संपादने
Marathi

भारताने ब्रिटनला मागे टाकले, जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होवून!

Team YS Marathi
27th Dec 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

भारताने आता त्यांच्या माजी वसाहती मधील मालकाला मागे टाकले आहे. दी युनायटेड किंगडम, स्वत:ला जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था सिध्द करून. गेल्या शंभर वर्षात पहिल्यांदाच भारताने ही कामगिरी केली आहे. युएस, चीन, जपान, जर्मनी, आणि फ्रान्स या जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्था आहेत. ही कामगिरी प्रामुख्याने झाली ती भारताच्या आर्थिक विकासाच्या, वेगाने आणि ब्रेक्झिट परिणामामुळेच.

image


किरेन रिजीजू देशाचे गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या व्टिटनुसार, गेल्या वर्षभरात पौंडचे मुल्य रुपयांच्या तुलनेत वीस टक्के घसरले आहे. फेब्रुवारीमध्ये, भारताने जगातील वेगवान अर्थव्यवस्था म्हणून चीनला मागे टाकले आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ७.६इतका २०१७मध्ये वाढेल. विदेश धोरणाच्या अहवालानुसार किरेन रिजीजू म्हणाले की, “ भारताला मोठ्या लोकसंख्येचा आधार असेल, पण ही मोठी उडी आहे”. या अहवालात म्हटले आहे की, युकेच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग२०१६मध्ये १.८ने वाढून २०१७मध्ये १.१ने कमी होणार आहे. या वर्षीच्या जून महिन्यात युरोपिअन समूहातून बाहेर पडण्याच्या युकेच्या निर्णयामुळे, ब्रिटनच्या चलनाला मोठ्या प्रमाणात धक्के आणि चढउतार सहन करावे लागणार आहेत. त्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था स्थैर्य अनुभवेल कारण प्रामुख्याने जागतिक वस्तूंच्या किमती कमी होतील, चांगल्या पावसामुळे, आणि महागाईचा वेग मंदावल्यामुळे आणि केंद्र सरकारने सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार, अठराव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर भारताला १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात युकेच्या वृध्दिदराने भारताची वाढ होत आहे. १९४७नंतर आलेल्या मंदीच्या काळात भारत आणि युके यांच्या वाढीचा दर साधारणत; सारखाच राहिला आहे. हे प्रामुख्याने घडले ते भारताच्या चुकीच्या पध्दतीच्या बंदिस्त, केंद्रीकृत समाजवादी अर्थव्यवस्थापनामुळेच. ते १९९१होते, जेव्हा बदलांची नांदी सुरु झाली, आणि त्यावेळी जेंव्हा भारताने बाजारातील बदल स्विकारण्यास सुरुवात केली. त्यातून या दिवसांपर्यत मजल मारता आली. या काळात भारताने झपाट्याने आर्थिक विकास पाहिला, आणि शेवटी २०१६मध्ये युकेला मागे टाकले, जरी आजही भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न युकेच्या एक पंचमांश असले तरी.

इतकेच नाहीतर, विश्लेषक आणि अर्थशास्त्री म्हणतात त्यानुसार, हे सारे संशयित करणारे आहे की भारताने हा सारा पल्ला इतक्या लवकर कसा गाठला. निश्चलनीकरणाचा प्रत्यय देवून.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags