संपादने
Marathi

भारतीय-अमेरिकन वकील ज्या ट्रम्प यांचे नियामक कामकाज कार्यालय चालवितात

Team YS Marathi
16th Jul 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

अमेरिकन सिनेटने मतदान करून निश्चित केले की, भारतीय अमेरिकन वकील निओमी राव या व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या माहिती आणि नियामक कामकाज विभागाच्या प्रमुख असतील.

४४ वर्षांच्या राव यांच्या नावावर निश्चिती झाली ज्यावेळी ५४-४१ अशा मतांनी याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला, आणि आता त्या व्हाइट हाऊस मधील कार्यालयात कामकाजात व्यस्त झाल्या आहेत, असे सिनेटच्या अधिकृत संकेतस्थळाने जाहिर केले आहे. यामुळे त्यांचे स्थान अध्यक्ष ट्रम्प यांच्या महत्वाकांक्षी राजकीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय नियम आणि कायद्याच्या चौकटीतून मार्ग काढण्याचे असेल. सिनेटर ओरीन हँच, ज्येष्ठ सदस्य आणि सिनेटच्या न्यायविषयक समितीचे माजी अध्यक्ष म्हणाले की, “ प्रो. निओमी राव यांची निय़ुक्ती करण्यात अध्यक्षांनी प्रोत्साहित करणारा पर्याय निवडला आहे. माझ्या सोबत गेली अनेक वर्ष काम करताना, संचालिका राव यांनी सिध्द केले आहे की, त्या सक्षम आणि नियमाची पक्की कर्मचारी आहेत. वॉश्गिंटनमध्ये आपल्या कर्तव्याची त्यांना नीट जाणिव होती, ज्यातून लहान उद्योगांना मदत झाली आणि अमेरिकन जनतेचे जीवन सुसह्य झाले.


Source: NY Times

Source: NY Timesसीनेटर जॉन होयेवन यांनी देखील राव यांच्या कामातील बांधीलकीबद्दल मान्यता दिली आणि म्हणाले की, बांधीलकी बाबत ते त्यांच्याकडून बरेच काही शिकले, त्यांच्यामुळेच त्यांचा फायदा झाला आणि आर्मी कॉर्प्स प्रकल्पात मुल्य विश्लेषण करता आले आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या चांगल्या वागणुकीची हमी देता आली, असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.

राव यांनी कायद्याच्या सहव्याख्यात्या प्राध्यापिका म्हणून जॉर्ज मॅसन विद्यापिठातील ऍन्टोनीन स्कॅलिया कायदा विद्यालयात सेंटर फॉर स्टडी ऑफ द ऍडमिनीस्ट्रटीव स्टेट करीता संस्थापक संचालिका म्हणून काम केले आहे. त्या येल विद्यापिठाच्या पदवीधर आहेत आणि नंतर त्यांनी शिकागो विद्यापिठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. राव यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील वकील क्लँरेन्स थॉमस आणि न्यायाधीश जे हार्वे विकिन्सन जे अपील न्यायालयात चवथ्या सर्कीटमध्ये कार्यरत आहेत यांच्या सोबत काही काळ काम केले आहे.

त्या अमेरिकेच्या प्रशासकीय परिषदेच्या सदस्याही आहेत, आणि अमेरिकन बार कौन्सिलच्या गव्हर्निंग कौन्सीलच्या व्यवस्थापकीय कायदा आणि नियामक कामकाजात देखील लक्ष घालतात.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags