उचलण्यात येत आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या पुढाकाराने हे पाऊल उचलण्यात येत आहे. त्यात ३८० साहसी कलाकार स्त्रिया आणि पुरुषांचा समावेश असेल.


Image Source: India Times

Image Source: India Times


अक्षयकुमार जे ऍक्शन हिरो म्हणून प्रसिध्द आहेत, जे अनेकदा स्वत:चे सिन स्वत: स्टंट करून देण्यासाठी प्रसिध्द आहेत. त्यानी मार्शल आर्टचे शिक्षण देखील घेतले आहे. आणि अशा प्रकारच्या अभिनयातील धोके त्याना अवगत आहेत. डॉ पांडा जे ह्रदयरोग तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत, ज्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची देखील ह्रदय शस्त्रक्रिया यशस्वी केली होती, त्यांच्या मदतीने अक्षय यांनी ही योजना आणली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कामावर असलेल्या स्टंट अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी ही योजना सुरू झाली आहे.

डॉ पांडा या बाबत म्हणाले की, “ अपघात झालाच तर स्टंटमनला कोणत्याही विम्याचे संरक्षण नसते, हीच योग्य वेळ आहे की त्यांना अपघात विम्याचे संरक्षण द्यायला हवे होते”.

या प्रसंगी बोलताना अक्षय यांनी सांगितले की, “ प्रथम मी सुध्दा एक स्टंट कलाकार आहे आणि नंतर अभिनेता. मला जाणिव आहे की या क्षेत्रात मी नावारुपला आलो त्यामागे हेच स्टंट आणि अभिनय आहे. त्यामुळे याचे श्रेय या स्टंट कलाकार आणि ऍक्शन कोरियाग्राफर याचे आहे. शेवटी जे इतरांच्या करमणूकीसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात त्यांना विमा देणे गरजेचे होते, आता पर्यंत कोणत्याही सिनेसृष्टीत किंवा देशात त्यांच्यासाठी अशी योजना नव्हती.”

याबाबतच्या एका वृत्तात म्हटले आहे की, मुव्ही स्टंट आर्टिस्ट असोसिएशनच्या सचिवांनी एजिज गुलाब यांनी म्हटले आहे की, अक्षय कुमार यांनी ‘अशक्य ते शक्य’ करून दाखवले आहे. ते म्हणाले की, “ गेली अनेक वर्षे आम्ही अनेक निर्माते आणि विमा कंपन्या यांना यासाठी भेटलो, पण त्यांनी विमा देण्यास नकार दिला होता. हे खूपच निराशाजनक होते, पण आम्हाला कळलेच नाही अक्षयजी यांनी काय जादू केली. त्यांचे आभार कसे मानावे तेच समजत नाही, आमच्यासाठी ही बातमी खूपच मोलाची आहे”.

स्टंट कलाकारांना सहा लाख रूपयांचे विमा संरक्षण चार हजार रूग्णालयातून कॅशलेस पध्दतीने देण्यात आले आहे. त्यांना रूग्णालयातून याचा परतावा देखील मिळणार आहे जी या योजनेत समाविष्ट नाहीत. अपघाती मृत्यूच्या घटना झाल्यास त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना दहा लाख विमा मिळणार आहे. या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे, त्यांचे काम करत असताना धोके स्विकारुन ते काम करत असतात. आता ते या सुरक्षित वातावरणात अधिक चांगले काम करू शकतील.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags